मुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)

Kidney stones in Marathi, Mutkhada causes, symptoms, diet chart, treatment, prevention tips in Marathi.

मूतखडा म्हणजे काय..?
Kidney stones information in Marathi.
आपल्यापैकी अनेकांना मुतखड्याचा (किडणी स्टोन्सचा) त्रास असतो. किडनीमध्ये खनिज क्षार जमा झाल्याने मुतखडे निर्माण होतात. बहुतांशवेळा किडनी स्टोन्स हे कॅल्शियम पासून बनलेले आढळतात. तसेच युरीक एसिड आणि ऑक्सॅलेटपासूनही किडनी स्टोन्स बनतात. हे खडे किडनीमधून युरेटर नामक संकिर्ण नळीद्वारे मुत्राशयात येत असतात. मुतखड्याचा आकार लहान असल्यास लघवीवाटे सहजतेणे बाहेर पडू शकतो. मात्र अधिक मोठ्या आकाराचा खडा मुत्रवाहीनीमध्ये अडकतो. मुतखडा मूत्रवाहिनीत अडकल्याने मूत्राच्यामार्गात अडथळा निर्माण होतो तेव्हा अधिक वेदना होऊ लागतात. वेदना ज्या बाजूला मुतखडा असेल त्या बाजूला पाठीत, पोटात किंवा ओटीपोटात वेदना होतात.

मुतखड्याच्या त्रासामुळे आज अनेकजन त्रस्त असलेले आपण पाहतो. हा विकार स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. मुतखडे मुत्रसंस्थेतील कोणत्या अवयवात आहे हे सर्वप्रथम पाहणे आवश्यक असते. जेंव्हा मुतखडे हे किडनीमध्ये असतात तेँव्हा विशेष वेदना जाणवत नाहीत. मात्र किडनीतील खडे जेंव्हा किडणीतून खाली मुत्रवाहिनीद्वारे मुत्राशयात सरकू लागतात तेंव्हा मात्र वेदना जाणवतात. मुतखडा या रोगाची मराठीत माहिती, मुतखडा म्हणजे काय, मुतखडा होण्याची कारणे, मुतखडामध्ये लक्षणे कोणती जाणवतात, मुतखडावरील उपचार, आयुर्वेदिक औषधे, होमिओपॅथी उपचार, मुतखडा घरगुती उपचार, योग्य आहार, मुतखडा त्रासात काय खावे, काय खाऊ नये, किडनी स्टोन्स होऊ नये यासाठीचे उपाय या सर्वांची माहिती ह्या ठिकाणी मराठीमध्ये दिली आहे.

मूतखडा लक्षणे :
Kidney stones Symptoms in Marathi.
अनेकवेळा कोणत्याही लक्षणाशिवाय किडनीतील लहान असणारे खडे आकाराने मोठे बनतात.
जेंव्हा किडनीतील खडे मुत्राच्या प्रवाहाबरोबर युरेटर मधून मुत्राशयात येत असतात त्यावेळी तीव्र वेदना होतात. वेदना ज्या बाजूला मुतखडा असेल त्या बाजूला पाठीत, पोटात किंवा ओटीपोटात वेदना होतात.

मुतखड्यांमध्ये जाणवणारी अन्य लक्षणे :
• वारंवार लघवीस झाल्यासारखे वाटते.
• ‎लघवी करताना जळजळ होणे.
• ‎लघवी करताना त्रास होणे.
• ‎थेंब थेंब लघवी होणे.
• ‎कधीकधी लघवीत रक्त येणे.
• ‎मळमळणे, उलटी होणे, ताप येणे, अंगदुखी यासारखी लक्षणे जाणवतात.

मुतखडा होण्याची कारणे :
Causes of Kidney Stones in Marathi.
कोणकोणत्या कारणांमुळे किडनीत खडे निर्माण होतात..?
• शरीरातील खनिजे, क्षार, युरिक एसिड यांच्या चयापचय संबंधी विकृतीमुळे आणि लघवीचे प्रमाण कमी झाल्याने मुतखडा तयार करणाऱ्या घटकांचे प्रमाण वाढल्याने मुतखडा तयार होतो.
• ‎कमी पाणी पिण्याच्या सवयीमुळे.
• ‎लघवीचे प्रमाण कमी झाल्याने मुतखडा तयार करणाऱ्या घटकांचे प्रमाण वाढल्याने मुतखडा तयार होतो.
• ‎विहीर किंवा बोरवेलचे पाणी कायम पिल्यामुळे.
• ‎लघवी बराच वेळ मुत्राशयात रोखून ठेवण्याच्या सवयीमुळे.
• ‎लघवीतील जिवाणू संक्रमनामुळे (बॅक्टेरियल इन्फेक्शनममुळे).
• ‎तसेच अनुवंशिक कारणांमुळेही मुतखड्याचा त्रास होऊ शकतो.

मुतखड्यांचे निदान कसे करतात :
Kidney stones Diagnosis test in Marathi.
उपस्थित लक्षणे, पेशंट हिस्ट्री आणि शारीरीक तपासणीद्वारे निदानास सुरवात होते. तसेच मुतखड्याच्या निदानासाठी खालील वैद्यकिय चाचण्याही केल्या जातील.
सोनोग्राफी तपासणी – सोनोग्राफी केल्यास मुतखड्याचा आकार किती आहे, मूतखडा कोणत्या भागात आहे ते समजते.
KUB एक्स रे – याद्वारे किडनी, युरेटर आणि मुत्राशयाची स्थिती पाहिली जाते.
याशिवाय रक्त, लघवी तपासणी, सीटी स्कैन परिक्षण, किडनी फंक्शन टेस्ट याद्वारे मुतखड्यांचे निदान केले जाते.

