Dr Satish Upalkar’s article about Varicose veins in Marathi.

Causes, Symptoms & Treatments of Varicose veins in Marathi article by Dr Satish Upalkar.

व्हेरिकोज व्हेन्स – Varicose veins in Marathi :

अनेकांना व्हेरिकोज वेन्सचा त्रास असतो. व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे अशुद्ध रक्तवाहिन्यामध्ये (शिरामध्ये) रक्त एका ठिक़ाणी जमा होते आणि यामुळे शिरा फुगतात. यामुळे शिरामध्ये प्रचंड वेदना होतात त्याठिकाणी सूज येते. खूप वेळ उभे राहणाऱ्या लोकांमध्ये हा त्रास होण्याचे प्रमाण जास्त आहे. येथे व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे काय, व्हेरिकोज व्हेन्सची कारणे, लक्षणे आणि उपचार याची माहिती डॉ. सतीश उपळकर यांनी दिली आहे.

व्हेरिकोज व्हेन्स होण्याची कारणे – Varicose veins causes in Marathi :

  • उतारवयात म्हणजे वयाच्या 50 शी नंतर हा त्रास होऊ शकतो,
  • ‎कौटुंबिक अनुवांशिकता असल्यास,
  • ‎गरोदरपणात स्त्रियांना हा त्रास होऊ शकतो,
  • लठ्ठपणामुळे,
  • ‎व्यायामाचा अभाव,
  • ‎सिगारेट-धूम्रपान व्यसनामुळे,
  • ‎उंच टाचेच्या चप्पल वापरल्यामुळे,
  • ‎आहारातून मिठाचे जास्त सेवनाने,
  • ‎बराच काळ उभे किंवा बसून रहाण्याची सवय असल्यास व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास होऊ शकतो.

तसेच शरीरात अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या शिरा योग्यप्रकारे कार्य करत नसतात तेंव्हा ही समस्या प्रामुख्याने होत असते. रक्तवाहिन्यामध्ये एकतर्फी वाल्व्ह असतात त्यामुळे रक्त परत मागे वाहून जाण्यापासून रोखले जाते. मात्र जेव्हा ही झडप कार्य योग्यरीत्या करीत नाही तेव्हा रक्त आपल्या हृदयाकडे जाण्याऐवजी शिरांमध्ये जमा होऊ लागते. याचा त्रास प्रामुख्याने पायांच्या शिरांवर झालेला अधिक आढळतो.

व्हेरिकोज व्हेन्सची लक्षणे – Varicose veins Symptoms in Marathi :

  • शिरामध्ये रक्त जमा होऊन तेथे गाठी तयार होतात,
  • अशुद्ध रक्त साठून राहिल्याने शिरा फुगतात,
  • शिरांच्या ठिकाणी सूज येते,
  • सुजलेल्या शिरा दुखतात,
  • ‎खूप वेळ उभे किंवा बसल्यास पाय दुखणे,
  • ‎पायाच्या शिरा सुजल्यास तेथे खाज येणे, पाय दुखणे, पायावर सूज येणे अशी लक्षणे यात असतात.

कधीकधी त्या शिरातून रक्तस्रावही होऊ लागतो. व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास गंभीर झाल्यास त्याठिकाणी जखम होऊन व्हेरिकोज अल्सर निर्माण होतात.

व्हेरिकोज व्हेन्स उपचार मराठी माहिती – Varicose veins Treatments in Marathi :

कॉम्प्रेशन स्टॉकिंग्ज –
व्हेरिकोज व्हेन्सच्या उपचारामध्ये Compression stocking हे विशिष्ट प्रकारचे वैद्यकीय सॉक्स दिले जातील. ते पायात घातल्यामुळे शिरांमध्ये रक्त जमा होत नाही. तसेच व्हेरिकोज व्हेन्समुळे आलेली सूज व वेदना कमी होण्यासही ह्या कॉम्प्रेशन स्टॉकिंग्जमुळे मदत होते. हे कॉम्प्रेशन स्टॉकिंग्ज मेडिकल स्टोअरमध्ये आपणास मिळू शकतील.

इंजेक्शन थेरपी (Injection therapy) –

यामध्ये विशिष्ट प्रकारचे इंजेक्शन दिले जाते त्यामुळे व्हेरिकोज व्हेन्समधील रक्तप्रवाह थांबवला जातो. व त्यामुळे त्रास दूर होण्यास मदत होते. मोठ्या शिरांसाठी स्क्लेरोथेरपी (Sclerotherapy) चा वापर करतात. तर शिरा लहान असल्यास मायक्रोस्क्लेरोथेरपीचा वापर केला जातो.

हे सुध्दा वाचा – व्हेरिकोज व्हेन्सवरील उपाय जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

लेजर थेरपी (Laser treatment) –
यामध्ये लेजर किरण देऊन व्हेरिकोज व्हेन्समधील रक्तप्रवाह थांबवला जातो.

शस्त्रक्रिया (Surgery) –
व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास अधिक होत असल्यास काहीवेळा वेन-स्ट्रीपिंग (Vein stripping) हे ऑपरेशन केले जाऊ शकते. यामध्ये व्हेरिकोज व्हेन्सचा भाग काढून टाकला जातो.

वेरिकोज व्हेन्सचा त्रास होऊ नये म्हणून घ्यायची काळजी –

अशाप्रकारे जीवनशैलीत बदल केल्यास व्हेरिकोज वेन्सची त्रासदायक समस्या होण्यापासून दूर राहता येईल.

हे सुध्दा वाचा – पायात गोळे येण्याची कारणे व उपाय जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

3 Sources

Information about Varicose veins Causes, Symptoms and Treatments in Marathi language. Article written by Dr Satish Upalkar.

Medically Reviewed By - Dr. Satish Upalkar
Dr. Satish Upalkar is a Healthcare counsultant. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra University of Health Science, Nashik and is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai.
Qualification: Bachelor of Ayurveda Medicine and Surgery (B.A.M.S.)
Medical Council Registration number: I-72800-A
Contact details -[email protected]
Follow - LinkedIn | Facebook | Twitter | YouTube