Dr Satish Upalkar’s article about Hernia Treatments in Marathi.

हर्निया आजाराची लक्षणे, कारणे व हर्निया वरील उपचार यांची माहिती येथे Dr Satish Upalkar यांनी दिली आहे.

हर्निया म्हणजे काय – Hernia in Marathi :

हर्निया आजारात पोटाजवळील एखादा अवयव हा मांसपेशीच्या कमजोर छिद्रातून बाहेर येतो त्यामुळे हर्नियामुळे त्याठिकाणी फुगवटा आल्याचे दिसते. हर्नियाचे अनेक प्रकार आहेत. हर्निया हा आजार लहान मुलांपासून ते वृद्ध अशा कोणत्याही वयाच्या व्यक्तींमध्ये होऊ शकतो. हर्निया हे ओटीपोटातील भागात, जांघेत, कमरेत झालेला आढळतो. हर्निया म्हणजे काय, हर्निया आजाराची लक्षणे व हर्निया वरील उपचार याविषयी मराठीत माहिती डॉ. सतीश उपळकर यांनी येथे दिली आहे.

हर्नियाचे प्रकार – Hernia types :

हर्नियाचे तीन प्रमुख प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.

 • 1) इनगिनल हर्निया (Inguinal hernia)
 • 2) हायटल हर्निया (Hiatal hernia)
 • 3) अंबिलीकल हर्निया (Umbilical hernia)

1) इनगिनल हर्निया (Inguinal hernia) –

ह्या प्रकारचा हर्निया अधिक आढळतो. पुरुषांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. ओटीपोटाच्या खालील बाजूच्या कमकुवत छिद्रातून आतडीचा काही भाग जांघेतून वृषणकोशामध्ये जातो. यामुळे उभे राहिल्यास किंवा खोकल्यावर जांघेजवळ फुग्यासारखी गाठ दिसते. तर आडवे झोपल्यावर वृषणकोशात आलेली आतडी परत आपल्या ठिकाणी जातात त्यामुळे फुगवटा कमी झाल्याचे दिसते.

2) हायटल हर्निया (Hiatal hernia) –

पोटाचा काही भाग हा डायाफ्राममधून छातीच्या पोकळीत गेल्याने हायटल हर्निया होतो. ह्या प्रकारचा हर्निया प्रामुख्याने वयाच्या 50 शी नंतर अधिक आढळतो. GERD ह्या समस्येमुळे हायटल हर्निया होण्याची शक्यता अधिक असते. GERD ह्यामध्ये पोटातील acid खाली न जाता उलट्या दिशेने अन्ननलिकेत येत असते. यामुळे छाती व पोटाच्या ठिकाणी जळजळ होते.

3) अंबिलीकल हर्निया (Umbilical hernia) –

बेंबीच्या ठिकाणी ह्या प्रकारचा हर्निया होतो. लहान मुलांमध्ये हा हर्निया अधिक होतो. लहान मुलांच्या उदराच्या मांसपेशी कमकुवत असल्याने आतड्यातील काही भाग तेथे शिरतो. त्यामुळे यावेळी बेंबीच्या ठिकाणी फुगवटा आल्याचे दिसते.

तसेच मोठ्या व्यक्तींमध्येही अंबिलीकल हर्निया आढळतो. प्रामुख्याने लठ्ठपणा, गर्भावस्था, पोटात पाणी होणे (जलोदर) ह्यामुळे उदराच्या मांसपेशीवर अधिक ताण आल्याने मोठ्या व्यक्तींमध्ये अंबिलीकल हर्निया होतो.

