उंची वाढवणे :

आपली उंची ही अनेक घटकांवर अवलंबून असते. प्रत्येकाला आपली उंची ही अधिक हवी असते. कमी उंचीमुळे अनेक जण निराश असतात. उंची अधिक असेल तर त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व आकर्षित असते. प्रामुख्याने उंची ठरवण्यासाठी 60 ते 80 टक्के जेनेटिक फॅक्टर आणि अनुवांशिक घटक जबाबदार असतात. तर उंचीसाठी आहार पोषण, व्यायाम यासारखे घटक 40 ते 20 टक्के घटक जबाबदार असतात.

साधारणपणे वयाच्या पहिल्या वर्षांपासून ते पौगंडावस्था सुरू होण्यापूर्वी आपली उंची वर्षाला 2 इंच प्रमाणे वाढत असते. तर पौगंडावस्था (puberty) सुरू झाल्यानंतर तेच प्रमाण वर्षाला 4 इंच इतके होते. पौगंडावस्था झाल्यानंतर म्हणजे वयाच्या 18 ते 20 वर्षांनंतर उंची वाढण्याची प्रक्रिया थांबली जाते.

उंची वाढवण्याचे हे आहेत उपाय :

आपली उंची कशी वाढवावी असा अनेकांचा प्रश्न असतो. उंची वाढवण्यासाठी योग्य आहार, व्यायाम यांचे नियोजन ठेवणे आवश्यक असते. यासाठी येथे उंची वाढीसाठी कोणता काय खावे, काय खाऊ नये व कोणता व्यायाम करावा याविषयी माहिती खाली दिली आहे.

उंची वाढीसाठी योग्य आहार घ्या –
वाढत्या वयामध्ये शरीराला अनेक पोषकघटकांची गरज असते. यासाठी प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स, कॅल्शियम व खनजतत्वे युक्त असा योग्य आहार घेणे गरजेचे असते. यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, विविध फळे, धान्ये, कडधान्ये, दूध व दुधाचे पदार्थ, अंडी, मांस, मासे यांचा समावेश असावा.

कॅल्शियम व व्हिटॅमिन D –
उंची वाढण्यासाठी कॅल्शियम व व्हिटॅमिन-D चे महत्वही जास्त असते. हाडांमधील density कमी झाल्याचा परिणाम उंची कमी होण्यावर होत असतो. यासाठी आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थ असावेत. यासाठी दूध व दुग्धजन्य पदार्थ, मासे, अंडी यांचा आहारात समावेश असावा. तसेच आहारातून घेतलेले कॅल्शियम हाडांमध्ये जाण्यासाठी व्हिटॅमिन-D ची गरज असते. व्हिटॅमिन-D साठी सकाळच्या कोवळ्या उन्हात दहा ते 15 मिनिटे बसावे.

उंची वाढण्यासाठी असा करा व्यायाम –
नियमित व्यायामाचे फायदे अनेक आहेत. वाढत्या वयामध्ये नियमित व्यायाम केल्यामुळे वजन आटोक्यात राहते आणि ग्रोथ हार्मोनची (HGH) निर्मितीही होण्यास मदत होते. वाढत्या वयाच्या मुलांनी व्यायामासाठी किमान एक तास दिला पाहिजे. यामध्ये विविध मैदानी खेळांचा अंतर्भाव करता येईल. उंची वाढवण्यासाठी दोरीउड्या, स्ट्रेचिंग व्यायाम, पुलअप्स, जॉगिंग, सायकलिंग, स्विमिंग, सूर्यनमस्कार, योगासने. हे व्यायाम प्रकार करणे गरजेचे असते. रोज सकाळी धावण्याचा व्यायाम केल्यामुळे उंची वाढण्यास मदत होते.

