Dr Satish Upalkar’s article about Thyroid Test in Marathi.

थायरॉइड टेस्ट – Thyroid Test in Marathi :

थायरॉइड ही आपल्या शरीरातील अतिशय महत्त्वपूर्ण अशी एक ग्रंथी आहे. थायरॉइड ग्रंथी शरीरात गळ्याजवळ असते. तिचा आकार एखाद्या फुलपाखरासारखा असतो. या ग्रंथीतून T3 आणि T4 या संप्रेरकांची (हार्मोन्स) निर्मिती होते. शरीरक्रिया सुरू ठेवण्यासाठी या हार्मोन्सची गरज असते. शरीरातील बहुतेक क्रियांचा वेग हा या हार्मोन्सवर अवलंबून असतो. थायरॉइड ग्रंथींतून स्र्वणाऱ्या संप्रेरकांमुळे शरीराचं तापमान मर्यादित ठेवलं जातं. रक्तपेशी निर्माण होतात. हृदयाचे कार्य, मेटॅबॉलिझम, पचनसंस्थेचे कार्य, मेंदूच्या विकासासाठी, स्नायू व हाडांच्या आरोग्यासाठी थायरॉईड ग्रंथीचे खूप महत्त्वाचे कार्य असते.

थायरॉइड फंक्शन टेस्ट म्हणजे काय ..?

थायरॉइड फंक्शन टेस्ट यामध्ये रक्तातील T3, T4, TSH ची तपासणी केली जाते. थायरॉइड फंक्शन टेस्टला ‘थायरॉइड प्रोफाइल टेस्ट’ या नावानेही ओळखले जाते. T3 म्हणजे Triiodothyronine, T4 म्हणजे Thyroxine आणि TSH म्हणजे thyroid stimulating hormone.

थायरॉइड फंक्शन टेस्टमुळे थायरॉईड ग्रंथी जास्त प्रमाणात कार्य (hyperthyroidism) करते की कमी प्रमाणात कार्य करते (hypothyroidism) ते तपासले जाते.

हायपर-थायरॉईडीजम या स्थितीमध्ये थायरॉईड हार्मोन्सचे प्रमाण जास्त वाढते. यामुळे एकाएकी वजन कमी होणे, घाम सुटणे, अनियमित हृदयाचे ठोके असणे, हृदयाची धडधड वाढते, डोळे मोठे होतात अशी लक्षणे असतात.

तर हायपो-थायरॉईडीजम या स्थितीमध्ये थायरॉईड हार्मोन्सचे प्रमाण भरपूर कमी होते. यामुळे एकाएकी वजन वाढणे, त्वचा कोरडी पडणे, पोट साफ न होणे (कॉन्स्टिपेशन), भरपूर थंडी वाजणे, हृदयाची ठोके मंदावणे यासारखी लक्षणे असू शकतात. तेंव्हा आपले डॉक्टर T3, T4 आणि TSH च्या तपासणीसाठी थायरॉइड प्रोफाइल टेस्ट करण्यासाठी सांगतात.

थायरॉईड टेस्ट करण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी..?

  • ही एक रक्त चाचणी असून थायरॉईड टेस्ट करण्यासाठी रुग्णाचे रक्त घेऊन ते त्याची लॅबमध्ये तपासणी केली जाते.
  • टेस्ट करण्यापूर्वी काही तास उपाशी राहावे लागू शकते.
  • टेस्ट करण्यापूर्वी amiodarone, thiourea, lithium, phenylbutazone, sulfonamides किंवा संतती नियमन गोळ्या घेऊ नये कारण त्यामुळे Total Thyroxine (T4) च्या रिपोर्टमध्ये फरक पडू शकतो.
  • तसेच टेस्ट करण्यापूर्वी carbimazole, methimazole ह्यासारखी औषधे घेऊ नका कारण त्यामुळे TSH रिपोर्टमध्ये फरक पडू शकतो.
  • प्रेग्नन्सीमध्ये T3, T4 levels मध्ये फरक पडू शकतो.

थायरॉईड टेस्ट नॉर्मल रिझल्ट चार्ट – Thyroid test Normal range in Marathi :

T3 चे नॉर्मल प्रमाण – 80 – 200ng/dl
T4 चे नॉर्मल प्रमाण – 4.5 – 11.7 mcg/dl
TSH नॉर्मल प्रमाण – 0.3 – 5U/ml

थायरॉईड टेस्ट रिपोर्ट काय सांगतो..?

T3, T4 आणि TSH टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट नॉर्मल आल्यास, थायरॉईड ग्रंथी योग्य प्रकारे कार्य करीत आहे असे समजावे.

जर T3 आणि T4 चे प्रमाण नॉर्मलपेक्षा जास्त असल्यास हायपर-थायरॉईडीजम (Hyperthyroidism), Hashimoto’s thyroiditis, Grave’s disease, subacute thyroiditis (थायरॉईडला सूज येणे), toxic multinodular goiter, थायरॉईड कँसर यापैकी कोणताही थायरॉईड विकार असल्याचे सूचित होते.

जर T3 आणि T4 चे प्रमाण नॉर्मलपेक्षा कमी असल्यास हायपो-थायरॉईडीजम (Hyporthyroidism), subacute thyroiditis (थायरॉईडला सूज येणे), आयोडीनची कमतरता किंवा आयोडीनचे प्रमाण जास्त असणे, pituitary dysfunction, idiopathic myxedema यापैकी कोणताही थायरॉईड विकार असल्याचे सूचित होते.

जर फक्त TSH levels वाढलेली असेल व T4, T3 चे प्रमाण नॉर्मल असल्यास सौम्य स्वरूपाचा हायपो-थायरॉईडीजम (mild hypothyroidism) असल्याचे सूचित होते.

जर TSH चे प्रमाण कमी असल्यास ते हायपर-थायरॉईडीजम (hyperthyroidism) असल्याचे सूचित करते. आणि जर TSH, T4 आणि T3 ह्या तीनही घटकांचे प्रमाण नॉर्मलपेक्षा कमी असल्यास nonthyroidal illness or pituitary hypothyroidism असल्याचे सूचित होते.

थायरॉईड टेस्ट ची किंमत – Thyroid test price in Marathi :

थायरॉईड टेस्ट करण्यासाठी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर अशा महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी साधारण 400 ते 1000 रुपये खर्च येऊ शकतो.

Written by - डॉ. सतीश उपळकर
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास येथे क्लिक करून आमचे YouTube चॅनल Subscribe करा.

थायरॉईड रुग्णांना उपयुक्त असे माहितीपर मराठी pdf पुस्तक मोफत डाऊनलोड करण्यासाठी खालील फॉर्मद्वारे संपर्क साधा. Pdf मोफत पुस्तक हे WhatsApp Number वर पाठवण्यात येईल.

हे सुद्धा वाचा..
थायरॉईडच्या त्रासाविषयी मराठीत माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

In this article information about thyroid Function Test meaning, normal range and cost details in Marathi language. T3, T4 & TSH Test is Also known as Thyroid Function Test. This Article is written by Dr Satish Upalkar.

माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल जरूर Subscribe करा.


सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...