गरोदरपणातील पाठदुखी (Pregnancy Back Pain) :

गरोदरपणात कंबर आणि पाठ दुखणे हे तसे सामान्य असते. बहुतांश स्त्रियांना गरोदरपणात पाठदुखीची तक्रार असते. याठिकाणी गर्भावस्थेत पाठ दुखत असल्यास काय करावे तसेच प्रेग्नन्सीमध्ये पाठदुखी होऊ नये यासाठी काळजी कशी घ्यावी याची माहिती दिली आहे.

प्रेग्नन्सीमध्ये कंबर आणि पाठ कशामुळे दुखत असते..?

प्रेग्नन्सीमध्ये पोटात बाळाची वाढ होत असते. त्यामुळे गर्भावस्थेत वाढणाऱ्या वजनाचा ताण हा पाठीच्या स्नायूंवर आल्याने गरोदरपणात कंबर व पाठदुखी होत असते. तसेच जर गरोदर होण्यापूर्वी स्त्रीचे वजन जास्त असल्यास किंवा गरोदरपणी जास्त कष्टाची कामे केल्यामुळे किंवा दुखापतीमुळेही कंबर आणि पाठदुखी होऊ शकते.

गरोदरपणात पाठ दुखणे यावरील उपाय :

  • गर्भावस्थेत पाठ किंवा कंबर दुखत असल्यास थोडावेळ विश्रांती घ्यावी.
  • गरम पाण्याच्या पिशवीने कंबरेवर शेक दिल्यानेही आराम वाटत असते.
  • दुखणाऱ्या ठिकाणी आयुर्वेदिक वेदनाहर औषधांनी मालीश करू शकता.
  • डॉक्टरांनी गरोदरपणात दिलेली लोह व कॅल्शियमची औषधे वेळेवर घ्यावीत.
  • कंबर किंवा पाठ अधिक दुखत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने सुरक्षित वेदनाशामक औषध घ्यावे.

गरोदरपणी पाठ किंवा कंबर दुखू नये यासाठी हे करावे..

  • गरोदरपणात डॉक्टरांनी सांगितलेला हलका व्यायाम नियमित करावा.
  • सकाळच्या कोवळ्या उन्हात चालण्याचा व्यायाम करावा.
  • अधिकवेळ एकचठिकाणी बसणे किंवा उभे राहणे टाळा.
  • जड वस्तू उचलणे, जास्त श्रमाची कामे करणे टाळा.
  • पुरेशी विश्रांती घ्यावी.

हे सुद्धा वाचा..
गरोदरपणात पाय दुखणे यावरील उपाय जाणून घ्या.

Read Marathi language article about Back Pain During Pregnancy. Last Medically Reviewed on March 8, 2024 By Dr. Satish Upalkar.

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.