उच्च रक्तदाब (High Blood Pressure) : कारणे, दुष्परिणाम व उपाय माहिती

6586
views

High blood pressure in Marathi information. High BP Causes in Marathi. High blood pressure prevents tips in Marathi. High bp treatment in Marathi.

उच्च रक्तदाब (High Blood pressure, Hypertension) :
सध्याचे तणावग्रस्त जीवन, अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे उच्च रक्तदाबाच्या विकाराचे प्रमाण वृद्धांबरोबरचं तरुणांमध्येही अधिक वाढले आहे. तरुण वयात उद्भवणाऱ्या या समस्येचे रूपांतर पुढे मोठ्या हृदयविकारात होत आहे. सामान्यतः स्वस्थ व्यक्तीमध्ये 140/90 mm Hg पेक्षा अधिक रक्तदाब वारंवार दर्शवत असल्यास त्या स्थितीस उच्च रक्तदाब असे म्हणतात. रक्तदाब हा रक्तदाबमापक (Sphygmomanometer) यंत्राद्वारे मापला जातो.

उच्च-रक्तदाब एक ‘सायलेंट किलर’ :
अतिरक्तदाब हा विकार कोणतेही लक्षण प्रकट न करता शरीरात कधी निर्माण होतो हे कळत नसल्याने याला Silent Killer असेही संबोधले जाते. कारण उच्च रक्तदाब छुप्या स्वरुपात बराच काळ राहिल्यास आपले हृद्य, किडन्या (मुत्रपिंडे), डोळे, मेंदू या अवयवांवर घातक परिणाम होतो त्यामूळे हृद्यविकाराचा झटका येणे, किडन्या निकामी होणे, दृष्टी जाणे, पक्षाघात यासारखे गंभीर विकार रक्तदाबामूळे उत्पन्न होतात.

उच्च रक्तदाबामुळे होणारे दुष्परीणाम :
उच्च रक्तदाबाची अवस्था निरंतर राहिल्यास धमनीकाठीण्य (Arteriosclerosis) हा विकार उत्पन्न होतो. या विकारामुळे धमन्यांमधील लवचिकता नष्ट होऊन त्या जाड व कठोर बनतात. यामुळे रक्तप्रवाहाचा मार्ग संकीर्ण होऊन रक्तप्रवाहास बाधा निर्माण होते.
सतत उच्च रक्तदाबामुळे हृद्य, किडन्या, डोळे आणि मेंदू या महत्त्वाच्या अवयवांना इजा होऊ शकते. हृदयाचा आकार वाढणं, हृदयाच्या भागात वेदना होणं, हृदयाला रक्तपुरवठा करणार्‍या रक्तवाहिन्यांच्या कामात बिघाड होणं, हृदय कमकुवत होणे, हार्ट अटैक येणे यासारखे परिणाम उच्च रक्तदाबामुळे थेट दिसून येतात.
उच्च रक्तदाबामुळे किडनीच्या कार्यात बाधा निर्माण होणं, अतिउच्च रक्तदाबामुळे मेंदू भोवतीच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्तस्राव होऊन पक्षाघात होण्याचा धोका अधिक असतो.

उच्च रक्तदाबाची कारणे :
धावपळीची जीवनशैली, मानसिक ताणतणाव, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव, बंद पाकिटातील पदार्थ, जंकफूड-फास्टफूड, तुप आणि तेलाचा, मिठाचा आहारातील अधिक वापर, सिगरेट, तंबाखू, दारूचे व्यसन, अपुरी झोप, अपुरी विश्रांती ही कारणंदेखील रक्तदाब वाढण्यात कारणीभूत ठरतात.
याशिवाय शरीरांतर्गत असलेल्या काही आजारांमध्ये रक्तदाब वाढलेला दिसतो. जसे किडनीच्या विकारांमुळे, किडनीवरील ताण वाढून रक्तदाब वाढतो.

मानसिक कारण आणि रक्तदाब –
अचानक बसलेला मानसिक धक्का, भीती, राग, तनाव आदी मानसिक कारणांचा परिणाम निश्चितपणे रक्तदाबावर होत असतो. या मानसिक कारणांमूळे रक्तदाबामध्ये 20 ते 30 mm Hg पर्यंत वाढ होते.

उच्च रक्तदाबाची लक्षणे :
रक्तदाब वाढल्यानंतर त्याची लक्षणं प्रत्येकाला कळून येतातच असं नाही. बर्‍याच वेळा रक्तदाब वाढल्यास,

 • वारंवार डोके दुखणे. डोकं जड होणं,
 • थकवा जाणवणे, चक्कर येणे.
 • कानशिलं गरम होणं,
 • निवांत झोप लागत नाही. झोपमोड होते.
 • छातीत धडधडणे, छातीत कळ येणे, हृद्य स्पंदन अधिक जाणवणे.
 • अल्पश्रमानंतरही श्वास, धाप लागणे.
 • वारंवार चिडचिड होणे.
 • अंधूक दिसणं, अचानक नजर कमजोर होणे, यांसारखी लक्षणे उच्च रक्तदाबामध्ये दिसून येऊ शकतात.

हे करा..
उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ नये यासाठी घ्यावची काळजी,

महाहेल्थ अॅप..
ही सर्व माहिती 'महाहेल्थ' ह्या स्मार्टफोन अॅपमध्ये दिली आहे. या मोफत अॅपमध्ये सर्व आरोग्यविषयक माहिती ऑफलाईनसुध्दा वाचता येईल. हे अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन क्लिक करा.

 • वेळोवेळी वैद्यकीय सल्ला घेतल्यास, गरजेप्रमाणे तपासण्या आणि योग्य उपचार घेतल्यास उच्च रक्तदाबामुळे संभावणार्‍या गुंतागुंती नक्कीच टाळता येतात.
 • यासाठी जीवनशैलीमध्ये बदल करणे आवश्यक.
 • उच्च-रक्तदाब निर्माण करणारया कारणांचा नाश केला पाहिजे.
 • आहारातील मिठाचं, तेला-तुपाचं प्रमाण नियंत्रणात ठेवा.
 • आहारातील मिठाचे प्रमाण कमी करावे. एका दिवसामध्ये 2.5 gm (2500 mg) पेक्षा अधिक मिठाचे सेवन करू नये. यासाठी जेवनाव्यतिरिक्त खाद्य पदार्थांच्या पाकीटावरील सोडियमचे प्रमाण तपासा.
 • वजन आटोक्यात ठेवावे.
 • नियमित व्यायाम, योगासने केल्यास रक्तदाब नियंत्रणात ठेऊ शकतो.
 • मद्यपान, सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन करणे ठाळा.
 • चहा, कॉफीचे अतिसेवन करणे ठाळा.
 • नियमित ताण-तणाव रहित राहावे.

High Blood Pressure in Marathi. High blood pressure causes, symptoms, diagnosis and treatments in Marathi.


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.