डाव्या बाजूला पोट दुखणे –
काहीवेळा पोटात डाव्या बाजूला वेदना होऊ लागतात. याची अनेक असू शकतात. प्रामुख्याने गॅसेस, पोटातील अल्सर, डायव्हर्टिकुलिटिस, अॅपेन्डिसाइटिस अशा कारणांमुळे डाव्या बाजूला पोटदुखी होत असते.
पोटात डाव्या बाजूला दुखणे याची कारणे –
पोटाच्या डाव्या बाजूला पोट (म्हणजे जठर), आतड्याचा डावीकडील भाग, स्वादुपिंड, डाव्या बाजूची किडनी तसेच स्त्रियांमध्ये left ovary असे अवयव असतात. त्यामुळे विविध कारणांनी डाव्या बाजूला पोटात वेदना होऊ शकतात.
डाव्या बाजूला पोटात वेदना होणे याची काही कारणे –
- बद्धकोष्ठता, अपचन, गॅसेस, IBS आणि गॅस्ट्रोएन्टेरिटिस अशा पचनसंस्थेशी संबंधित तक्रारीमुळे डाव्या बाजूला पोटात वेदना होऊ शकतात.
- आतड्यातील भिंतीतील भागात इन्फेक्शन झाल्याने सूज येऊन डायव्हर्टिकुलिटिस ही समस्या होते. यामुळेही पोटात डाव्या बाजूला दुखू लागते. 50शी नंतरच्या व्यक्तीमध्ये Diverticulitis चे प्रमाण अधिक दिसून येते.
- हर्निया मुळेही डाव्या बाजूला पोटात दुखू शकते.
- किडनीत इन्फेक्शन झाल्याने किंवा किडनी स्टोन असल्यास त्यामुळेही पोटात डाव्या बाजूला दुखते.
- प्लीहा (Spleen) ह्या अवयवाला सूज आल्याने डाव्या बाजूला दुखते.
- स्त्रियांमध्ये मासिक पाळी, एंडोमेट्रिओसिस, Ovarian cyst, Ectopic pregnancy अशा कारणांनी डाव्या बाजूला पोटात दुखू शकते.
डाव्या बाजूला पोट दुखत असल्यास डॉक्टरांकडे कधी जावे ..?
खालील लक्षणे जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता, तातडीने आपल्या डॉक्टरांकडे जावे.
- पोटात डाव्या बाजूला अतिशय वेदना होणे,
- छातीत दुखणे,
- ताप येणे,
- शौचावाटे रक्त पडणे,
- लघवीतून रक्त पडणे,
- उलट्या व मळमळ होणे,
- उलटीतून रक्त पडणे,
- त्वचा, डोळे पिवळसर होणे,
- पोटावर सूज येणे
असे त्रास होत असल्यास तातडीने आपल्या डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे.
पोटात डाव्या बाजूला दुखणे यावर घरगुती उपाय –
- अर्धा कप पाण्यात लिंबू रस व काळे मीठ घालून ते मिश्रण प्यावे.
- गरम पाण्यात अर्धा चमचा ओवा मिसळून ते पाणी प्यावे. यामुळे डाव्या बाजूला पोटात दुखणे थांबते.
- आल्याचे तुकडे पाण्यात घालून ते पाणी उकळावे. मिश्रण कोमट झाल्यावर ते पाणी अर्धा कप प्यावे.
चहामध्ये आले टाकून काळा चहा प्यावा. - डाळिंबाच्या दाण्यात थोडे काळे मीठ मिसळून ते दाणे खाल्याने डाव्या बाजूला पोटात दुखणे थांबते.
- पोटावर गरम शेक घ्यावा.
हे घरगुती उपाय खानपान संबंधित गॅसेस, अपचन, बद्धकोष्ठता अशा कारणांमुळे डाव्या बाजूला पोट दुखत असल्यास उपयोगी पडतात. मात्र जर इतर गंभीर कारणामुळे पोटात डावीकडे दुखत असल्यास त्यावर घरगुती उपाय करीत वेळ वाया घालवू नये. अशावेळी तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावेत.
खालील लेख सुध्दा वाचा –
Read Marathi language article about Left side Abdomen pain Causes, Symptoms, Treatments and Home remedies. Last Medically Reviewed By Dr. Satish Upalkar on March 7, 2024.