उलटीतून रक्त पडणे :
अनेक कारणांनी उलटीतून रक्त पडू शकते. काही कारणे ही किरकोळ तर काही कारणे गंभीरही असू शकतात. त्यामुळे उलटीतून रक्त पडत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. याठिकाणी उलटीत रक्त का पडते, उलटीतून रक्त पडणे याची कारणे व उपचार ही माहिती दिली आहे.
उलटीत रक्त पडण्याची कारणे :
• पचनसंस्थेतील आजार जसे, अल्सर, ऍसिडिटी, गॅस्ट्रो, जठराला सूज येणे, स्वादुपिंडाला सूज येणे, अन्नातून विषबाधा होणे यामुळे उलटीतून रक्त पडू शकते.
• हिपॅटायटीस, यकृत निकामी होणे, यकृताचा कँसर किंवा लिव्हर सिरोसिस अशा यकृताच्या आजारांमुळेही उलटीतून रक्त जाऊ शकते.
• एस्पिरिन किंवा इतर वेदनाशामक औषधांच्या दुष्परिणामामुळे उलटीत रक्त पडू शकते.
• उच्च रक्तदाब, हार्ट अटॅक अशा हृदयविकारामध्येही उलटीतून रक्त पडू शकते.
• अधिक प्रमाणात दारू पिण्यामुळे उलटीतून रक्त पडते.
• अन्ननलिका कर्करोग, पोटाचा कर्करोग, स्वादुपिंड कर्करोग, यकृताचा कँसर यामुळेही उलटीतून रक्त पडत असते.
उलटीतून जास्त प्रमाणात रक्त जाणे, चक्कर व अशक्तपणा येणे, अंधुक दिसणे, बेशुद्ध पडणे, पोटात दुखणे, संडासमधून रक्त पडणे अशी लक्षणे असल्यास तात्काळ रुग्णाला दवाखान्यात दाखल करावे. दवाखाना जवळ नसल्यास 108 ह्या क्रमांकावर डायल करून रुग्णवाहिका बोलावून घ्यावी व रुग्णाला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करावे.
दवाखान्यात उलटीतून रक्त कशामुळे जात आहे याचे निदान करण्यासाठी विविध निदान तपासण्या करण्यात येतील. यामध्ये ब्लड टेस्ट, एंडोस्कोपी तपासणी, अल्ट्रासाऊंड, सीटी स्कॅन, एमआरआय किंवा एक्स-रे यांचा वापर करावा लागू शकतो.
Vomiting Blood Symptoms, Signs, Causes & Treatment Marathi.