गर्भावस्था आणि व्यायाम – Pregnancy & Exercise :
प्रेग्नन्सीमध्ये व्यायाम करण्याचे खूप फायदे आहेत. त्यामुळे प्रेग्नन्सीतही प्रेग्नंट स्त्रीने रोज हलका व्यायाम करणे आवश्यक असते. यामुळे Normal delivery होण्यास मदत होत असते.
प्रेग्नन्सीतील व्यायाम टिप्स – Pregnancy Fitness Tips in Marathi :
• प्रेग्नन्सीमध्ये व्यायाम सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
• डॉक्टरांनी व्यायाम करण्यास सांगितल्यास त्यांच्या सूचनेप्रमाणे हलका व्यायाम सुरू करावा.
• व्यायाम करताना पोटावर ताण येता कामा नये.
• व्यायामात दुखापत होण्याची, घसरून पडणार नाही याची काळजी घ्यावी.
• व्यायाम करण्यापूर्वी तहान लागली नसली तरीही पुरेसे पाणी प्यावे. यामुळे डिहायड्रेशन होत नाही.
• जास्त थकवा आणणारा व्यायाम करू नये.
• अधिक वेळ व्यायाम करू नये.
• जड वस्तू उचलणे, दंडबैठक, पायऱ्या सारख्या चढणे उतरणे असले व्यायाम करू नयेत.
प्रेग्नन्सीमध्ये खालील व्यायाम करावेत :
चालण्याचा व्यायाम (walking exercise) –
प्रेग्नन्सीमध्ये चालणे हा सर्वात सोपा आणि सुरक्षित असा व्यायामप्रकार आहे. यासाठी सकाळी किंवा संध्याकाळी मोकळ्या हवेत, बागेत किंवा घरात 10 ते 20 मिनिटे चालण्याचा व्यायाम करू शकता. तसेच इतरवेळी एकाजागी अधिकवेळ बसून न राहता घरात थोडे फिरत राहावे. चालण्याच्या व्यायामामुळे शरीरातील रक्तसंचारण योग्यप्रकारे होते. त्यामुळे आई आणि बाळाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. याशिवाय प्रेग्नन्सीमध्ये चालण्याचा व्यायाम करण्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होण्यासही मदत होते.
स्ट्रेचिंग व्यायाम (stretching exercises) –
आरामकाळात बसलेल्या ठिकाणी पायांचा स्ट्रेचिंग व्यायाम करावा. यामध्ये पायाला हळूहळू ताण देण्याचा व्यायाम करावा. यामुळे पायातील रक्तप्रवाह व्यवस्थित होऊन पायाच्या शिरा सुजत नाहीत, पायात गोळे येण्याची समस्याही कमी होते.
योगासने –
प्रेग्नन्सीमध्ये तज्ज्ञांच्या देखरेखीखाली सोपी योगासनेही करू शकता. विशेषतः दीर्घ श्वसन जरूर करावे, त्यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते व बाळाला ऑक्सिजनचा पुरवठा चांगला होतो. यासाठी बसलेल्या स्थितीत डोळे बंद करून श्वासावार लक्ष केंद्रित करावे व नाकाने अधिक श्वास घ्यावा व हळूहळू बाहेर सोडावा. असे अनेकदा करीत राहावे.
हे सुद्धा वाचा..
गरोदरपणात कोणता आहार घ्यावा याची माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
Information about Pregnancy Exercise benefits in Marathi.