Welcome to HealthMarathi.com’s ‘About page’ and here you will get one step closer to ‘us’. You will be getting to know about Health Marathi and me, more closely and probably after reading this, you might like to join us on various social networking sites.

HealthMarathi.com is one of the leading online provider of health information services for consumers, doctors & healthcare professionals in Maharashtra (India). HealthMarathi.com, currently ranks top one in terms of traffic in the health category and among the top health sites in the Marathi language.

We provide the expert guidance and daily tools you need to make the best health choices, actively manage your health conditions and live healthier lives. All of our content is edited and authenticated by doctors and healthcare professionals.

HealthMarathi.com’s mission is to empower consumers, doctors and healthcare professionals globally with authentic, accurate, timely and personalized health information and provide them tools to allow for better management of health, provide better care to patients, and lead healthier lives.

HealthMarathi.com was founded by Dr. Satish Vitthal Upalkar. HealthMarathi.com was originally designed with the social goal of educating consumers about health and providing physicians and professionals with the tools to use technology and the Internet to improve health care. To further this mission, HealthMarathi.com launched as a website in 2012-13 and has grown steadily since its inception.

आमच्याविषयी :
आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या जगामध्ये लोकांकडून आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हृद्रोग, मधुमेह, कैन्सर, स्थुलता, उच्च रक्तदाब यासारखे नानाविध विकार होत आहेत. अशा विकारांमुळे अकाली मृत्युचेही प्रमाण वाढले आहे. शिवाय न परवडणारा वैद्यकीय खर्च पहाता, निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे बनले आहे.

आरोग्याविषयी माहिती असल्यास लोक आरोग्यविषयी जागरुक असतात. चांगल्या आरोग्यासाठी काय करावे, काय करु नये याचा विचार करतात. लोकांमध्ये आरोग्य जनजागृती होऊन त्यांच्या आरोग्याचा दर्जा सुधारावा यासाठी आम्ही ‘हेल्थ मराठी’ वेबसाईट आणि अॅप च्या माध्यमातून एक प्रयत्न केला आहे.
यामुळे लोकांना आरोग्याची माहिती सहजतेने मिळणार आहे. व्यसनाधीनता-परीणाम, रक्तदान, अवयवदान, स्त्री-भ्रुण हत्या, कुपोषण यासारख्या सामाजिक प्रश्नांवर यामाध्यमातून प्रभावी कार्य करण्यास मदत होणार आहे. आरोग्य योजनांची लोकांपर्यंत माहिती याद्वारे पोहचण्यास मदत होईल. पर्यायाने आरोग्याविषयी जनजागृकता निर्माण होण्यास मदत होईल.

‘हेल्थ मराठी’ नेटवर्कच्या माध्यमातून आरोग्याविषयी इत्यंभूत माहिती दिली जाणार आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे असे आरोग्य आहे. त्यामुळे प्रत्येकाला आरोग्याविषयी सामान्य माहिती असणे आवश्यक असते. कारण उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती असते. आरोग्यासाठी चांगले काय आहे? वाईट काय आहे? याचे सामान्य ज्ञान असल्याशिवाय उत्तम आरोग्य कसे राखता येईल. आरोग्य उत्तम राखण्यासाठी, आरोग्य संपन्न राहण्यासाठीचे मार्गदर्शन या माध्यमातून केले जाणार आहे.

‘हेल्थ मराठी’ मध्ये विभागवार आरोग्यविषयक माहिती दिली आहे. यामध्ये प्रथमोपचार, आहार व पोषण, विविध रोगांची माहिती, संसर्गजन्य रोग, पुरूषांचे आरोग्य, स्त्रियांचे आरोग्य, गर्भावस्था, मुलांचे आरोग्य, स्मार्ट हेल्थ टिप्स, सामाजिक आरोग्य विविध तपासण्या आणि आरोग्य योजना असे विभाग आहेत.

प्रथमोपचारांची माहिती :
प्रथमोपचाराबद्दल पूर्ण माहिती असणे हे सर्वसामान्य नागरिकाचे कर्तव्य आहे. दुर्घटना कधीही सांगून होत नाही. घरात किंवा घराबाहेर प्रत्येकाला या दुर्घटनेशी सामना करावा लागतो. अशा वेळी न घाबरता, डोकं शांत ठेवून झटपट उपचार करणं आवश्यक असतं. यासाठी येथे सर्पदंश होणे, कापणे, अपघात होणे, हार्ट अटैक, भाजणे, बुडणे यासारख्या दुर्घटनांवर करावयाच्या प्रथमोपचारांची माहिती दिली आहे.

