प्रेग्नन्सीमध्ये पायाला सूज येणे (एडिमा) :

गरोदरपणात पायाला सूज येण्याचा त्रास अनेक गर्भवती स्त्रियांना होत असतो. साधारण 50 ते 80 टक्के गरोदर स्त्रियांना पायाला सूज येण्याचा त्रास होत असतो. शेवटच्या तीन महिन्यात हा त्रास अधिक होत असतो. पायाला सूज आल्याने त्याठिकाणी वेदना जाणवतात तसेच सुया टोचल्याप्रमाणेही त्रास जाणवू शकतो.

गरोदरपणात पायाला सूज आल्यास डॉक्टरांकडे केंव्हा जाणे आवश्यक असते..?

गर्भावस्थेत पाय सूजणे ही सामान्य बाब असली तरीही अचानक पायाला अधिक प्रमाणात सूज आल्यास, पायाबरोबरच हात व चेहऱ्यावरही सूज आल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा कारण ते प्री-एक्लेमप्सिया याचे लक्षण असू शकते. प्री-एक्लेमप्सियाची स्थिती गर्भ आणि गरोदर स्त्री अशा दोघांनाही घातक असते.

तसेच एका पायात दुसऱ्या पायापेक्षा अधिक सूज जाणवल्यासही तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. कारण डीप वेन थ्रोम्बोसिस (DVT) ह्या धोकादायक स्थितीमुळे अशाप्रकारे सूज येऊ शकते.

गर्भावस्थेत पायावर सूज येऊ नये यासाठी अशी घ्यावी काळजी :

• अधिकवेळ एकाचठिकाणी बसणे किंवा जास्तवेळ उभे राहणे टाळावे.
• पाय दुमडून अधिकवेळ बसू नये.
• दिवसभरात पुरेसे म्हणजे 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे.
• नियमितपणे व्यायाम करा, विशेषत: चालणे, सोपी योगासने असे व्यायामप्रकार करावे.
• पौष्टिक आणि संतुलित आहार घ्यावा.
• आहारात मिठाचा वापर कमी करावा. स्नॅक्स, चिप्स, लोणची, पापड असे मिठाचे पदार्थ खाऊ नये. यामुळे पायातील सूज अधिक वाढू शकते.

Web title – Leg Swelling During Pregnancy information in Marathi.


प्रेग्नेंसी, डिलिव्हरी आणि बालसंगोपन विषयक मराठी pdf पुस्तक मोफत डाऊनलोड करण्यासाठी खालील फॉर्मद्वारे संपर्क साधा. Pdf मोफत पुस्तक WhatsApp Number वर पाठवण्यात येईल.

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...