Dr Satish Upalkar’s article about Buttermilk health benefits in Marathi.

ताक पिण्याचे फायदे व नुकसान याची मराठी माहिती Dr Satish Upalkar यांनी येथे दिली आहे.

ताक – Buttermilk :

ताक हा एक दुग्धजन्य पदार्थ असून दह्यात पाणी मिसळून ते मिश्रण घुसळून ताक तयार केले जाते. ताक हे चविष्ट, पौष्टीक तसेच आरोग्याच्या दृष्टीनेसुध्दा अतिशय उपयुक्त असते. ताकामध्ये अनेक महत्वाची पोषकतत्वे, खनिजे व व्हिटॅमिन्स असतात. ताक पिणे हे उन्हाळ्याच्या दिवसात अमृतासारखे मानले जाते. ताक पिण्याचे फायदे व नुकसान याविषयी माहिती डॉ सतीश उपळकर यांनी या लेखात दिली आहे.

ताकाचे आयुर्वेदिक फायदे :

आयुर्वेदात ताकाचे अनेक गुणकारी गुणधर्म सांगितलेले आहेत. ताक हे दह्यापेक्षा पचनास हलके असते. ताक हे गोड-आंबट-तुरट चवीचे असून उष्ण वीर्यात्मक आहे. भूख वाढवणारे आहे. चरबी, कफ आणि वाताचा नाश करणारे आहे. गोडे ताक पित्त वाढवत नाही, आंबट ताक मात्र पित्त वाढवते. ताक हे पोटाचे आजार दूर करण्यासाठी प्रभावी असल्याचे आयुर्वेदात सांगितले आहे.

ताक पिण्याचे फायदे – Buttermilk benefits in Marathi :

ताक पिण्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. ताक हे शरीराला ऊर्जा पुरवते आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवते. त्यामुळे पचनशक्ती सुधारते, पोट साफ होण्यास मदत होते. पोटाचे आजार दूर होतात. ताक पिण्यामुळे हाडे मजबूत होतात. रक्तदाब, रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल नियंत्रित राहण्यास मदत होते. हे सर्व फायदे ताक पिण्यामुळे होतात.

1) ताक पिण्यामुळे पचनशक्ती सुधारते ..

ताकातील लॅक्टिक एसिडमुळे इतर दुग्धजन्य पदार्थांपेक्षा ताक हे पचायला सोपे असते. तसेच ताकाच्या सेवनाने पचनशक्ती सुधारते, भूक लागण्यास मदत होते. भूक लागण्यासाठी व पचनक्रिया व्यवस्थित होण्यासाठी ताकात चिमुटभर जीरेपूड, मिरपूड व सैंधव मीठ घालून ते ताक प्यावे.

2) ताक पिणे पोटाच्या आजारांवर उपयुक्त असते ..

ताक हे पोटाच्या आजारांवर गुणकारी आहे. अपचन, पोट साफ न होणे, भूक न लागणे, उलटी होणे, तहान लागणे, मुळव्याध व अतिसार या पोटाच्या आजारांवर ताक हे विशेष लाभदायी आहे. त्यामुळे अपचन, बद्धकोष्ठता यासारख्या पोटाच्या समस्या असल्यास तुम्ही दिवसातून दोनवेळा जरूर ताक प्यावे. मुळव्याधीचा त्रास असल्यास ताक सेवन केल्याने त्रास लवकर कमी होतो.

3) ताक हे हाडांना मजबूत करते ..

ताकामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन-D चे प्रमाण अधिक असते. याशिवाय व्हिटॅमिन-K2 देखील मुबलक असते. ही सर्व पोषकतत्वे आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी महत्वाची असतात. ताक पिण्यामुळे हाडे मजबूत व बळकट होतात तसेच ऑस्टियोपोरोसिस सारखे हाडांचे आजार होण्यापासून रक्षण होते.

4) ताक पिल्याने वाईट कोलेस्टेरॉल कमी होते ..

ताक पाण्यामुळे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत होऊ शकते असे संशोधनात आढळून आले आहे. ताकात असणाऱ्या स्फिंगोलिपिड (Sphingolipid) ह्या घटकामुळे वाईट अशा LDL कोलेस्टेरॉलचे शोषण आतड्यात होते. अशाप्रकारे वाईट कोलेस्टेरॉलची रक्तातील पातळी तकाच्या सेवनाने कमी होते. वाईट कोलेस्टेरॉल कमी होत असल्याने ताक हे हृदयासाठी फायदेशीर आहे.

5) ताक रक्तदाब आटोक्यात ठेवते ..

ताक पिण्यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होऊ शकते. ताकाच्या सेवनाने systolic ब्लड प्रेशर साधारण 3 mm Hg इतका कमी होत असल्याचे संशोधनात आढळून आले आहे.

6) ताक पिण्यामुळे वजन आटोक्यात राहते ..

नियमित ताक पिण्यामुळे वजन आटोक्यात राहण्यास मदत होऊ शकते. वजन कमी करण्यासाठी ताकात काळे मीठ मिसळून ते ताक प्यावे.

7) ताक हे डोळे व केसांसाठी उपयुक्त असते ..

ताक आपल्या डोळ्यांसाठी आणि केसांसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. ताक पिण्यामुळे डोळे व केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

ताक पिण्याचे दुष्परिणाम – Buttermilk side effects in Marathi :

आरोग्यासाठी जसे ताक पिण्याचे फायदे आहेत तसेच ताकाचे काही तोटे सुध्दा आहेत. काही लोकांना ताक पिण्यामुळे एलर्जी होऊ शकते. ताक पिण्यामुळे काहींचे पोट बिघडू शकते, तसेच त्यांना अतिसार, गॅसेस ह्या समस्या होऊ शकतात. ताकात सोडियमचे प्रमाण असल्याने याच्या अधिक सेवनाने रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. ताक पिण्यामुळे असे नुकसान व दुष्परिणाम होऊ शकतात.

ताक कोणी पिऊ नये ..?

दुधाची एलर्जी असणाऱ्या व्यक्तींनी ताक पिणे टाळावे. ताकात सोडियमचे प्रमाण जास्त असल्याने याच्या अधिक सेवनाने रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे उच्च रक्तदाब (हाय ब्लडप्रेशर) असणाऱ्यांनी जास्त प्रमाणात ताक पिणे टाळावे.

ताकातील पोषकघटक – Buttermilk Nutrition contents :

ताकामध्ये अनेक उपयुक्त पोषकतत्वे, खनिजे व व्हिटॅमिन्स असतात. एक कप म्हणजे साधारण 245 ml ताकातील पोषकघटक पुढीलप्रमाणे आहेत.

  • कॅलरीज – 98
  • प्रोटीन – 8 ग्रॅम
  • फॅट – 3 ग्रॅम
  • कॅल्शिअम – 22% of RDA
  • सोडियम – 16% of RDA
  • व्हिटॅमिन B12 – 22% of RDA
  • रिबोफ्लेविन – 29% of RDA
  • Pantothenic acid – 13% of RDA

हे सुद्धा वाचा..

3 Sources

Image source – Dr Satish Upalkar

Information about Benefits and Side effects of Buttermilk in Marathi language. Article written by Dr Satish Upalkar.

Medically Reviewed By - Dr. Satish Upalkar
Dr. Satish Upalkar is a Healthcare counsultant. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra University of Health Science, Nashik and is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai.
Qualification: Bachelor of Ayurveda Medicine and Surgery (B.A.M.S.)
Medical Council Registration number: I-72800-A
Contact details -[email protected]
Follow - LinkedIn | Facebook | Twitter | YouTube