मुतखड्यांचा किडणींवर काय परिणाम होतो..?
मुतखड्यांमुळे लघवीच्या मार्गात अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे किडणीत तयार झालेली लघवी ही मुत्रमार्गातून सरळ खाली जाऊ शकत नाही आणि त्यामुळे किडणीवर ताण येतो व किडणी फुगते.
जर या मुतखड्यावर योग्यवेळी योग्य उपचार झाले नाहीत तर दीर्घकाळ फुगून राहीलेली किडणी हळूहळू कमजोर होऊ लागते आणि नंतर काम करणे पूर्ण बंद करते. त्यामुळे किडनी फेल्युअर किंवा किडणी निकामी होण्याचा धोका असतो.
याशिवाय किडन्यांमध्ये इन्फेक्शन होणे, युरिनरी फिस्टुला निर्माण होणे यासारखा त्रास मुतखड्यांमुळे होऊ शकतो.

किडनी स्टोन – मुतखडा उपचार मराठी माहिती :
Kidney stones Treatments in Marathi.
मुतखड्याचा परिणाम आपल्या किडनीच्या कार्यावर होत असतो यासाठी मुतखड्याच्या त्रासावर वेळीच योग्य उपचार करणे आवश्यक असते.
मुतखड्यावरील गुणकारी औषधांची माहिती देणारी उपयुक्त ‘मूतखडा उपचार मार्गदर्शन पुस्तिका’ आजचं डाउनलोड करा व मुतखड्याच्या त्रासापासून सुटका मिळवा. या उपयुक्त पुस्तकातून आपण मुतखड्यावर औषधोपचार करून घेऊ शकाल. या पुस्तिकेत मुतखड्यावरील गुणकारी औषधांची माहिती दिली आहे.

मूतखडा उपचार मार्गदर्शन पुस्तिका :
यामध्ये खालील माहिती दिली आहे –
• मुतखडा सामान्य माहिती, प्रकार, कारणे, लक्षणे
• ‎मुतखड्यावरील औषधे
• ‎उपयुक्त घरगुती उपायांची माहिती
• ‎मुतखडा पथ्य-अपथ्य
• ‎मुतखडा रुग्णाचा आहार कसा असावा
• ‎मुतखड्याचा पुन्हा पुन्हा त्रास होऊ नये म्हणून करावयाच्या उपाययोजना यांची माहिती एकाचं ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांनी ह्या पुस्तिकेमध्ये दिली आहे.

केवळ 50 रुपयांमध्ये हे उपचार पुस्तिका आपण खरेदी करू शकता. डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाइन पुस्तिका खरेदी करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा. खरेदी केल्यानंतर तात्काळ आपणास पुस्तिका pdf स्वरूपात उपलब्ध होईल.


Paytm द्वारेही आपण पेमेंट करू शकता..
यासाठी आमच्या 8805442769 या नंबरवर 50 रुपयांचे पेमेंट करा. त्यानंतर आमच्या 8805442769 या Whatsapp नंबरवर paytm पेमेंट जमा केल्याचे सांगा. उपचार पुस्तिका तात्काळ आपणास whatsapp किंवा ई-मेलवर पाठवुन दिली जाईल.

मुतखडा टाळण्यासाठीचे उपाय :
मूतखडा होऊ नये म्हणून हे करा..
• भरपूर पाणी प्यावे. दररोज किमान 8 ग्लास पाणी पिणे आवश्यक असते.
• ‎दररोज किमान 2 लिटर लघवी बाहेर टाकली गेली पाहिजे.
• ‎लघवी कधीही अडवून धरू नये. दोन तासापेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी बसून राहू नये.
• ‎आहारातील मिठाचे प्रमाण कमी करावे. 4 ग्रॅम (एक चमचा) पेक्षा अधिक मिठाचा वापर आहारात असू नये.
• ‎वजन आटोक्यात ठेवा.
• ‎शीतपेये, अतितेलकट पदार्थ, आंबट, खारट पदार्थ, पापड, लोणची, वेफर्स, खाण्याचा सोडा असलेले पदार्थ, टोमॅटोच्या बिया, वांगी, वाटाणा, फ्लॉवर, कोबी खाणे टाळावे. मांसाहार, अंडी प्रमाणातच करावा.
• ‎हिरव्या पालेभाज्यांचा अधिक समावेश असावा, शहाळ्याचे पाणी, केळी, मनुका, कुळथाची आमटी आहारात असावी.
• ‎मधुमेह असल्यास ब्लड शुगर नियंत्रित ठेवा.
• ‎उच्चरक्तदाब असल्यास त्यावर नियंत्रण ठेवा.
• ‎मुतखड्याच्या रुग्णांनी योग्य काळजी घेतली नाही तर पुन्हा मुतखडा होण्याचे प्रमाण अधिक असते. एकदा मुतखडा झाला असल्यास पुन्हा होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे प्रत्येक रुग्णाने योग्य आहार आणि काळजी घेणे आवश्यक असते. यासाठी डॉक्टरांकडून नियमित तपासणी व उपचार करून घ्यावेत.

किडनी विकारासंबंधीत खालील उपयुक्त माहितीसुद्धा वाचा..
किडनी निकामी होणे
मधुमेह (डायबेटीस) मराठीत माहिती
हाय ब्लडप्रेशर कारणे, लक्षणे आणि उपाय

– डॉ. सतीश उपळकर
CEO, हेल्थ मराठी नेटवर्क

© कॉपीराईट विशेष सूचना : वरील माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व सूचना वाचा.

Mutkhada mahiti karne, lakshne, test, gharguti upay, home remedies, upchar Marathi.


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.