Dr Satish Upalkar’s article about Body itching Causes and Home remedy in Marathi.
अंगाला खाज सुटणे – Body itching :
अंगाला खाज सुटणे या समस्येला वैद्यकीय भाषेत Pruritus (प्रुरिटस) असे म्हणतात. बऱ्याच त्वचाविकारात अंगाला खाज येणे हे मुख्य लक्षण असू शकते. प्रामुख्याने पुरळ, इन्फेक्शन किंवा अॅलर्जी यामुळे अंगाला खाज सुटत असते. अंगाला खाज येणे याची कारणे आणि त्यावरील उपाय यांची माहिती येथे सांगितली आहे.
अंगाला खाज सुटण्याची कारणे :
अनेक कारणांमुळे अंगाला खाज सुटते. जसे त्वचा कोरडी पडल्यामुळे तेथे खाज येऊ लागते. तसेच सोरायसिस, घामोळ्या, गजकर्ण, शितपित्त अशा अनेक त्वचाविकारात देखील अंगाला खाज सुटते. याशिवाय कावीळ, हिपॅटायटीस अशा यकृताच्या आजारामुळेही अंगाला खाज येते. कीटक चावल्याने किंवा अॅलर्जी यामुळेही अंगाला खाज सुटत असते. अशी विविध कारणे यासाठी जबाबदार असतात.
अंगाला खाज येणे याची कारणे पुढीलप्रमाणे असतात.
- त्वचा कोरडी पडण्याची समस्या (Dry skin) असल्यास अंगाला खाज सुटत असते. विशेषतः हिवाळ्यात हा त्रास अधिक दिसून येतो.
- त्वचा संबंधित तक्रारी जसे घामोळ्या, सोरायसिस, गजकर्ण नायटे, शितपित्त, नागीण, चिकनपॉक्स यामुळे अंगाला खाज सुटत असते.
- कावीळ, हिपॅटायटीस ह्यासारख्या यकृताच्या विकारामुळे अंगाला खाज येते.
- किडनी विकारामुळेही अंगाला खाज येऊ शकते.
- साबण, केमिकल्युक्त सौंदर्य प्रसाधने, हेअर प्रोडकट्स यांच्या अॅलर्जीमुळे देखील अंगाला खाज येऊ लागते.
- मधुमेहामुळे जननेंद्रियाजवळ खाज सुटते.
- मुंग्या, डास, मधमाशी असे कीटक चावण्यामुळे अंगाला खाज येते.
- काही औषधांचे दुष्परिणाम झाल्याने सुध्दा अंगाला खाज सुटते.
- रक्तात लोहाची कमतरता असणे, अशा अनेक कारणांमुळे अंगाला खाज सुटत असते.
अंगाला खाज सुटणे यावरील उपाय –
अंगाला खाज सुटत असल्यास, खोबरेल तेलात कापूर मिसळून त्या तेलाने मालिश करावी. यामुळे खाज सुटणे कमी होते. यासाठी मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेल वापरू शकता. अंगाला खाज येत असल्यास तेथे कोरपडीचा गर चोळावा. या उपायाने अंगाला होणारी खाज कमी होते. कडुनिंबाच्या पानांची पेस्ट अंगावर लावल्याने देखील खाज कमी होण्यास मदत होते. हे घरगुती उपाय अंगाला खाज सुटत असल्यास उपयोगी पडतात.
अंगाला खाज येत असल्यास काय करावे..?
1) अंघोळीच्या पाण्यात बेकिंग सोडा घालून त्या पाण्याने अंघोळ करा.
बेकिंग सोडा अंगाला होणारी खाज कमी करते. यासाठी एक कप बेकिंग सोडा अंघोळीच्या पाण्यात घालून अंघोळ केल्याने खाज सुटणे थांबते.
2) अंगाला कोरपडीचा गर लावा.
खाज सुटणाऱ्या ठिकाणी एलोवेरा जेल लावल्याने खाज सुटणे कमी होते.
3) अंगाला मोहरी किंवा तीळ तेलाची मालिश करा.
अंगाला मोहरी किंवा तीळ तेलाने मालिश करून आंघोळ करावी. या उपायाने अंगाला खाज सुटणे कमी होते.
4) खोबरेल तेलाने अंगाला मालिश करा.
खोबरेल तेलात कापूर मिसळावे व त्या तेलाने अंगाला मालिश केल्यास खाज सुटणे थांबते.
5) तुळशीची पाने अंगाला चोळा.
तुळशीची पाने बारीक करून ती खाज सुटणाऱ्या भागावर चोळावी या उपायाने खाज सुटणे कमी होते.
6) कडुनिंबाची पाने अंगाला चोळा.
कडुनिंबाची पाने बारीक करून ती खाज सुटणाऱ्या भागावर चोळावी. अंघोळीच्या पाण्यात कडुनिंबाची पाने घालून त्या पाण्याने अंघोळ करावी. कडुनिंबात अनेक आयुर्वेदिक तसेच antibacterial गुणधर्म असतात.
अंगाला खाज सुटणे यावरील औषधे – Treatment For Itching body in Marathi :
एलर्जीमुळे अंगाला खाज येत असेल तर आपले डॉक्टर Anti-histamines औषधे देतील. याशिवाय खाज कमी करण्यासाठी calamine lotion, capsaicin cream यासारख्या खाज कमी करणाऱ्या क्रीम दिल्या जातील.
अंगाला खाज सुटत असल्यास अशी घ्यावी काळजी :
- अंगाला नखांनी खाजवून जखमा करू नये. कारण तेथे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.
- प्रामुख्याने त्वचा कोरडी पडून खाज सुटत असते. यासाठी खोबरेल तेल लावून त्वचेला मॉइश्चराइज्ड ठेवा.
- दररोज स्वच्छ पाण्याने अंघोळ करा. जास्त गरम पाण्याने आंघोळ करणे टाळा.
- सुती व हलके कपडे वापरा.
- केमिकलयुक्त साबण, हेअर प्रोडक्ट, परफ्युम वापरू नका.
- शक्यतो सौम्य साबण वापरा. त्यामुळे त्वचा कोरडी होत नाही.
डॉक्टरांकडे कधी जाणे आवश्यक असते..?
अंगाला खाज सुटत असल्यास व खालील त्रास जाणवत असल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
- अतिशय खाज सुटणे,
- संपूर्ण शरीरावर खाज सुटणे,
- संवेदनशील भागात खाज सुटणे,
- घरगुती उपायांनी फरक न पडणे,
- अंगाला खाज सुटण्याबरोबरचं अशक्तपणा, वजन कमी होणे अशी लक्षणे जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
अंगाची खाज आणि आहार –
बऱ्याचदा खाद्यपार्थांतील एलर्जीमुळे अंगाला खाज सुटू शकते. यासाठी एलर्जी वाढवण्यास कारणीभूत असणारे पदार्थ म्हणजे शेंगदाणे, अंडी, काजू, अक्रोड, मासे, झिंगे, कोळंबी, सोयाबीन, गहू, दूध यासारखे पदार्थ खाण्यात आल्यावर अंगाला होणारी खाज वाढते का, याचे निरीक्षण करावे आणि ज्या पदार्थाची एलर्जी आहे तो पदार्थ खाणे टाळावे.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
हे सुद्धा वाचा..
अंगाला पित्त उठणे याची कारणे व उपचार जाणून घ्या..
In this article information about Body itching Causes, Treatments and Home remedies in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar (Certified physician and Healthcare expert).