गर्भावस्थेत डोके दुखणे :
गरोदरपणात डोके दुखण्याचा त्रास अनेक गर्भवती स्त्रियांना होत असतो. विशेषतः पहिल्या तीन महिन्यात डोके जास्त दुखत असते. प्रेग्नन्सीमध्ये होणारे हार्मोनल बदल, हाय ब्लडप्रेशर, झोप पूर्ण न होणे, मानसिक तणाव अशा अनेक कारणांनी डोकेदुखीची समस्या होऊ शकते.
गरोदरपणात डोके दुखत असल्यास हे करा उपाय :
डोके दुखत असल्यास थोडावेळ आराम करावा. तसेच डोक्याला थोडे तेल लावून मालीश करणे हा डोकेदुखीसाठी गरोदरपणी उपाय करू शकता.
प्रेग्नन्सीमध्ये डोके दुखत असल्यास गोळ्या औषधे खावीत का..?
डोकेदुखीसाठी वेदना कमी करणारी अनेक औषधे ही गरोदरपणात घेणे सुरक्षित नसतात. त्यामुळे आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशी कोणतीही वेदनाशामक औषधे डोकेदुखीवर खाऊ नयेत. डोकेदुखी असल्यास paracetamol या औषधाचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याने करू शकता. मात्र aspirin किंवा ibuprofen असणारी वेदनाशामक औषधे वापरू नयेत.
डॉक्टरांकडे केंव्हा जाणे आवश्यक असते..?
जास्त प्रमाणात डोके दुखत असल्यास आणि हाय ब्लडप्रेशरची समस्या असल्यास डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे. कारण ही लक्षणे प्री-एक्लेमप्सिया या गंभीर स्थिती संबंधित असू शकतात.
Headache during Pregnancy in Marathi information.
प्रेग्नेंसी, डिलिव्हरी आणि बालसंगोपन विषयक मराठी pdf पुस्तक मोफत डाऊनलोड करण्यासाठी खालील फॉर्मद्वारे संपर्क साधा. Pdf मोफत पुस्तक WhatsApp Number वर पाठवण्यात येईल.