गर्भधारणा होण्यापूर्वी तसेच गरोदर झाल्यानंतर कोणती काळजी घ्यावी याविषयी माहिती याठिकाणी सांगितली आहे.
गर्भधारणा झाल्याचे कसे कळेल..?
स्त्री मध्ये गर्भधारणा झाल्यानंतर सुरवातीला काही लक्षणे जाणवू शकतात. त्यावरून गर्भधारणा झाल्याचे कळण्यास मदत होईल.
हे वाचा..
गर्भधारणा झाल्यानंतर घ्यायची काळजी –
गरोदरपणात आईने स्वतःचे आणि बाळाचे आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी लागते. यासाठी गर्भावस्थेच्या एकूण नऊ महिन्यात आईने योग्य आहार घेतला पाहिजे. नियमित तपासणीसाठी डॉक्टरांकडे गेले पाहिजे.
हे वाचा..
गरोदरपणातील समस्या –
- उलट्या व मळमळ होणे
- गरोदरपणातील हाय ब्लडप्रेशर
- गरोदरपणातील मधुमेह
- डोकेदुखी
- चक्कर येणे
- पोट साफ न होणे
- गरोदरपणात पोट दुखणे
- गरोदरपणात रक्तस्त्राव होणे
- गर्भावस्थेत पायावर सूज येणे
बाळंतपण संबंधित लेख –
गर्भधारणा होण्यासाठी उपयुक्त टीप्स :
आई बनणे हे प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असते. मात्र काही स्त्रीयांमध्ये गरोदर राहण्यात समस्या येत असतात. यासाठी गर्भधारणा होण्यासाठी इच्छुक असणाऱ्या अशा दांपत्यासाठी उपयुक्त टीप्स खाली दिल्या आहेत.
- गर्भधारणेसाठी प्रयत्न करीत असाल तर तुमच्या स्त्री रोग तज्ज्ञांची भेट घ्या. व त्यांच्याकडून योग्य मार्गदर्शन जाणून घ्या.
- गरोदर होऊ इच्छित असल्यास गर्भनिरोधक गोळ्या किंवा गर्भनिरोधक उपकरणे वापरणे थांबवावे.
- हेल्दी आहार खाणे सुरू करा.
- आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, धान्ये, कडधान्ये, सुकामेवा, दूध, दुधाचे पदार्थ, अंडी, मांस, मासे यांचा समावेश करा.
- दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे.
- चरबी वाढवणारे पदार्थ, तेलकट, साखरेचे पदार्थ, खारट पदार्थ, मैद्याचे पदार्थ जंकफूड खाणे टाळावे.
- पुरेशी झोप व विश्रांती घ्यावी.
- मानसिक ताणतणाव यापासून दूर राहा.
- तंबाखू, सिगारेट, मद्यपान अशा व्यसनांपासून दूर राहा.
- नियमित व्यायाम करण्याची सवय लावून घ्यावी. अर्धा तास दररोज चालण्यास जावे.
- प्रेग्नन्सीविषयक पुस्तक आणा.
गर्भधारणा होण्यापूर्वी जोडीदारानी अशी काळजी घेतल्यास पुढे हेल्दी प्रेग्नन्सी होण्यासाठी मदत होते.
Read Marathi language article about Pregnancy Tips. Last Medically Reviewed on February 26, 2024 By Dr. Satish Upalkar.