गर्भावस्थेत जुलाब व अतिसार होणे :
दूषित अन्न किंवा पाण्यातून इन्फेक्शन झाल्याने प्रेग्नन्सीमध्ये जुलाब, अतिसार आणि उलट्या होण्याची समस्या होऊ शकते. वारंवार जुलाब, अतिसार किंवा उलट्या होत असल्यास शरीरातील तरल पदार्थ अधिक प्रमाणात कमी होऊ लागतो. त्यामुळे गरोदरपणात यावर उपाययोजना न केल्यास डिहायड्रेशन होऊन गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते.
गरोदरपणात जुलाब, अतिसार किंवा उलट्या होत असल्यास अशी घ्यावी काळजी :
• गर्भावस्थेत डायरिया, जुलाब किंवा उलट्या होत असल्यास पुरेसे द्रवपदार्थ म्हणजे पाणी, ओरल रिहाइड्रेशन साल्ट (ORS), लांबूपाणी, शहाळ्याचे पाणी असे तरल पदार्थ प्यावेत. त्यामुळे डिहायड्रेशन होत नाही.
• अशावेळी गरोदर स्त्रीने पुरेशी विश्रांती घ्यावी.
• वैयक्तिक स्वच्छता पाळावी.
• बाहेरचे उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावे.
• जुलाब, अतिसार, उलट्या अधिक होत असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा.
• जुलाब, अतिसार, उलट्यावर डॉक्टरांच्या सुचनेशिवाय कोणतेही औषध घेऊ नये.
Web title – Diarrhea During Pregnancy information in Marathi.
प्रेग्नेंसी, डिलिव्हरी आणि बालसंगोपन विषयक मराठी pdf पुस्तक मोफत डाऊनलोड करण्यासाठी खालील फॉर्मद्वारे संपर्क साधा. Pdf मोफत पुस्तक WhatsApp Number वर पाठवण्यात येईल.