गर्भावस्था आणि आहार :
गर्भावस्थेच्या नऊ महिन्यांच्या काळात आईने पौष्टिक व संतुलित आहार घेणे आवश्यक असते. कारण आईने घेतलेल्या आहारावरच गर्भाशयातील बाळाचे पोषण होत असते. यासाठी येथे गर्भावस्थेत कोणता आहार घ्यावा, गर्भावस्थेत काय खावे व काय खाऊ नये याविषयी माहिती खाली दिली आहे.
गर्भावस्थेत हा आहार घ्यावा :
गर्भावस्थेत प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स, फायबर्स, लोह, कॅल्शिअम अशी पोषकतत्वे जास्त महत्वाची असतात. त्यादृष्टीने आहाराचे नियोजन करावे. यासाठी आहारात दूध व दुधाचे पदार्थ, भाज्या, फळे, धान्ये, कडधान्ये, सुखामेवा, मांसाहार यांचा समावेश असावा.
गर्भावस्थेतील आहार :
दूध व दुधाचे पदार्थ –
दूध आणि दुधाचे पदार्थ यामध्ये प्रोटिन्स व कॅल्शिअमचे मुबलक प्रमाण असते. दूध, दही, ताक इत्यादी दुग्धजन्य पदार्थ अत्यंत पौष्टिक असून ते गर्भावस्थेत अत्यंत फायदेशीर ठरतात.
हिरव्या पालेभाज्या –
हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या यातून लोह, व्हिटॅमिन्स व फायबर्स (तंतुमय पदार्थ) अशी पोषकतत्वे असतात. फायबर्समुळे पोट नियमित साफ होण्यास मदत होते. यासाठी मेथी, पालक, ब्रोकोली, राजगिरा, शेपू अशा हिरव्या पालेभाज्या आहारात असाव्यात.
याशिवाय आहारात काकडी, पडवळ, दुधी भोपळा, टोमॅटो अशा फळभाज्या व गवार, शेवग्याच्या शेंगा अशा शेंगभाज्या आहारात समाविष्ट करू शकता. तसेच गाजर, बीट यासारखी कंदमुळेही खावीत. कारण यामध्ये व्हिटॅमिन-A मुबलक असून त्यामुळे बाळाच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी ते उपयुक्त ठरते.
ताजी फळे –
गर्भावस्थेत संत्री, मोसंबी, अॅव्होकॅडो, टरबूज, नाशपाती, द्राक्षे, स्ट्रॉबेरी, चिकू, सफरचंद अशी फळे खाणे फायदेशीर असते. या फळातून आवश्यक अशी व्हिटॅमिन्स, अँटीऑक्सिडंट, मिनरल्स आणि फायबर्स ही पोषकघटक मिळतात.
धान्ये व कडधान्ये –
गर्भावस्थेत विविध डाळी, भात, ओट्स, ज्वारी, नाचणी, गहू अशी धान्ये व कडधान्ये आहारात असावीत. मूग, मटकी, तूर, चवळी अशा कडधान्यातून प्रथिने व ओमेगा थ्री ही शरीराला आवश्यक अशी फॅटी अॅसिडस मिळतात.
सुकामेवा –
सुकामेव्यामध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर, ओमेगा-3 फॅटी ऍसिड अशी पोषकतत्वे असतात. त्यामुळे गरोदरपणात आहारात शेंगदाणा, बदाम, अक्रोड, काजू, खजूर, मनुका इत्यादींचा समावेश करा.
मांसाहार –
गर्भावस्थेत मांस, मासे, अंडी असे मांसाहारी पदार्थ खाणेही उपयुक्त असते. कारण यामध्ये प्रोटिन्स, लोह, जस्त आणि व्हिटॅमिन-B12 अशी आवश्यक पोषकतत्वे असतात. त्यामुळे तुम्ही जर मांसाहार करत असाल तर मांस, मासे, अंडी यांचा आहारात समावेश जरूर करा.
पाणी –
गर्भावस्थेत पुरेसे म्हणजे दिवसातून किमान 8 ते 10 ग्लास पाणी पिणे आवश्यक असते. यामुळे शरीर हायड्रेटेड ठेवण्यास मदत होते. पाण्याशिवाय रसदार फळे, फळांचा ताजा रस, शहाळ्याचे पाणी, लिंबूपाणी यांचा आहारात समावेश करू शकता.
गर्भावस्थेत काय खाऊ नये..?
- तेलकट पदार्थ, खारट पदार्थ, मिठाई, बेकरी प्रोडक्ट, चायनीज पदार्थ, फास्टफूड खाणे टाळावे.
- इन्फेक्शन (जंतुसंसर्ग) होऊ नये म्हणून बाहेरील उघड्यावरील खाणे टाळावे.
- शिळे अन्न, अर्धवट शिजलेले अन्न खाणे टाळावे.
- वारंवार चहा कॉफी पिणे टाळावे.
- सोडा असणारी कोल्ड्रिंक्स पिणे टाळावे.
- सिगारेट, तंबाखू, मद्यपान अशा व्यसनांपासून दूर राहावे.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
हे सुद्धा वाचा..
गर्भावस्थेत कोणती काळजी घ्यावी याची माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
Information about Pregnant women diet plan in Marathi language.
प्रेग्नेंसी, डिलिव्हरी आणि बालसंगोपन विषयक मराठी pdf पुस्तक मोफत डाऊनलोड करण्यासाठी खालील फॉर्मद्वारे संपर्क साधा. Pdf मोफत पुस्तक WhatsApp Number वर पाठवण्यात येईल.