गर्भावस्थेत पाय दुखण्याची कारणे व प्रेग्नन्सीमध्ये पायात गोळे येत असल्यास हे करा उपाय.. (Pregnancy leg piain in Marathi)

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

गरोदरपणात पाय दुखणे (Leg cramps) :

प्रेग्नन्सीमध्ये गर्भाचे आणि आईचे वजन स्वाभाविकपणे वाढत असते. अशावेळी वाढणाऱ्या वजनाचा ताण हा आपल्या पायांवर येत असतो. त्यामुळे गरोदरपणात पाय दुखण्याची समस्या अनेक स्त्रियांना होत असते. विशेषतः शेवटच्या तीन महिन्यात रात्री झोपताना पायाला गोळे येऊन पाय अतिशय दुखत असतात.

गर्भावस्थेत पायात गोळा येऊन पायाच्या पेटऱ्या दुखत असल्यास हे करा उपाय :

• पायांचा स्ट्रेचिंग व्यायाम करावा.
• बसलेल्या स्थितीत पाय पुढे पसरून, पायाचे अंगठे धरून पाय हळूहळू ताणावा.
• पायांना आयुर्वेदिक वेदनाहर औषधांनी मालीश करावी.
• पायात आलेल्या क्रेम्प्समुळे अधिक दुखत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने सुरक्षित वेदनाशामक औषध घ्यावे.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

प्रेग्नन्सीमध्ये पायाला गोळे येऊ नये म्हणून अशी घ्यावी काळजी :

• अधिक वेळ उभे राहू नये.
• खुर्चीत बसलेले असताना पाय लोंबकळत ठेऊ नयेत. अधिकवेळ खुर्चीत बसू नये.
• रात्री झोपताना पायाखाली उशी ठेऊन झोपावे.
• दिवसभरात पुरेसे म्हणजे 8 ग्लास पाणी प्यावे. लिंबूपाणी, शहाळ्याचे पाणी प्यावे.
• सोडायुक्त कोल्ड्रिंक्स पिणे टाळावे.
• नियमित व्यायाम करावा. दररोज काहीवेळ मोकळ्या हवेत फिरण्यास जावे.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा..?

जर गरोदरपाणी पाय अधिक प्रमाणात दुखत असल्यास किंवा गरोदर स्त्रीच्या पायावर अचानक सूज आल्यास तातडीने आपल्या डॉक्टरांकडे जावे.

प्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leg piain during Pregnancy information in Marathi.