बाळंतपणातील टाक्यांची अशी घ्यावी काळजी – After delivery stitches care in Marathi

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

बाळंतपणातील टाके – Postpartum stitches :

बाळंतपणात सिझेरियन डिलिव्हरी झाल्यास तसेच नैसर्गिक प्रसूती होत असताना योनीमार्गात छेद द्यावा लागल्यास किंवा तेथे जखम झाल्यास टाके घातले जातात. बाळंतपणात अशा टाक्यांची योग्यप्रकारे काळजी घ्यावी लागते. काळजी न घेतल्यास त्याठिकाणी जखम चिघळण्याची, इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. यासाठी येथे बाळंतपणातील टाक्यांची काळजी कशी घ्यावी याची माहिती दिली आहे.

बाळंतपणातील सिझेरियनचे टाके व घ्यावयाची काळजी :

हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर काही दिवस सिझरच्या टाक्यांची काळजी घेणे आवश्यक असते. अंघोळ करताना त्याठिकाणी हळुवार साबण लावून टाके घातलेली जागा स्वच्छ करावी. त्यानंतर मऊ व स्वच्छ वाळलेल्या टॉवेलने हलकेच पुसून घ्यावी. त्यानंतर त्यावर डॉक्टरांनी दिलेली एंटीसेप्टिक पाउडर किंवा क्रीम लावावी. सिझर टाके घातलेल्या ठिकाणी लक्ष ठेवावे. तेथे तीव्र वेदना, लालसरपणा किंवा त्यातून स्त्राव होणे अशी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांकडे जावे.

प्रसूतीनंतरची मालिश करून घेताना या टाक्यांची काळजी घ्यावी. याठिकाणी मालिश करू नये. सुरवातीचे काही आठवडे जास्त कष्टाची कामे करणे, जड वस्तू उचलणे, पायऱ्या चढणे उतरणे टाळावे. सिझेरियन ऑपरेशननंतर शरीर पूर्वपदावर येण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. हलका व्यायाम करावा, चालणे फिरणे सुरू ठेवावे, घरातील सोपी कामे करावीत.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

योनीमार्गातील टाके व घ्यायची काळजी :

नॉर्मल डिलिव्हरीनंतर जेंव्हा तुम्ही हॉस्पिटलमधून घरी येता तेंव्हा मयांगात टाके पडलेले असल्यास काही काळजी घेणे आवश्यक असते.
• टाके पडलेली जागा स्वच्छ राहील याची शौचाच्यावेळी काळजी घ्यावी.
• आपले पॅड नियमितपणे बदला.
• आंघोळ करताना पाण्यात थोडे एंटिसेप्टिक औषध मिसळून त्या पाण्याने ती जागा धुवून घ्यावी.
• टाके पडलेल्या ठिकाणी जंतुसंसर्ग होऊ नये यासाठी तेथे एंटिसेप्टिक औषधे किंवा क्रीम लावावी.
• लघवी किंवा शौचाच्यावेळी टक्क्यांवर जास्त जोर देऊ नका.
• बद्धकोष्ठता किंवा मलाचा खडा धरत असल्यास व शौचास जास्त जोर लावावा लागत असल्यास डॉक्टरांकडून हलकी लैक्सेटिव औषधे घ्यावीत.
• मांडी रुंद करून किंवा मांडी लांब पसरून बसू नये.
• सुरवातीचे काही दिवस जड वस्तू उचलू नयेत.
तसेच टाके पडले म्हणून सतत आरामही करू नये. चालणे, फिरणे सुरू करावे.

प्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

बहुतेक स्त्रियांचे योनिभागातील टाके हे साधारण तीन ते चार आठवड्यात ठीक होऊन जातात. एक ते दोन महिन्यात त्याठिकाणी होणारी वेदनाही कमी होते.

Stitches care after delivery information in Marathi.

प्रेग्नन्सी, डिलिव्हरी पासून ते बाळाच्या काळजीपर्यंत सर्व माहिती देणारे उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.


वरील माहिती आपणास आवडल्यास आमचे Youtube चॅनेल subscribe जरूर करा. असेच उपयुक्त माहितीपूर्ण आरोग्यविषयक व्हिडिओ आपणास मोफत उपलब्ध होतील. यासाठी खालील YouTube बटनावर क्लिक करा..