Dr Satish Upalkar’s article about Butter health benefits in Marathi.

लोणी खाण्याचे फायदे व तोटे यांची मराठीत माहिती

लोणी – Butter :

लोणी हा एक पौष्टीक असा दुग्धजन्य पदार्थ आहे. लोणी हे ताक घुसळून तयार केले जाते. अनेक उपयुक्त पोषकघटक लोण्यामध्ये असतात. आरोग्याच्यादृष्टीने लोण्याचे फायदे भरपूर आहेत. विशेषतः बाजारातील विकतच्या लोण्यापेक्षा घरगुती लोणी जास्त फायदेशीर असते. या लेखात लोणी खाण्याचे फायदे व तोटे याविषयी माहिती डॉ सतीश उपळकर यांनी दिली आहे.

लोणी खाण्यामुळे पचनक्रिया सुधारते, वजन वाढते, शारीरिक दुर्बलता कमी होते, डोळ्यांचे आरोग्य सुधारते, थायरॉईडचा त्रास होत नाही, हाडे मजबूत होतात. हे सर्व फायदे लोणी खाण्यामुळे होतात.

लोण्यातील पोषकतत्वे –

लोण्यामध्ये कॅलरीज व फॅटचे भरपूर प्रमाण असून यामध्ये व्हिटॅमिन-A, व्हिटॅमिन-E, व्हिटॅमिन-D, राइबोफ्लेव्हिन, नियासिन, कॅल्शियम आणि फॉस्फरस अशी अनेक उपयुक्त पोषकक्तत्वे असतात.

लोण्यातील जीवनसत्वे –
लोण्यामध्ये व्हिटॅमिन-A, व्हिटॅमिन-E, व्हिटॅमिन-D व व्हिटॅमिन-B12 ह्या जीवनसत्त्वांचे प्रमाण भरपूर असते. व्हिटॅमिन-A हे डोळ्यांच्या व त्वचेच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असते. थायरॉईडचा त्रास होऊ नये यासाठी तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी व्हिटॅमिन-A मदत करत असते. लोण्याच्या सेवनाने शरीराला पुरेसे व्हिटॅमिन-A मिळण्यास मदत होते.

व्हिटॅमिन-E हे हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असून व्हिटॅमिन-E हे अँटीऑक्सीडेंट प्रमाणे कार्य करून शरीरातील पेशींचे free radicals पासून रक्षण करतात. तर व्हिटॅमिन-D हे हाडांच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त असते. व्हिटॅमिन-B12 हे नर्व्हस सिस्टीमसाठी महत्वाचे असणारे जीवनसत्व केवळ प्राणिज पदार्थातून मिळते. व्हिटॅमिन-B12 देखील लोण्यामध्ये मुबलक असते.

लोण्याचे आयुर्वेदिक गुणधर्म :

आयुर्वेदानुसार लोणी हे स्निग्ध, पचण्यास हलके, चवीला मधुर, रुचकर आहे. बल, स्मरणशक्ती वाढवणारे आहे. शरीरातील मेदधातू चरबीचे प्रमाण वाढते. असे लोण्याचे हितकारी गुणधर्म आयुर्वेदात सांगितले आहेत.

लोणी खाण्याचे फायदे – Benefits of Butter in Marathi :

1) रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते –
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन-ए उपयुक्त ठरत असते. लोण्यात मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन-ए असते. त्यामुळे, लोणी खाण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत होते.

2) पचनक्रिया सुधारते –
लोण्यात असणाऱ्या ग्लाइकोफिंगोलिपिड्स (glycosphingolipids) व ब्युटरेट (butyrate) या घटकामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत होते. यामुळे आतड्यात irritable bowel syndrome (IBS), पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि अतिसार अशा पचनासंबधी समस्येत लोणी फायदेशीर ठरते. [1]

3) कॅन्सरपासून बचाव करते –
लोण्यात conjugated linoleic acid (CLA) याचे प्रमाण अधिक असते. CLA हा पोषकघटक केवळ दुग्धजन्य पदार्थ व मांसाहारी पदार्थ यामध्ये आढळतो. CLA मध्ये कर्करोग विरोधी गुणधर्म (anticancer properties) असल्याचे काही संशोधनात आढळले आहे. यामुळे ब्रेस्ट कॅन्सर, कोलन कॅन्सर, कोलोरेक्टल, पोटाचा कर्करोग, प्रोस्टेट कॅन्सर आणि यकृत कॅन्सर यांपासून संरक्षण होण्यास मदत होऊ शकते. [2]

