अँजिओग्राफी मराठीत माहिती (Angiography in Marathi)

Heart attack diagnosis test in Marathi, Heart checkup information in Marathi.

अँजिओग्राफी म्हणजे काय..?
Angiography in Marathi information
अँजिओग्राफी हा शब्द आपण अनेकवेळा ऐकला असेलच. अँजिओग्राफीमध्ये केवळ हृदयाच्या रक्तवाहिन्याची तपासणी केली जाते. अँजिओग्राफीद्वारे हृदयविकारावर उपचार केले जात नाहीत. अँजिओग्राफीत हृदयाच्या स्नायूला रक्तपुरवठा देणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये (कोरोनरी आर्टरीज) गाठी निर्माण झाल्या आहेत का? ते पाहिले जाते. अँजिओग्राफीमुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांतील ब्लॉकेजची स्थिती कळण्यास मदत होते.

अँजिओग्राफी करण्यासाठी रक्तवाहिनीत एक सूक्ष्म रबरी नळी घातली जाते आणि ही नळी रक्तप्रवाहाच्या उलटय़ा मार्गाने जाऊन हृदयाभोवतीच्या रक्तवाहिन्यांमध्ये ढकलली जाते. या नळीचे जे टोक बाहेरच्या बाजूला असते त्यातून Contrast agent हे विशिष्ट प्रकारचे औषध घातले जाते आणि विशेष एक्स-रेच्या सहाय्याने धमनींतील रक्तप्रवाह आणि ब्लॉकेजवर लक्ष ठेवले जाते तसेच वेगवेगळ्या कोनांनी आतील भागाचे चित्रण घेतले जाते.

अँजिओग्राफी तपासणीमुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळी आहे की नाही याचे शंभर टक्के निदान होते. नेमक्या कोणत्या रक्तवाहिनीत, कुठे आणि किती टक्के ‘ब्लॉक’ आहे, एकाहून अधिक रक्तवाहिन्यांत गुठळ्या आहेत का, याची माहिती या तपासणीत कळते.

अँजिओग्राफीसंबंधित हे सुद्धा वाचा..
हार्ट अटॅक येण्याची कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार माहिती मराठीत जाणून घ्या..
हार्ट अटॅकपासून दूर राहण्यासाठी स्मार्ट टिप्स.
हार्ट अटॅकवरील अँजिओप्लास्टी, स्टेंट बसवणे किंवा बायपास सर्जरी म्हणजे काय..?

– डॉ. सतीश उपळकर
CEO, हेल्थ मराठी नेटवर्क

© कॉपीराईट विशेष सूचना : वरील माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व सूचना वाचा.

Angiography and Angioplasty differance in Marathi bypass surgery in Marathi.