डिलिव्हरी नंतर बाळंतिणीची अशी घ्यावी काळजी – After delivery care in Marathi

बाळंतपणातील काळजी –
Care after delivery in Marathi :

प्रसूतीनंतर सव्वा महिना जास्त काळजी घ्यावी लागते. बाळंतिणीने योग्य आहार, विश्रांती व औषधे वेळेवर घेणे आवश्यक असते. यासाठी येथे डिलिव्हरी नंतर बाळंतिणीची काळजी कशी काळजी घ्यावी याची माहिती खाली दिली आहे.

बाळंतपणात अशी घ्यावी काळजी :

आहार –
डिलिव्हरी नंतरही योग्य आहार घ्यावा लागतो. बाळाला स्तनपान करण्यासाठी तसेच प्रसुतीनंतर शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी बाळंतिणीने याकाळात पोषक आहार घेणे आवश्यक असते. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, फळे, भात, पोळी, वरण, डाळ, उपमा, खीर, डिंकाचे लाडू, आळीवाचे लाडू, दूध व दुधाचे पदार्थ, मांस, मासे, अंडी, सुकामेवा यांचा आहारात समावेश करावा. दिवसभरात पुरेसे पाणीही प्यावे.

वजन वाढवणारे जास्त कॅलरीजचे पदार्थ म्हणजे तेलकट, तुपकट पदार्थ, चॉकलेट, केक, मिठाई, बेकरी प्रोडक्ट, जंकफूड, फास्टफूड खाणे टाळावे. कारण अशा पदार्थांममुळे अनावश्यक चरबी व वजन वाढत असते.

स्वच्छता –
सिझेरियन डिलिव्हरी झाल्यास पोटावर टाके घातलेले असतात. तसेच नॉर्मल डिलिव्हरीमध्येही काहीवेळा योनीभागात टाके घालावे लागू शकतात. बाळंतपणात अशा टाक्यांची योग्य काळजी व स्वच्छता घ्यावी लागते. बाळंतपणातील टाक्यांची काळजी कशी घ्यावी ते जाणून घ्या..

प्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

तपासणी –
डिलिव्हरीनंतर हळूहळू गर्भाशय हे पूर्ववत होत असते. यासाठी डिलिव्हरीनंतर साधारण सहा आठवडे (म्हणजे 42 दिवस) लागू शकतात. त्यामुळे प्रसूतीनंतर सहा आठवड्यानी डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेणे आवश्यक असते.

या तपासणीच्यावेळी आपले डॉक्टर गर्भाशय पूर्ववत झाले आहे की नाही ते तापासतील तसेच आपले वजन, रक्तदाब, ब्लडशुगर, हिमोग्लोबिन यांचीही तपासणी करू शकतात. याशिवाय सिझेरियन झाले असल्यास त्याठिकाणच्या टाक्यांची तपासणीही करतात. यासाठी डिलिव्हरीनंतर सहा आठवड्यानी डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

व्यायाम –
बाळंतपणानंतर स्त्रीचे शरीर हे थोडेसे सैल पडते. अशावेळी थोड्या व्यायामाची गरज असते.
यासाठी हातापायांची हालचाल करावी, चालण्याचा व्यायाम करावा, काही सोपी योगासने करावीत.
आपण बाळंतपणानंतर हळूहळू चालण्यास सुरवात करू शकता आणि चालताना आरामदायक चप्पल घालावे.

आजकाल गर्भावस्थेनंतर अधिकतर महिला आपले वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र आपल्या डॉक्टरांच्या सुचनेशिवाय असा कोणताही व्यायाम करू नका की ज्यामुळे पुढे नविन समस्या निर्माण होईल. प्रेग्‍नेंसीमध्ये वाढलेले वजन कमी होण्यासाठी थोडा वेळ जावा लागेल.

नोकरी करणाऱ्या स्त्रियां बाळंतपणानंतर 4 ते 5 महिन्यानंतर पुन्हा ऑफिसला जाऊ शकतात.
आत्ता ‘मॅटर्निटी बेनिफिट्स अ‍ॅक्ट’ नुसार बाळंतपणानंतर 26 आठवडयांची (साडेसहा महिने) मातृत्व रजा मिळते.

प्रेग्नन्सी, डिलिव्हरी पासून ते बाळाच्या काळजीपर्यंत सर्व माहिती देणारे उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.


© लेखक- डॉ. सतीश उपळकर
ही माहिती आपणास आवडल्यास आमचे Youtube चॅनेल subscribe जरूर करा. असेच उपयुक्त माहितीपूर्ण आरोग्यविषयक व्हिडिओ आपणास मोफत उपलब्ध होतील. यासाठी खालील YouTube subscribe बटनावर क्लिक करा.