किडनी स्टोन आणि पथ्य-अपथ्य यांचे महत्व :
मुतखडा आजारात आहाराचे खूप महत्व आहे. चुकीचा आहार घेतल्यामुळे लघवीत युरिक ऍसिड, कॅल्शियम ऑक्सलेट यासारख्या खनिज व क्षार घटकांचे प्रमाण अधिक वाढल्यामुळे मुतखड्याचा त्रास होत असतो. यासाठी मुतखडा रुग्णांनी योग्य आहार घेणे आवश्यक असते.
तसेच मुतखडा पडून गेल्यास किंवा शस्त्रक्रियेने काढून टाकल्यास पुन्हा मुतखडा होण्याचीही शक्यता जास्त असते. त्यामुळे मुतखडा पडलेल्यानीही काही दिवस पथ्य सांभाळणे आवश्यक असते. यासाठी मुतखड्यावरील आयुर्वेदानुसार योग्य पथ्य आणि अपथ्य यांची माहिती खाली दिली आहे.
मुतखडा आजारातील पथ्य :
मुतखडा असणाऱ्या रुग्णांसाठी योग्य आहार पुढीलप्रमाणे आहे..
• दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे.
• दररोज किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे.
• आहारात फायबर्सयुक्त पदार्थ अधिक असावेत.
• हिरव्या पालेभाज्या, विविध फळे समाविष्ट करावीत.
• केळी, डाळींब, द्राक्षे, लिंबू, संत्री ह्यासारखी फळे आहारात असावीत.
• आहारात चाकवत भाजी, शेवग्याच्या शेंगा, मुळा, गाजर, कांदा यांचा समावेश असावा.
• शहाळ्याचे पाणी, उसाचा रस, कुळथाचे कढण (सूप) प्यावे.
मुतखडा आजारातील अपथ्य :
मुतखडा झालेल्या रुग्णांचा अयोग्य आहार पुढीलप्रमाणे आहे..
• आहारातील मिठाचे प्रमाण कमी करावे.
• पापड, लोणची, वेफर्स यासाईखे खारट पदार्थ खाणे टाळा.
• कोल्ड्रिंक्स, खाण्याचा सोडा असलेले पदार्थ खाणे टाळा.
• टोमॅटोच्या बिया, वांगी, भेंडी, वाटाणा, फ्लॉवर, कोबी खाणे टाळावे.
• युरिक ऍसिडचे मूतखडे होत असल्यास मांसाहार, मासे, अंडी यांचे प्रमाण कमी करावे.
• ऑक्सलेट असलेले पदार्थ म्हणजे बटाटा, चॉकलेट, बीट, सुखामेवा, गव्हाचा कोंडा, चहा, पालक इत्यादी पदार्थ कमी करावे.