4) दुर्बलता दूर होते –
लोण्यामध्ये कॅलरीज व फॅटचे भरपूर प्रमाण असते. त्यामुळे लोणी खाण्यामुळे शारीरिक दुर्बलता, अशक्तपणा कमी होण्यास मदत होते. वजन वाढवण्यासाठी लोणी उपयुक्त असते. त्यामुळे वजन कमी असण्याची समस्या असणाऱ्या व्यक्तींनी आहारात लोण्याचा जरूर समावेश करावा. [3]

5) स्मरणशक्ती वाढवते –
मुलांमध्ये बुध्दी व स्मरणशक्ती वाढवण्यासाठी लोणी खाणे फायदेशीर ठरते. त्याचप्रमाणे लोण्याने मुलांची दृष्टीही अधिक तेज होण्यास मदत होते.

6) हाडांच्या मजबुतीसाठी उपयुक्त –
लोण्यामध्ये हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे व्हिटॅमिन-Dआणि कॅल्शिअमचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे लोणी खाण्यामुळे आपली हाडे बळकट होण्यास मदत होते.

7) व्हिटॅमिन A मिळते –
लोण्यामध्ये व्हिटॅमिन-A चे प्रमाण अधिक आहे. व्हिटॅमिन-A हे डोळ्यांच्या व त्वचेच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असते. व्हिटॅमिन-A हे डोळ्यांच्या व त्वचेच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असते. थायरॉईडचा त्रास होऊ नये यासाठी तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी व्हिटॅमिन-A मदत करत असते. लोण्याच्या सेवनाने शरीराला पुरेसे व्हिटॅमिन-A मिळण्यास मदत होते.

दररोज किती चमचे लोणी खावे..?

दररोज लोणी खाण्यापेक्षा कधीतरीचं ते खाणे अधिक योग्य आहे. तसेच एका दिवसात अर्धा ते एक चमचापेक्षा अधिक लोणी खाऊ नये. म्हणजे साधारण 10 ते 14 ग्रॅम पेक्षा अधिक लोणी एका दिवसात खाऊ नका.

लोणी कोणी खाऊ नये..?

लोण्यामध्ये सैचुरेटेड फॅट्सचे प्रमाण अधिक आढळते. सैचुरेटेड फॅट्समुळे लठ्ठपणा व रक्तातील वाईट असे LDL प्रकारचे कोलेस्टेरॉल वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे हार्ट डिसिज, हाय ब्लडप्रेशर, डायबेटिस, हाय कोलेस्टेरॉल, पक्षाघात, लठ्ठपणा यासारख्या समस्येने त्रस्त असणाऱ्या व्यक्तींनी लोणी खाणे टाळले पाहिजे. तसेच ज्यांना दुधाची एलर्जी आहे त्यांनीही लोणी खाणे टाळले पाहिजे.

लोणी खाण्याचे नुकसान – Butter Side effects in Marathi :

लोण्यात सैचुरेटेड फॅट्सचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे लोणी अधिक प्रमाणात खाण्यामुळे रक्तातील वाईट असे LDL प्रकारचे कोलेस्टेरॉल वाढण्याची शक्यता असते. LDL कोलेस्टेरॉलमुळे हृदयाचे विकार, हार्ट अटॅक, हाय ब्लडप्रेशर, पक्षाघात यासारख्या गंभीर समस्या होतात. तसेच लोणी अधिक खाण्यामुळे लठ्ठपणाची समस्याही निर्माण होऊ शकते. हे सर्व तोटे लोणी अधिक खाण्यामुळे होतात. [4]

लोण्यातील पोषकघटक – Butter Nutrition contents :

एक चमचा म्हणजे साधारण 14 ग्रॅम लोण्यातील पोषकघटक पुढीलप्रमाणे आहेत.

  • उष्मांक – 102 कॅलरीज
  • फॅट – 12 ग्रॅम
  • सैचुरेटेड फॅट – 8 ग्रॅम
  • मोनोअनसैचुरेटेड फॅट – 3 ग्रॅम
  • पॉलीअनसैचुरेटेड फॅट – 0.43 ग्रॅम
  • ट्रांस फॅट – 0.47 ग्रॅम
  • व्हिटॅमिन A – 11% of RDA
  • व्हिटॅमिन E – 2% of RDA
  • व्हिटॅमिन B12 – 1% of RDA
  • व्हिटॅमिन K – 1% of RDA
[5]

हे सुद्धा वाचा..

Written by - Dr. Satish Upalkar
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.

Information about Benefits and Side effects of Butter in Marathi language. Article written by Dr Satish Upalkar.

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...