गरोदरपणातील उच्च रक्तदाब समस्या मराठीत माहिती (High bp in Pregnancy Marathi)

High Blood Pressure During Pregnancy in Marathi, High bp in Pregnancy Marathi information.

गरोदरपणातील उच्च रक्तदाब समस्या :
गर्भवतीमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या अधिक प्रमाणात निर्माण होते. गरोदरपणात शरीरात झालेले बदल, अस्वस्थता, मनातील भीती यांमुळे हा त्रास होत असतो. गरोदरपणात साधारण 20 आठवड्यानंतर स्त्रीचा रक्तदाब वाढतो.
गरोदर होण्याआधी ज्या स्त्रियांना हाय ब्लड प्रेशर किंवा किडनी विकार असतील तर त्यांना गरोदरपणात रक्तदाब वाढण्याचा धोका अधिक असतो.


काळजीचे कारण का असते..?

नेहमीच्या तपासणीत पाचव्या महिन्यानंतर रक्तदाब वाढलेला असल्यास विशेष काळजी घ्यावी लागते. या वाढलेल्या रक्तदाबाचा आई व बाळावर परिणाम होऊ शकतो. आईला झटके येणे, किडनी निकामी होणे, अतिरक्तस्राव होणे, गर्भाशयापासून गर्भवार वेगळी होणे, गर्भाच्या वाढीवर परिणाम होणे, वेळेआधीच बाळाचा जन्म होणे, सिझेरियन शस्त्रक्रिया करावी लागू शकते, मृत बाळ जन्माला येणे या समस्या यांमुळे होऊ शकतात.
गरोदर स्त्रीमध्ये उच्च रक्तदाबामुळे प्रीएक्लप्मेशिया हा गंभीर आजार उद्भवू शकतो. प्रीएक्लप्मेशियामुळे बाळामध्ये अनेक गंभीर समस्या निर्माण होतात.


गरोदरपणातील उच्च रक्तदाब लक्षणे :

• रक्तदाब वाढलेला असतो. रक्तदाब हा 140/90 किंवा त्यापेक्षा अधिक असतो.
• ‎त्याचबरोबर डोकेदुखणे, ‎चक्कर येणे, डोळ्याने अंधुक दिसणे.
• ‎थकवा व अशक्तपणा येणे.
• ‎लघवीतून अल्ब्यूमीन जाते.
• ‎अंगावर सूज येते, पायावर आणि चेहऱ्यावर सूज येतेे ही लक्षणे गरोदरपणातील उच्च रक्तदाबामध्ये असतात.

प्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.


गरोदरपणात रक्तदाब वाढण्याची समस्या आणि उपाय :

गर्भवतीने उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ नये म्हणून खालीलप्रमाणे काळजी घ्यावी.
• आपल्या डॉक्टरांकडून नियमित तपासणी करून घ्यावी. वेळोवेळी रक्त -लघवी तपासणी, शुगर टेस्ट, रक्तदाब तपासणी, वजन, अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, डोळ्यांची तपासणी करून घ्यावी.
• ‎तपासनीवेळी उच्च रक्तदाब इ समस्या डॉक्टरांच्या निदर्शनास येतील. त्यानुसार ते योग्य औषधोपचार करतील. डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळच्यावेळी घ्यावीत त्यांच्या सूचनांचे पालन करावे.
• ‎दररोज दुपारी दोन तास नियमित विश्रांती घ्यावी.
• ‎आहारातून मीठाचे प्रमाण कमी करावे.
• ‎संतुलित आहार घ्या. तेलकट पदार्थ खाणे टाळा.
• ‎मानसिक ताणतणावपासून दूर रहा. यासाठी योगातील ध्यान धारणा करू शकाल.
बाळंतपणानंतर काही आठवड्यांनी उच्च रक्तदाबाची ही समस्या आपोआप कमी होते.

हे सुद्धा वाचा..
गरोदरपणातील मधुमेह समस्या
गरोदरपणात होणारे विविध समस्या आणि उपाय
गरोदरपणात घ्यावयाची काळजी
गरोदरपणात कोणता आहार घ्यावा
हाय ब्लडप्रेशरची संपूर्ण माहिती मराठीत

– डॉ. सतीश उपळकर
CEO, हेल्थ मराठी नेटवर्क

© कॉपीराईट विशेष सूचना : वरील माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व सूचना वाचा.

pregnancy problems in marathi, Pregnancy complications in Marathi.