गरोदरपणात पायाच्या शिरा सुजणे – Pregnancy Varicose Veins :
गर्भावस्थेत काही गरोदर स्त्रियांच्या पायावरील शिरा सूजत असतात. प्रामुख्याने व्हेरिकोज व्हेन्समुळे पायाच्या शिरा सुजत असतात. सुजलेल्या शिरांमुळे मांडीवर निळ्या रंगामध्ये शिरा स्पष्ट दिसू लागतात. तसेच गरोदरपणी काहीवेळा पायातील शिरांमध्ये रक्त जमा होऊन व्हेरीकोज व्हेन्सचा त्रासही होऊ शकतो.
प्रेग्नन्सीमध्ये व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास का होत असतो..?
गरोदरपणात गर्भाचे आणि आईचे वजन स्वाभाविकपणे वाढत असते. अशावेळी वाढणाऱ्या वजनाचा भार हा आपल्या पायांवर येत असतो. त्यामुळे गरोदरपणात पायाच्या शिरा सुजतात व व्हेरिकोज व्हेन्सची (Varicose veins) समस्या होऊ शकते. मात्र ही समस्या प्रसुतीनंतर थोड्या दिवसात आपोआप कमी होत असते.
गरोदरपणात पायावरील शिरा सुजू नयेत म्हणून अशी घ्यावी काळजी :
- अधिकवेळ उभे राहू नये तसेच एकचठिकाणी अधिकवेळ बसूनही राहू नये.
- प्रेग्नन्सीत हलका व्यायाम नियमित करावा.
- घराशेजारी किंवा बागेत रोज सकाळी व संध्याकाळी चालण्यास जावे.
- पाय दुमडून अधिकवेळ बसू नये.
- दिवसभरात पुरेसे म्हणजे 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे.
- गरोदरपणात संतुलित आहार घ्यावा. त्यामुळे अनावश्यक वजन वाढत नाही. गरोदरपणी योग्य आहार कसा असावा ते जाणून घ्या..
- व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास असल्यास पायात घालण्यासाठी कम्प्रेशन स्टॉकिंग्स किंवा मेटरनिटी सपोर्ट टाइट्स यांचा वापर करता येईल.
गरोदरपणात व्हेरिकोज व्हेन्स ही समस्या गंभीर असते का..?
व्हेरिकोज व्हेन्सची समस्या फारशी गंभीर नसते. अनेक स्त्रियांना गर्भावस्थेत याचा त्रास होत असतो. व्हेरिकोज व्हेन्समुळे डीप वेन थ्रोम्बोसिसची समस्या होण्याचे प्रमाण अत्यंत कमी असते. डीप वेन थ्रोम्बोसिस (DVT) ही एक गंभीर समस्या असून ती डिलिव्हरीनंतर होत असते.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
हे सुद्धा वाचा..
गरोदरपणात पाय सुजण्याची कारणे व त्यावरील उपाय जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
Varicose Veins During Pregnancy causes & treatment in Marathi.
प्रेग्नेंसी, डिलिव्हरी आणि बालसंगोपन विषयक मराठी pdf पुस्तक मोफत डाऊनलोड करण्यासाठी खालील फॉर्मद्वारे संपर्क साधा. Pdf मोफत पुस्तक WhatsApp Number वर पाठवण्यात येईल.