Paralysis attack in Marathi, Paralysis Symptoms, Causes & Treatment marathi information.

पक्षाघात आजार माहिती (Paralysis in Marathi) :

मेंदूचे कार्य सुरळीतणे चालण्यासाठी मेंदूला रक्तपुरवठा व्यवस्थित होणे गरजेचे असते. मेंदूला योग्यप्रकारे रक्तपुरवठा न झाल्यास पक्षाघात (पॅरालिसीस) होतो त्यामुळे रुग्णाच्या हाता-पायातील ताकद कमी होते. याठिकाणी पक्षाघात म्हणजे काय, पक्षाघाताची कारणे, पक्षाघात का व कशामुळे होतो, पक्षाघात लक्षणे आणि उपचार याविषयी माहिती ह्या लेखामध्ये दिली आहे.

पक्षाघात हा मेंदूसंबंधी एक गंभीर असा न्यूरोमस्क्युलर आजार आहे. यावर वेळीच उपचार न केल्यास रुग्णांमध्ये कायमचं अपंगत्वही येऊ शकते. उजव्या बाजूच्या मेंदूमध्ये जेंव्हा बिघाड होतो तेंव्हा डाव्या बाजूच्या हात-पाय आणि चेहऱ्यावर परिणाम होतो आणि डाव्या बाजूच्या मेंदूमध्ये जेंव्हा बिघाड होतो तेंव्हा उजव्या बाजूच्या हात-पाय आणि चेहऱ्यावर परिणाम होतो व शरीर लुळे पडते.

पक्षाघाताचे प्रकार :

Types of Paralysis in Marathi
पक्षाघाताचे दोन प्रमुख प्रकार असतात.

1) Ischemic पक्षाघात –
या प्रकारात मेंदुतील रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताची गाठ तयार होते त्यामुळे मेंदूच्या विशिष्ट भागास रक्ताचा पुरवठा बंद झाल्यामुळे पक्षाघात होतो.

2) ‎Hemorrhagic पक्षाघात –
या प्रकारात मेंदुमधील रक्तवाहिन्या फुटून मेंदूत रक्तस्त्राव होऊन पक्षाघात होतो. पक्षाघाताचा झटका आल्यावर सीटी स्कॅन किंवा एमआरआय स्कॅनद्वारे कोणता प्रकार आहे ते उपचार करण्यापूर्वी तपासले जाते.

TIA नावाचा एक तीसरा प्रकारही असतो. TIA म्हणजे Transient Ischemic Attack यामध्ये पक्षाघाताची लक्षणे 24 तासाच्या आत निघून जातात आणि रुग्ण पूर्ववत बरा होतो. मात्र TIA ही Warning असते. एकदा TIA येऊन गेल्यास योग्य उपचार न केल्यास आपणास पुढे पक्षाघाताचा झटका येण्याची शक्यता अधिक असते. तेंव्हा TIA येऊन गेल्याससुध्दा डॉक्टरांकडून निदान आणि उपचार करून घ्यावेत. त्यामुळे पक्षाघाताचा धोका टळण्यास मदत होईल.

पक्षाघाताची लक्षणे :

Paralysis symptoms in Marathi
मेंदूचा रक्त पुरवठा बंद झाल्यामुळे किंवा मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्यामुळे मेंदूला योग्यरित्या रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे मेंदूच्या कार्यावर विपरीत परिणाम होऊन खालील पक्षाघाताची लक्षणे दिसून येतात.
• एका बाजूच्या हाता-पायाची ताकद कमी होते.
• ‎हातापायात लुळेपणा जाणवितो, मुंग्या येतात.
• ‎तोंड वाकडं होते, बोलण्यास त्रास होतो.
• ‎अन्न गिळण्यास आणि श्वास घेण्यास त्रास होतो.
• ‎एका डोळ्याने अंधुक दिसू लागणे.
• ‎चक्कर येणे, तोल जाणे,
• चेतना कमी होणे
• तीव्र डोकेदूखी ही लक्षणे पक्षाघातात असतात. अशी लक्षणे जाणवल्यास त्वरीत वैद्यकीय उपचार होणे आवश्यक असते.

