Thyroid problem in Marathi, thyroid problems treatment in Marathi, causes and symptoms of thyroid problems in Marathi.

थायरॉइडचा त्रास :

Thyroid information in Marathi
आपल्या गळ्यात असलेली अवघ्या 20 ते 25 ग्रॅम वजनाची थायरॉइड ग्रंथी ही शरीराच्या अनेक महत्वाच्या क्रियांना नियंत्रित करत असते. गळ्यात असलेली थायरॉइड ग्रंथी ही थायरॉक्सिन (T4) आणि ट्रायोडॉथ्रोनाइन (T3) या दोन महत्त्वपूर्ण हार्मोन्सची निर्मिती करते.

शरीरातील पचनक्रिया समतोल राखण्याचं महत्त्वपूर्ण काम थायरॉईड ग्रंथी करते. यामधून स्रवणारं हार्मोन शरीराचं तापमान समतोल राखण्याचं, मेंदू तंदुरुस्त ठेवण्याचं, हृदयाची क्रिया सुरळीत ठेवण्याचं कार्य करतात. जर, या ग्रंथीच्या क्रियेत अडथळे आल्यास भविष्यात अनेक गंभीर विकारांना सामोरे जावे लागू शकते. वेळीच थायरॉईडची तपासणी करून योग्य उपाययोजना करून आपण थायरॉइडच्या विकारांमुळे पुढे होणारा त्रास टाळू शकतो.

थायरॉईडचा त्रास होण्याचा धोका जास्त कोणाला असतो..?
Thyroid risk factors in Marathi
थायरॉइडचा त्रास हा स्त्रियांना अधिक होत असतो. एका अनुमानानुसार भारतात आठपैकी एका स्त्रीला थायरॉइडचा त्रास होत असतो. याचं कारण म्हणजे शरीरात होणारे हार्मोनल बदल. महिलांमध्ये आयोडिनची कमतरता असण्याची शक्यता सर्वाधिक असते. त्यामुळे महिलांमध्ये थायरॉईडचं प्रमाण जास्त असतं.

थायरॉइड संबंधित प्रमुख विकार कोणते आहेत..?

Thyroid problem types in Marathi
(1) हायपोथायरॉइडिझम (Hypothyroidism)
(2) हायपरथायरॉइडिझम (Hyperthyroidism)
(3) गलगंड (गॉइटर)

(1) हायपोथायरॉइडिझम –
Hypothyroidism in Marathi
हायपोथायरॉइडिझम ह्या विकारात थायरॉइड संप्रेरकांचे (हॉर्मोन्स) रक्तातील प्रमाण कमी होते. लठ्ठपणा – वजन वाढणे, अशक्तपणा, थकवा जाणवणे, शौचास साफ न होणे, नैराश्‍य, केस कोरडे होणे, अकाली पांढरे होणे, केस भरपूर प्रमाणात गळू लागणे, कोरडी त्वचा, थंडीचा त्रास होणे, हृदयाची ठोक्‍याची गती मंदावणे यासारखी प्रमुख लक्षणे आढळून येतात. हा विकार शोधण्यासाठी थायरॉईड प्रोफाइल टेस्ट करून घ्यावी. थायरॉइडच्या एकंदरी रुग्णांपैकी साधारणत: 60 ते 70 टक्के रुग्णांना हायपोथायरॉइडचा आजार असतो आणि स्त्रियांमध्ये हा आजार पुरुषापेक्षा 4 ते 5 पटीने अधिक असतो.

हायपोथारॉइडचे निदान झाल्यावर उपचारासाठी आपले डॉक्टर थायरॉक्झीनची गोळी देतात. ही गोळी पुरेशा मात्रेमध्ये दररोज सकाळी उपाशीपोटी घ्यावी व गोळी घेतल्यावर कमीत कमी एक तास काही खाऊ किंवा पिऊ नये. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली व योग्य त्या मात्रेमध्ये थॉयरॉक्झीनच्या गोळ्या घ्याव्यात व योग्य आहार, नियमित व्यायाम, नियमित तपासणी आणि आपल्या डॉक्टरांनी दिलेल्या सूचना पाळाव्यात कारण हायपोथायरॉइड हा आजार 100 टक्के बरा होत नाही मात्र योग्य औषधे, व्यायाम, आहार याद्वारे तो 100 टक्के नियंत्रणात ठेवता येतो.

