Dr Satish Upalkar Marathi language article about What to do when gas in stomach.
पचनासंबंधित अनेक छोट्या मोठ्या तक्रारी सर्वांनाच होत असतात. पोटात गॅस होण्याची समस्यासुद्धा बऱ्याचजणांना होते. पोटात गॅस झाल्यास ढेकर येणे, अस्वस्थ वाटणे, पोटात तसेच छातीत दुखणे यासारखे त्रास होऊ लागतात. यासाठी पोटातील गॅस झाल्यावर काय करावे याविषयी माहिती डॉ. सतीश उपळकर यांनी येथे दिली आहे.
तेलकट पदार्थ, मांसाहार, मैद्याचे पदार्थ, हरभरा, मटार, बटाटा, कोबी, गहू इत्यादी पचनास जड असणारे पदार्थ अधिक खाण्यामुळे पोटातील गॅसची समस्या होत असते. याशिवाय भरपेट खाणे, बद्धकोष्ठता, पोटामधील जंत, IBS, बैठी जीवनशैली, स्ट्रेस आणि मानसिक तणाव अशी कारणेसुद्धा गॅससाठी सहाय्यक ठरतात.
पोटात गॅस झाल्यावर काय करावे ..?
1) ओवा पाण्यात मिसळून ते पाणी प्यावे –
चमचाभर ओवा ग्लासभर गरम पाण्यात मिसळून ते पाणी प्यावे यामुळे पोटामधील गॅस निघून जाण्यास मदत होते. जेवणानंतर पोटात गॅस होत असल्यास रोज जेवल्यानंतर अर्धा चमचा ओवा आणि सैंधव मीठ खावे.
2) लिंबू रसात आल्याचा रस मिसळून प्यावे –
पोटात गॅस झाल्यास एक चमचा लिंबू रसात थोडा आल्याचा रस मिसळून प्यावा.
3) जिरेपूड घातलेले पाणी प्यावे –
पोटात गॅस झाल्यावर चमचाभर जिरेपूड गरम पाण्यात मिसळून प्यावी. जेवणानंतर जर गॅस होत असल्यास जेवणानंतर जिरेपूड मिसळलेले पाणी प्यावे.
4) हिंग घालून पाणी प्यावे –
पोटात गॅस झाल्यास एक ग्लास गरम पाण्यात अर्धा चमचा हिंग मिसळून ते पाणी प्यावे. यामुळे पोटामधील गॅस दूर होतो.
5) सैंधव मीठाबरोबर आल्याचा तुकडा खावा –
पोटात गॅस झाल्यावर आल्याच्या तुकड्यास थोडेसे सैंधव मीठ लावून खाल्यास पोटामधील गॅस निघून जाण्यास मदत होते.
पोटात गॅस होऊ नये यासाठी काय करायचं ..?
नियमित व्यायाम करावा –
बैठी कामे असलेल्या लोकांनी रोज कमीत कमी अर्ध्या तासासाठी चालणे, पायऱ्या चढणे-उतरणे, सायकलिंग यासारखे व्यायाम केल्याने पोटाच्या स्नायूंचा व्यायाम होतो. त्यामुळे घेतलेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित होते व गॅस, बद्धकोष्ठता यासारख्या तक्रारी दूर होतात.
पचनास जड पदार्थ खाऊ नये –
तळलेले पदार्थ, मैदायुक्त पदार्थ, मसालेदार पदार्थ, मांसाहार, हरबरा, मटार, बटाटा, कोबी इत्यादी पदार्थ जास्त प्रमाणात सेवन करणे टाळावे. यामुळे पोट साफ होत नाही, अपचन होते त्यामुळे गॅसच्या तक्रारी होतात. यासाठी असे पदार्थ सतत खाणे टाळावे. सोडा, बिअर आणि इतर कार्बोनेटेड पेये पिणे टाळा.
हलका आहार घ्यावा –
गॅसची समस्या असणाऱ्यांनी सहजतेने पचणारा, हलका आहार घ्यावा. हिरव्या पालेभाज्यां, ताजी फळे, फळभाज्या, दही, ताक यांचा आहारात समावेश करावा. हिरव्या पालेभाज्यांमध्ये, फळांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असून ते पोट साफ होण्यास मदत करते त्यामुळे गॅसची समस्या होत नाही.
चुकीच्या सवयी बदलाव्यात –
एकाचवेळी भरपेट जेवणे टाळावे. जेवताना सावकाश व प्रत्येक घास चावून खावावा. गडबडीत, पटपट खाणे टाळावे. जेवणानंतर लगेच झोपू नये. तसेच दिवसा झोपू नये आणि रात्री जागरण करू नये. तंबाखू, सिगारेट, मद्यपान अशी सर्व प्रकारची व्यसनेही टाळावीत.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
हे सुद्धा वाचा..
बद्धकोष्ठता असल्यास पोट साफ न झाल्यानेही गॅसेसची समस्या होत असते. रोजच्या रोज पोट साफ होण्यासाठी काय करावे याविषयी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
- https://www.niddk.nih.gov/health-information/digestive-diseases/gas-digestive-tract/symptoms-causes
- https://www.hopkinsmedicine.org/gastroenterology_hepatology/diseases_conditions/small_large_intestine/small-intestinal-bacterial-overgrowth.html
- https://www.hopkinsmedicine.org/healthlibrary/conditions/digestive_disorders/gas_in_the_digestive_tract_85,P00369
Marathi language article about What to do when gas in Stomach. Article written by Dr Satish Upalkar.