प्रमुख रोगांची माहिती :
‘हेल्थ मराठी ‘ अॅपमध्ये महत्वाच्या विविध रोगांची माहिती दिली आहे. त्यांची कारणे, लक्षणे, निदान पद्धती, उपचारासंबंधी मार्गदर्शन याबरोबरचं मुळात हे रोग उत्पन्नचं होऊ नये यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती या माध्यमातून दिली जाणार आहे.

जीवनशैली मार्गदर्शन :
योग्य-अयोग्य आहारासंबंधी सविस्तर माहिती येते देण्यात येणार आहे. आहारातील पोषकघटक, जीवनसत्वे, खनिजे इ. ची माहिती दिली जाणार आहे. प्रमुख आहारद्रव्यातील घटकांची सर्वांना कळेल अशी आणि उपयुक्त अशी माहिती या माध्यमातून दिली जाणार आहे. याशिवाय योग, व्यायामासंबधी उपयुक्त माहिती येथे उपलब्द केली जाणार आहे.

वैयक्तीक आरोग्य :
पुरुषांचे आरोग्य, पुरुषांसंबंधी विकारांची माहिती, स्त्रियांचे आरोग्य, स्त्रीयांसंबंधी विकार, वंधत्व निवारण, गर्भावस्थासंबंधी आरोग्य मार्गदर्शन, मुलांचे आरोग्य या सर्वांची विस्तृत आरोग्यविषयक माहिती या माध्यमातून देण्यात येणार आहे. जेणेकरुन वैयक्तिक आरोग्याचा दर्जा उंचावण्यास मदत होईल.

सामाजिक आरोग्य :
या माध्यमातून सामाजिक आरोग्याच्या समस्यांवर प्रकाश टाकण्यात येईल. धुम्रपान, मद्यपान यासारखी व्यसनाधिनता व त्याचे दुष्परीणामांची माहिती, सामाजिक आरोग्य बिघडवणारी जलप्रदुषण, वायुप्रदुषण, ध्वनीप्रदुषण आणि त्यांचा आरोग्यावरील परिणाम तसेच स्त्रीभ्रुण हत्या संबंधी प्रवृत्तीच्या परिणामांचे विश्लेषण येथे करण्यात येणार आहे. तसेच या समस्यांवरील उपाययोजनांचे सुद्धा मार्गदर्शन केले जाणार आहे.

आरोग्य योजनांची माहिती :
आरोग्यासाठी शासनातर्फे विविध योजना राबवल्या जातात. मात्र केवळ माहितीअभावी या योजनांचा लाभ होण्यापासून अनेक गरजू व्यक्ती वंचित राहतात. यासाठी या माध्यमातून एकाच ठिकाणी उपलब्द सर्व योजनांची माहिती दिली जाणार आहे.

आरोग्य एक्स्ट्रा :
याशिवाय विविध तपासण्यासंबंधी शंकांचे निरसण, स्मार्ट हेल्थ टिप्स, Health advice द्वारे अधिकाधिक आरोग्याविषयक उपयुक्त माहिती सर्वांसाठी खुली केली जाणार आहे.

आमचे ध्येय आणि उद्दिष्ठ्ये :
अधिकाधिक व्यक्तिंना आरोग्याच्या दृष्टीने जागरुक करुन त्यांना आरोग्यसंपंन्न बनविण्याचे आमचे उद्दिष्ठ आहे.

‘महाहेल्थ’ अॅप
‘महाहेल्थ’ हे अॅप आपण गुगल प्ले वरुन आपल्या अँड्रॉईड स्मार्टफोनवर इन्स्टॉल करू शकाल. यासाठी गुगल प्ले वर फक्त ‘MahaHealth’ असे सर्च करा.
किंवा खालील लिंक क्लिक करून आपण हे अॅप इन्स्टॉल करू शकाल.
https://play.google.com/store/apps/details?id=com.healthtips.marathi.app