(2) हायपरथायरॉइडिझम –
Hyperthyroidism in Marathi
थायरॉइड हार्मोन्सचे अतिउत्पादन करणारा हायपरथायरॉइडिझम हा सर्वसामान्यपणे आढळणारा विकार आहे. थायरॉइड जास्त प्रमाणात तयार झाल्यामुळे हायपरथायरॉइडिझम हा विकार होऊ शकतो. ग्रेव्ह्ज विकार हा हायपरथायरॉइडिझमसाठी कारणीभूत ठरणारा घटक आहे.
यामध्ये हृदयाची धडधड अधिक वाढणे, थायरॉइड ग्रंथीची वाढ होणे, अशक्तपणा, निद्रानाश, वजन कमी होणे, हातामध्ये कंप येणे, घाम सुटणे, मांसपेशी दुर्बल होणे ही लक्षणे हायपरथायरॉइडिझमची असू शकतात. हा विकार शोधण्यासाठी थायरॉईड टेस्ट करून घ्यावी.

(3) गलगंड (गॉइटर) –
Goiter in Marathi
गलगंड विकारात थायरॉइड ग्रंथी आकाराने अधिक वाढते. हायपोथायरॉइडिझम तसेच हायपरथायरॉइडिझम विकारामुळे, शरीरात आयोडिनची कमतरता निर्माण होणे यासारख्या कारणामुळे गलगंड होतो. यासाठी सरकार आयोडीनयुक्त मिठाचा आहारात उपयोग करण्याची सूचना देत असते.

थायरॉइडचे निदान :

Thyroid test in Marathi
वरीलप्रमाणे लक्षणे आढळल्यास डॉक्‍टरांकडून Thyroid Functional Test (TFT) नावाची तपासणी करून घ्यावी. या तपासणीमध्ये T3, T3RU, T4 आणि TSH अशा चार चाचण्यांचा समावेश असतो. या चाचण्यांमध्ये जर कमी किंवा जास्तपणा आढळला, संप्रेरकाचे प्रमाण कमी असेल किंवा जास्त असेल तर त्यावर त्वरित उपचार करून घ्यावेत.

T3, T4 आणि TSH टेस्टचे नॉर्मल प्रमाण किती आहे..?
T3 चे नॉर्मल प्रमाण – 80 – 200ng/dl
T4 चे नॉर्मल प्रमाण – 4.5 – 11.7 mcg/dl
TSH नॉर्मल प्रमाण – 0.3 – 5U/ml

T3, T4 आणि TSH टेस्ट करण्यासाठी किती खर्च येऊ शकतो..?
ह्या टेस्टसाठी साधारण 400 ते 1000 रुपये खर्च येऊ शकतो. थायरॉइड प्रोफाइल टेस्टची अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

थायरॉईडचा त्रास होऊ नये म्हणून काय करावे उपाय..?

थायरॉइडचे विकार होऊ नयेत यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम आणि नियमित वैद्यकीय तपासणी केल्यास थायरॉइड विकार टाळता येणे शक्य आहे.

योग्य आहार (Thyroid diet chart) – हिरव्या पालेभाज्या, तंतुमय पदार्थांचा आहारात समावेश असावा. आहारात आयोडिन, लोहयुक्त पदार्थांचा समावेश करा.
वजन वाढविणारे साखर, मिठाई, मैदा, बेकरीचे पदार्थ, तेलकट पदार्थ यांपासून दूर राहावे. वजन वाढल्यामुळे थायरॉइडच्या सामान्य क्रियेस बाधा निर्माण होते.

नियमित व्यायाम – नियमित व्यायाम केल्याने वजन आटोक्यात राहते. निराशा नाहीशी होऊन उत्साह वाढतो. व्यायामामुळे ब्लडसर्क्युलेशन योग्यरीत्या होते त्यामुळे रक्तातील थायरॉइड स्त्राव शरीराच्या सर्व पेशींपर्यंत पोहोचण्यास मदत होते.

वैद्यकीय तपासणी – जर आपणास वजन वाढणे किंवा कमी होणे, हृदयाची धडधड वाढणे, थकवा येणे, केस गळू लागणे यासारखी लक्षणे दिसून येत असल्यास आपल्या डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या.

नियमित तपासणी :
थायरॉईड प्रोफाइल टेस्ट थायरॉइड विकाराची अचूक माहिती देते. सध्या थायरॉईड होण्यासाठी कोणत्याही प्रकारची वयोमर्यादा सांगता येत नाही. त्यामुळे ज्यांना थायरॉईड नाही त्यानी 2 ते 3 वर्षातून एकदा आणि ज्यांना थायरॉईड आहे त्यांनी वर्षातून एकदा तपासणी करावी. थायरॉइड प्रोफाइल टेस्टची अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

अशाप्रकारे आपण योग्य आहार, नियमित व्यायाम आणि नियमित वैद्यकीय तपासणी याद्वारे थायरॉइड विकार टाळू शकतो.

थायरॉइडचा त्रासासंबंधित खालील उपयुक्त माहितीही वाचा..
डायबेटीस कारणे, लक्षणे आणि उपाय
वजन वाढण्याची समस्या आणि उपाय

thyroid mahiti marathi, thyroid karne, lakshne, test, gharguti upay, home remedies, upchar marathi TSH test in Marathi. thyroid test Marathi.