हर्निया आजाराची लक्षणे – Hernia symptoms in Marathi :

 • हर्नियाचे सर्वात मुख्य लक्षण म्हणजे प्रभावित भागात फुगवटा किंवा गाठ आल्यासारखे आढळते.
 • उभे असताना, खाली वाकताना किंवा खोकताना स्पर्शाला हर्नियाची गाठ जाणवते.
 • झोपल्यावर त्याठिकाणी स्पर्श केल्यास हर्नियाचा फुगवटा नाहीसा झाल्याचे जाणवते.
 • हर्नियाच्या ठिकाणी वेदना जाणवू शकतात.
 • इनगिनल हर्नियामुळे जांघेत हर्नियाचा फुगवटा येतो.
 • इनगिनल हर्नियामुळे पुरुषांच्या स्क्रोटममध्ये (वृषणकोशात) सूज किंवा गाठ येते.
 • हायटल हर्नियामध्ये छातीत जळजळ होणे, गिळताना त्रास होणे आणि छातीत दुखणे अशी लक्षणे जाणवतात.
 • अंबिलीकल हर्नियामुळे बेंबीच्या ठिकाणी हर्नियाचा फुगवटा येतो.

अशी लक्षणे हर्निया आजारात असतात.

हर्निया होण्याची कारणे – Causes of Hernia in Marathi :

उदरातील, ओटीपोटातील मांसपेशी कुमकुवत असल्यास हर्निया होतो. याशिवाय हर्निया होण्यासाठी खालील कारणे जबाबदार असतात.

 • जन्मजात हर्निया असल्याने,
 • कुटुंबात हर्नियाची आनुवंशिकता असल्यास हर्निया होऊ शकतो.
 • जड वजन उचलण्यामुळे,
 • तीव्र खोकला किंवा क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसऑर्डर (COPD) मुळे,
 • बद्धकोष्ठतेमुळे (Constipation),
 • लठ्ठपणामुळे,
 • गर्भावस्थेमुळे,
 • पोटात पाणी झाल्याने जलोदर ह्या समस्येमुळे हर्निया होऊ शकतो.

हर्निया वर उपचार – Hernia treatments in Marathi :

हर्नियावर उपचार करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शस्त्रक्रिया हाच आहे. हर्निया ही समस्या सर्जरीद्वारे पूर्णपणे दूर होते. हर्नियाच्या आकारावर आणि असलेल्या लक्षणांच्या तीव्रतेवर शस्त्रक्रियेची गरज आहे की नाही ते डॉक्टर ठरवतात.

हर्निया ऑपरेशन – Hernia operation :

इनगिनल हर्नियाची शस्त्रक्रिया ही छोटासा छेद घेऊन केली जाते. तसेच लॅप्रोस्कोपी दुर्बिणीद्वारे बिनटाक्याची शस्त्रक्रियासुध्दा करता येते. शस्त्रक्रियेमध्ये ज्या छिद्रातून आतडीचा भाग जांघेत आला आहे तो भाग आत ढकलुन ते छिद्र बंद केले जाते. तसेच त्यावर विशिष्ट अशी जाळी लावली जाते. जेणेकरून पुन्हा आतडीचा भाग जांघेत येत नाही. ह्या शस्त्रक्रियेमुळे इनगिनल हर्निया पूर्णपणे बरा होतो.

शस्त्रक्रियेनंतर दोन तीन दिवसात रुग्ण आपल्या घरी जाऊ शकतो. शस्त्रक्रिया केलेल्या ठिकाणी वेदना जाणवू शकतात. शस्त्रक्रियेनंतर काही दिवस काळजी घेणे आवश्यक आहे. यावेळी वजनदार वस्तू उचलणे टाळावे.

हर्निया ऑपरेशन आणि येणारा खर्च –

मुंबई, पुणे येथे हर्निया ऑपरेशन खर्च हा साधारणपणे 60 ते 70 हजार इतका आहे.

हायटल हर्निया असल्यास त्यामुळे छातीत जळजळ होणे, गिळताना त्रास होणे आणि छातीत दुखणे अशी लक्षणे जाणवतात. अशावेळी पोटातील acid कमी करण्यासाठी antacids आपले डॉक्टर देऊ शकतात. अशाप्रकारे हर्निया आजारावर उपचार केले जातात.

Written by - Dr. Satish Upalkar
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
5 Sources

Information about Hernia Causes, Symptoms, Types, Diagnosis and Treatments in Marathi language. Article written by Dr Satish Upalkar.

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...