पक्षाघाताची कारणे :

Paralysis causes in Marathi
हाय ब्लडप्रेशर हे पक्षाघाताचे प्रमुख कारण आहे. उच्च रक्तदाबामुळे रक्तवाहिन्यातील लवचिकता कमी होते त्या कमजोर आणि कडक बनतात. कमजोर झालेल्या रक्तवाहिन्या मेंदूमध्ये फुटतात तेंव्हा मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने पक्षाघात होतो. पक्षाघाताचे हे कारण मुख्यतः उतारवयात अधिकतेने आढळते. हाय ब्लडप्रेशरविषयी माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा..

तसेच मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यामध्ये रक्ताची गुठळी तयार झाल्याने किंवा चरबीचे, बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा होण्याचा मार्ग बंद झाल्यामुळेही पक्षाघात होतो.

पक्षाघात होण्याची अन्य सहाय्यक कारणे :
हाय ब्लडप्रेशर, हृदयविकार, मधुमेही रुग्ण, लठ्ठपणा आणि बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असणाऱ्या रुग्णांमध्ये पक्षाघाताचा अधिक धोका संभवतो.
• ‎याशिवाय आधी TIA होऊन गेल्यास वैद्यकीय उपचार न केल्यास,
• ‎55 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये,
• ‎धुम्रपान-सिगारेट, तंबाखु व मद्यपान यासारखे व्यसन करणाऱ्या व्यक्तींमध्ये,
• ‎नियमित व्यायाम न करणाऱ्या व बैठी जीवनशैली अंगीकारलेल्या व्यक्तींमध्ये,
• ‎तेलकट, तुपकट, चरबीजन्य पदार्थ, फास्टफूड, खारट पदार्थ अतिप्रमाणात खाणाऱ्या व्यक्तींमध्ये,
• ‎कुटुंबात पक्षाघाताची अनुवंशिकता असल्यास,
• ‎गर्भनिरोधक गोळयांचा अतिवापर करणाऱ्या स्त्रियांमध्ये,
• ‎अतिमानसिक तणावामुळे पक्षाघाताचा धोका संभवतो.
उपरोक्त व्यक्तींना पक्षाघात होण्याचा अधिक धोका असतो.

लक्षात ठेवा ‘FAST’..

पक्षाघाताची लक्षणे ओळखण्यासाठी ‘FAST’ लक्षात ठेवा..
F – Face (Facial Weakness) : रुग्णास हसण्यास सांगा. हसताना एका बाजूचा चेहरा, ओठ आणि डोळे लटकलेले दिसल्यास ते पक्षाघाताचे लक्षण असते.

A – Arms (Arm Weakness) : रुग्णाला त्याचे दोन्ही हात पुढे व वर उचलण्यास सांगा. जर रुग्णाचा एक हात वर व समोर उचलता येत नसल्यास ते पक्षाघाताचे लक्षण असते.

S – Speech (Speech Difficulty) : रुग्णास प्रश्न विचारून तो व्यवस्थित बोलतो का ते पहा. जर त्याला बोलताना त्रास होत असल्यास ते पक्षाघाताचे लक्षण असते.

T – Time (Time to Act) : वरील लक्षणे रुग्णामध्ये दिसून आल्यास वेळ न दवडता रुग्णाला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जावे. जवळ वाहतुकीचे साधन नसल्यास 108 या नंबरवर फोन करून रुग्णवाहिका बोलावून घ्या. पक्षाघाताचा झटका आल्यानंतरची पहिले 3 तास हे Golden Period असतात ह्या काळामध्ये रुग्णावर उपचार केल्यास रुग्ण लवकरात लवकर बरा होतो तसेच पक्षाघाताच्या झटक्यामुळे मेंदूमध्ये होणारा बिघाड थांबवता येऊ शकतो. रुग्णास वेळीच उपचार मिळाल्यास पुढील मोठा धोका टळू शकतो.

एखाद्यास पक्षाघाताचा अटॅक आल्यास काय करावे..?

Paralysis treatment in Marathi
एखाद्यास पक्षाघाताचा अटॅक आल्यास रुग्णाला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जावे. जवळ वाहतुकीचे साधन नसल्यास 108 नंबरवर फोन करून रुग्णवाहिका बोलावून घ्या व रुग्णास हॉस्पिटलमध्ये दाखल करा. पक्षाघातावर 3 तासाच्या आत हॉस्पिटलमध्ये उपचार होणे आवश्यक असते.

Web title – Paralysis symptoms, causes, diagnosis & treatment in marathi language.

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...