गरोदरपणात पोट साफ न होणे :
गरोदरपणात बद्धकोष्ठता (कॉन्स्टिपेशन) होण्याची समस्या अगदी सामान्य बाब आहे. बद्धकोष्ठतेमुळे शौचास व्यवस्थित साफ होत नाही, शौचाचा खडा धरत असतो त्यामुळे जास्त जोर लावावा लागत असतो. यामुळे मुळव्याधसारखा त्रासही होऊ शकतो. मात्र योग्य ती काळजी घेतल्यास साहजरित्या आपण या त्रासापासून दूर राहू शकता.
यासाठी येथे प्रेग्नन्सीत संडासला साफ न होण्याची कारणे तसेच गरोदरपणात बद्धकोष्ठता होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी, कोणता आहार घ्यावा याविषयी माहिती खाली दिली आहे.
गरोदरपणात पोट कडक का होते..?
प्रेग्नन्सीतील हार्मोन्समधील बदलांमुळे, पोटात वाढणाऱ्या गर्भाचा दबाव आतड्यावर पडल्यामुळे तसेच गरोदरपणात घेतल्या जाणाऱ्या लोहाच्या गोळ्यामुळे गरोदरपणी बद्धकोष्ठता होते व त्यामुळे गरोदरपणात पोट कडक होत असते.
गरोदरपणात नियमित पोट साफ होण्यासाठी काय करावे..?
गरोदरपणात आपण आपल्या आहार आणि जीवनशैलीमध्ये काही बदल केल्यास बद्धकोष्ठता दूर होऊन नियमित पोट साफ होण्यास मदत होईल. यासाठी खालील उपाय करावेत.
फायबर्सयुक्त आहार घ्या..
आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, फळे, गाजर, मनुका, नाचना, कोशिंबीर, मोड आलेली कडधान्ये यासारखे हाय-फायबर्सयुक्त पदार्थ खावेत. यामुळे पोट सोफ होण्यास मदत होते. गरोदरपणात कोणता आहार घ्यावा याची माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
अयोग्य आहार टाळा..
बेकरी प्रोडक्ट म्हणजे मैद्याचे पदार्थ, बिस्किटे, केक, मिठाई खाणे टाळा. पचनास जड असणारे पदार्थ, मांसाहार वारंवार खाणे टाळावे. गरोदरपणात काय खाऊ नये याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
पुरेसे पाणी प्या..
दिवसभरात पुरेसे म्हणजे साधारण 8 ग्लास पाणी प्यावे. याशिवाय शहाळ्याचे पाणी, लिंबूपाणी यांचाही समावेश करू शकता.
व्यायाम करा..
व्यायाम केल्याने आतड्यातील कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. यासाठी गरोदरपणातही हलका व्यायाम करावा. विशेषतः चालण्याचा व्यायाम करावा. सकाळी किंवा संध्याकाळी थोडावेळ बागेत किंवा मोकळ्या हवेत फिरायला जावे. गरोदरपणात व्यायाम कसा करावा ते जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा..
प्रेग्नन्सीत बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी घरगुती उपाय करू शकतो का..?
इतरवेळी बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी एरंडेल तेल, त्रिफळा चूर्ण या आयुर्वेदिक औषधांचा वापर केला जातो. मात्र गरोदरपणात आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशा कोणत्याही औषधांचा वापर करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे अशा उपायांचा वापर गरोदरपणात करू नये. कॉन्स्टिपेशनचा त्रास अधिक होत असल्यास आपल्या डॉक्टरांना या समस्येविषयी सांगावे. ते आपणास गरोदरपणात सुरक्षित अशी लॅग्जेटिव औषधे देतील.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
हे सुद्धा वाचा..
गरोदरपणातील आहार याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
Constipation during pregnancy in Marathi. Article written by Dr. Satish Upalkar.
प्रेग्नेंसी, डिलिव्हरी आणि बालसंगोपन विषयक मराठी pdf पुस्तक मोफत डाऊनलोड करण्यासाठी खालील फॉर्मद्वारे संपर्क साधा. Pdf मोफत पुस्तक WhatsApp Number वर पाठवण्यात येईल.