व्यायाम कसा करावा..?
नियमित व्यायाम करण्याचे अनेक फायदे आहेत. आपले वजन आटोक्यात राहते, शरीर मजबूत आणि निरोगी बनते. असे असूनही व्यायाम करताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते. त्यामुळे योग्य काळजी न घेता केलेल्या व्यायामाने होणारे नुकसान टाळता येईल. व्यायाम कसा करावा? किती प्रमाणात करावा? योग्य व्यायाम प्रकार कसा निवडावा? यासंबंधी अनेक प्रश्न निर्माण होतात.
ह्या व्यायाम टीप्सची माहिती जाणून घ्या..
- चालण्याचा व्यायाम
- सायकलचा व्यायाम
- पोहण्याचा व्यायाम
- वजन कमी करण्यासाठी फिटनेस टीप्स
- वजन वाढवण्यासाठी टीप्स
- उंची वाढवण्यासाठी फिटनेस टीप्स
- गरोदरपणातील व्यायाम
व्यायाम करताना घ्यावयाची काळजी –
- कोणता व्यायाम आपण करू शकतो, व्यायाम किती वेळ करावा, किती जोमाने करावा, कसा करावा या सर्व गोष्टी आपल्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने समजून घेऊनच व्यायाम सुरू करावा.
- नियमित व्यायाम, योगासने करावित. दररोज किमान 30 ते 45 मिनिटे व्यायाम करावा.
- व्यायाम सुरु करताना सुरवातीस कमी प्रमाणात करुन दररोज थोडा-थोडा व्यायाम वाढवत जावे.
- एकाच दिवशी जास्त प्रमाणात व्यायाम करु नये.
- जेवणानंतर 10 मिनिटे व्यायाम करू नका. नाही तर हृदयावर आणि पचनसंस्थेवर जास्त ताण पडतो.
- उन्हाळ्यात व्यायाम करताना काळजी घ्यावी. जास्त उन्हात हे व्यायाम केल्याने उष्माघातासारखे विकार होऊ शकतात. शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं, गोळे येऊ शकतात, तुमची त्वचा गरम, लाल आणि शुष्क होऊ शकते. तेव्हा सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळात उन्हात व्यायाम करणं टाळा.
- व्यायामाआधी साधारण 20 मिनिटं ग्लासभर थंड पाणी प्या. व्यायाम चालू असतानादेखील दर 10 ते 20 मिनिटांनी थोडे थोडे पाणी पीत राहा.
- व्यायाम करताना सुती, तलम आणि सैल कपडे घाला. सलग 45 मिनिटं व्यायाम केल्यास 10 मिनिटांची सक्तीची विश्रांती घ्या.
- सीमेंट किंवा डांबरी रस्त्यावर चालणार असाल, धावणार असाल तर चांगले बूट वापरावे.
नव्याने व्यायाम कसा सुरू करावा..?
- तुम्ही बरीच वर्षे व्यायाम केला नसेल आणि तुमची लाइफस्टाइल बैठी असल्यास,
- तुमचं शारीरिक वजन जास्त असल्यास,
- तुम्हाला हृदय विकार, मधुमेह, रक्तदाब, सांधेदुखीचा त्रास असल्यास,
- तुम्हाला धाप लागत असल्यास,
- धूम्रपान, मद्यपानाचे व्यसन असल्यास व्यायामास सुरुवात करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या सल्ल्याने व्यायामाचे नियोजन करावे. यामुळे योग्य काळजी न घेता केलेल्या व्यायामाने होणारे नुकसान टाळता येईल.
हे सुद्धा वाचा..
वजन कमी करण्यासाठी टिप्स जाणून घ्या..
Read Marathi language article about Exercise tips. Last Medically Reviewed on February 23, 2024 By Dr. Satish Upalkar.