योग्य स्थितीची सवय लावून घ्यावी –
चुकीच्या पद्धतीने खूप वेळ बसणे, वाकून चालणे यामुळे पाठीला बाक किंवा कुबड येण्याची समस्या अनेकांना होत असते. पाठीला बाक आल्यामुळे त्याचा परिणाम उंचीवर होत असतो. यासाठी पाठीला बाक येऊ नये म्हणून लहानपणापासूनच योग्य स्थितीत बसण्याची, ताट समोर बघत चालण्याची सवय (Practice good posture) लावून घ्यावी. चालताना पाठीचा कणा ताट व मान सरळ समोर असावी. यासाठी स्ट्रेचिंग, योगासने यासारखे व्यायाम करावेत यामुळेही पाठीच्या कण्याची लवचिकता वाढण्यास मदत होते. 

पुरेशी झोप घ्यावी –
उंची वाढण्यासाठी पुरेशी झोप घेणेही महत्त्वाचे असते. पुरेशी झोप घेण्यामुळे human growth hormone (HGH) ची योग्य प्रकारे निर्मिती होण्यास मदत होते.

वयानुसार झोप पुढीलप्रमाणे असावी –
• 3 ते 5 वर्षे वयाच्या मुलांसाठी – 10 ते 13 तास झोप आवश्यक
• 6 ते 13 वर्षे वयाच्या मुलांसाठी – 9 ते 11 तास झोप आवश्यक
• 14 ते 17 वर्षाच्या पौगंडावस्थेतील मुलांसाठी – 8 ते 10 तास झोप आवश्यक
• 18 वर्षांपासून पुढे – 7 ते 8 तास झोप आवश्यक असते.

उंची वाढवणारे सप्लिमेंट्स उपयोगी पडतात का..?

उंची वाढवणाऱ्या height growth supplement मध्ये उपयुक्त पोषकघटक प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स, कॅल्शिअम, खनिजे दिली जातात. या Horlicks, Bournvita अशा supplements चा मुलांना उपयोग होऊ शकतो. मात्र अशी supplements सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

योग्य उंची वाढीसाठी अशी घ्यावी काळजी :

• मुलांना सतत अभ्यासाला बसवणे टाळावे. कारण मुलांचा बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक व मानसिक विकास होणे गरजेचे असते.
• शाळकरी मुलांच्या पाठीवर दफ्तराचे वजन जास्त प्रमाणात असू नये.
• चुकीच्या पद्धतीने खूप वेळ बसणे, वाकून चालणे टाळावे.
• स्मार्टफोन, टीव्हीचा अतिरेक टाळावा.
• मुलांना मैदानी खेळ खेळण्यास आणि व्यायाम करण्यास प्रोत्साहन द्यावे.
• वारंवार फास्टफूड, जंकफूड, स्नॅक्स, चिप्स, कोल्ड्रिंक्स यासारखे unhealthy foods खाणे टाळावे. मुलांना योग्य पोषकघटकांनी युक्त असणारा संतुलित आहार द्यावा.आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्ये, विविध फळे, दूध व दुधाचे पदार्थ, अंडी, मांस-मासे यांचा समावेश असावा.

उंची वाढविण्यासाठी काही घरगुती उपाय :

योग्य आहार, नियमित व्यायाम या बरोबरच खालील काही उपाय उंची वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात.
• देशी गाईचे दूध उंची वाढविण्यासाठी फायदेशीर असते. रोज रात्री ग्लासभर देशी गाईचे दूध प्यावे.
• रोज रात्री झोपण्यापूर्वी 2 चमचे अश्वगंधा चूर्ण ग्लासभर दुधातून पिणे उंची वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. उंची वाढीसाठी हा उपयुक्त आयुर्वेदिक उपाय आहे.
• दररोज दोन काळी मिरी थोड्याशा लोण्यासोबत खाणेसुद्धा उंची वाढवण्यासाठी उपयोगी ठरते.

उंची आणि वजन कमी असण्याची समस्या :

अनेकदा वजन कमी असणे ही उंची कमी असण्याचे कारण असू शकते. यासाठी वजनसुद्धा योग्य प्रमाणात असले पाहिजे. अनेकांचे वजन फारचं कमी असते. वजन कसे वाढवावे किंवा वजन वाढवण्यासाठीचे उपाय जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

© लेखक - डॉ. सतीश उपळकर
(महत्वाची सूचना - ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये.)