MRI टेस्ट म्हणजे काय? (MRI Test in Marathi)

– डॉ. सतीश उपळकर
CEO, हेल्थ मराठी नेटवर्क

MRI Test information in Marathi, MRI Scan About MRI Test, Procedure, Cost, Preparation in Marathi.

MRI टेस्ट :

मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग म्हणजेच MRI मध्ये स्ट्रॉंग चुंबक व रेडिओ लहरींचे पल्सेस वापरल्या जातात. यात वापरण्यात येणार्या रेडीओ लहरी या एका स्ट्रॉंग चुंबकीय फील्डमधून पास होतात. त्यामुळे शरीरातील आतील अवयवांच्या अगदी रिमार्केबल अशा चांगल्या प्रतिमा निघतात.

MRI Test कोणत्या आजाराच्या निदानासाठी वापरतात?
MRI हे मुख्यत्वे करून सॉफ्ट टिश्युजच्या एरीया जसे मसल्स (स्नायू) नर्व्हज, मेंदु व इतर अवयवांच्या परीक्षणासाठी उपयोगात येतं. त्यामुळे मेंदुचे विकार, नाडयांचे विकार, स्नायुंचे विकार, मनक्याचे विकारांच्या निदानासाठी उपयुक्त. MRI हे गेल्या 25 वर्षातील अतिशय महत्त्वाचे असे ऍडव्हॉन्स इमेजिंग तंत्र आहे.

MRI टेस्टसाठी किती वेळ लागतो?
MRI च्या परीक्षणासाठी जवळपास पूर्णपणे 30 ते 60 मिनीट लागू शकतात. MRI एक्झामसाठी ज्या टेबलावर आपण झोपतो तो चुंबकीय क्षेत्रात (मॅग्नेटिक फील्ड) मध्ये सरकतो किंवा स्लाईड होतो. या इक्वीपमेंटद्वारे वेगवेगळ्या कोनातून भरपूर प्रतिमा (इमेजेस) काढल्या जातात. हे मशीन खूप मोठा आवाज करतं, जसे आदळल्यासाखा (बँगिंग), बजींग, टकटक वगैरे!! यामुळे कानात घालून दिलेल्या इअरप्लगमुळे आवाजाची तीव्रता कमी होते.

MRI परीक्षणासाठी विशेष सुचना..
या परीक्षणासाठी न हालता शांत पडून राहाणं गरजेच असतं. ज्यांच्यासाठी झोपून राहाणं किंवा पडून राहाणं त्रासदायक असतं त्यासाठी त्यांच्या फिजिशीयनशी आधी चर्चा करून मेडिकेशन किंवा सिडेशन (झोपेचं औषध) घेता येऊ शकेल. यासंबंधी तुम्ही तिथे कार्यरत असणाऱ्या तंत्रज्ञाशीही बोलून घ्यावे.
ज्या टेबलवर आपण झोपलेलो असतो तो मोठ्या चुंबकाचा बनलेला असतो. त्यामुळे सैलसर कपडे (मेटल फ्री) किंवा त्यांनी दिलेला गाऊन घालणे आपल्या सुरक्षिततेसाठी सोयीचे असते. याशिवाय जर कुठली स्पेशल तयारीची आवश्यकता भासत असेल तर परीक्षणाआधी ऍडव्हान्समधे सांगितल्या जातं. MRI Scan चा सर्वात मोठा ऍडव्हांटेज म्हणजे कोणत्याही प्लेनमध्ये इमेजेस (प्रतिमा) काढता येतात.

MRI Scan Brain, Spine, Body & Muscles in Marathi.

© Healthmarathi.com
कॉपीराईट विशेष सूचना -
वरील माहिती कॉपी-पेस्ट करू नये. ही माहिती कॉपी करून शेअर किंवा video तयार करू नये. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व DMCA कॉपीराईट सूचना वाचा.