गर्भावस्थेत गरोदर स्त्रीच्या पोटात दुखत असल्यास हे करा उपाय.. (Abdominal pain during Pregnancy)

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

गरोदरपणात पोटात दुखणे :

प्रेग्नन्सीमध्ये गरोदर स्त्रीच्या पोटात दुखणे ही सामान्य बाब आहे. अनेक गर्भवती महिलांना प्रेग्नन्सीमध्ये कधीनाकधी पोटात वेदना होत असते. गर्भावस्थेत अनेक कारणांमुळे पोटदुखी होत असते. यातील काही कारणे ही सामान्य तर काही कारणे ही धोकादायक सुद्धा असू शकतात.

गरोदरपणात पोट का व कशामुळे दुखते..?

गरोदर स्त्रियांमध्ये काहीवेळा पोटदुखी ही अपचन, गॅसेस किंवा बद्धकोष्ठतेमुळे देखील होऊ शकते. तर कधीकधी गरोदरपणात होणारी पोटदुखी ही गंभीर समस्येचे लक्षण देखील असू शकते. कारण एक्टॉपिक प्रेगन्सी किंवा गर्भपात (मिसकॅरेज) अशा काही गंभीर कारणांमुळेही प्रेग्नन्सीमध्ये पोटदुखी होऊ शकते.

प्रेग्नन्सीमध्ये पहिल्या तिमाहीत होणाऱ्या पोटदुखीची कारणे :

गरोदरपणात पहिल्या तीन महिन्यात पोटात दुखणे ही सामान्य आहे. प्रामुख्याने गर्भधारणा होताना गर्भाशयाची होणारी वाढ, बद्धकोष्ठता, ऍसिडिटी अशा कारणांमुळे पहिल्या तीन महिन्यात पोटदुखी होत असते.

प्रेग्नन्सीमध्ये दुसऱ्या व तिसऱ्या तिमाहीत होणाऱ्या पोटदुखीची कारणे :

गर्भावस्थेत दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत पोटदुखी जाणवल्यास जास्त काळजी घेण्याची गरज असते. या काळात होणारी पोटदुखी ही बद्धकोष्ठता, अपचन, गॅसेस, ऍसिडिटी याबरोबरच Preeclampsia यामुळे पोटात दुखू शकते. तर गरोदरपणाच्या शेवटच्या काही दिवसात Braxton Hicks आणि प्रसुतीच्या कळा यांमुळेही पोटात दुखत असते.

प्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

गर्भावस्थेत पोट दुखत असल्यास हे करा उपाय :

पोटात दुखत असल्यास थोडावेळ आराम करावा. याशिवाय पोटदुखीमध्ये गरम पाण्याच्या पिशवीने पोटावर थोडा शेक घ्यावा किंवा गरम पाण्याने अंघोळ करावी.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

गरोदरपणात पोट दुखत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही घरगुती उपाय करू नये. पोटदुखीचे कारण सामान्य असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने सुरक्षित असे वेदनाशामक औषध घेऊ शकता.

पोटात दुखत असल्यास गरोदर स्त्रियांनी डॉक्टरांकडे केंव्हा जावे..?

अधिक काळापर्यंत पोटात दुखत असल्यास, किंवा पोटदुखीमध्ये मासिक पाळीप्रमाणे वेदना होत असल्यास, योनीतुन रक्तस्राव (ब्लीडिंग) होत असल्यास आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Abdominal pain during Pregnancy get information in Marathi.

प्रेग्नन्सी, डिलिव्हरी पासून ते बाळाच्या काळजीपर्यंत सर्व माहिती देणारे उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.


वरील माहिती आपणास आवडल्यास आमचे Youtube चॅनेल subscribe जरूर करा. असेच उपयुक्त माहितीपूर्ण आरोग्यविषयक व्हिडिओ आपणास मोफत उपलब्ध होतील. यासाठी खालील YouTube बटनावर क्लिक करा..