Dr Satish Upalkar’s article about Ghee health benefits in Marathi.

तूप खाण्याचे फायदे व तोटे

तूप – Ghee :

तूप हा एक दुग्धजन्य पदार्थ असून भारतीय आहारात याचा समावेश मोठ्या प्रमाणात केला जातो. तूप हे लोणी वितळवून तयार केले जाते. अनेक उपयुक्त पोषकघटक तुपामध्ये असतात. यातील औषधी गुणधर्म विचारत घेऊन आयुर्वेदाने, तुपाचा औषध म्हणूनच वापर केलेला आहे. त्यातही अधिक जुने असणारे तूप हे आरोग्यासाठी अधिक हितकारी असल्याचे आयुर्वेदात सांगितले आहे. या लेखात तूप खाण्याचे फायदे व तोटे याविषयी माहिती डॉ सतीश उपळकर यांनी दिली आहे.

तूप खाण्यामुळे पचनक्रिया सुधारते, वजन वाढते, दुर्बलता कमी होते, डोळ्यांचे व त्वचेचे आरोग्य सुधारते, हाडे मजबूत होतात. हे सर्व फायदे तूप खाण्यामुळे होतात.

तुपातील पोषकतत्वे –

तुपामध्ये मुबलक प्रमाणात Omega-3 आणि Omega-6 यासारखी उपयुक्त स्निग्धाम्ले (Fatty acids) असतात. याशिवाय तुपात फॅट, प्रोटीन, butyric acid, व्हिटॅमिन-A, व्हिटॅमिन-E, व्हिटॅमिन-K, अशी अनेक उपयुक्त पोषकक्तत्वे असतात.

तुपातील प्रोटीन –
एक चमचा तुपामधून 0.04 ग्रॅम इतके प्रोटीन मिळते तर त्यामध्ये शरीरास आवश्यक अशी 17 amino acids समाविष्ठ असतात.

तुपातील जीवनसत्वे –
एक चमचा तुपामध्ये ‘अ’ जीवनसत्वाचे प्रमाण 393 IU इतके असून, त्यातील डोळ्यांसाठी उपयुक्त असणाऱया Retinal या घटकाचे प्रमाण 105 mcg इतके असते तर बिटा-कॅरोटिनचे प्रमाण 25 mcg इतके असते.

तुपाचे आयुर्वेदिक गुणधर्म :

आयुर्वेदानुसार तुप हे स्निग्ध, शीत वीर्यात्मक असून चवीस मधूर आहे. स्नेह पदार्थात उत्तम असून सर्वधातुवर्धक, जीवनीय, रसायन गुणाचे आहे. बल, वर्ण, बुद्धी, स्मरणशक्ती, नेत्रास हितकारी, भुख वाढवणारे, वय स्थिर ठेवणारे असे साजुक तुपाचे हितकारी गुणधर्म आहेत.

तूप खाण्याचे फायदे – Benefits of ghee in Marathi :

1) पचनक्रिया सुधारते –
तूपामध्ये असणाऱ्या butyric acid मुळे आतड्यातील उतींचे पोषण होते तसेच यामुळे दाह कमी होऊन पचनक्रिया सुधारते. त्याचप्रमाणे पोट साफ होण्यासाठीही यामुळे मदत होते. [1]

2) व्हिटॅमिन A मिळते –
तूपामध्ये व्हिटॅमिन-A चे प्रमाण अधिक आहे. व्हिटॅमिन-A हे डोळ्यांच्या व त्वचेच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असते. तसेच व्हिटॅमिन-A हे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत करत असते. तुपाच्या सेवनाने शरीराला पुरेसे व्हिटॅमिन-A मिळण्यास मदत होते. [2]

3) दुर्बलता दूर होते –
तूप खाण्यामुळे शारीरिक दुर्बलता, अशक्तपणा कमी होण्यास मदत होते. वजन वाढवण्यासाठी तूप उपयुक्त असते. त्यामुळे वजन कमी असण्याची समस्या असणाऱ्या व्यक्तींनी आहारात तुपाचा जरूर समावेश करावा.

4) त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त –
कोरड्या त्वचेची समस्या असल्यास त्वचेवर तुपाने मालिश केल्यास त्वचेतील कोरडेपणा निघून जाते. यामुळे त्वचा मऊ, मुलायम होऊन त्वचेचे आरोग्य सुधारते.

5) सांधेदुखी कमी करते –
सांधेदुखीचा त्रास असल्यास दुखणाऱ्या सांध्यांना तूप लावून हलकी मालिश करावी. यामुळे सांध्यातील सूज कमी होऊन वेदना कमी होतात.

6) हाडांच्या मजबुतीसाठी उपयुक्त –
तूपामध्ये हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे व्हिटॅमिन-D, व्हिटॅमिन-K आणि कॅल्शिअमचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे तूप खाण्यामुळे आपली हाडे बळकट होण्यास मदत होते.

तूप खावे की खाऊ नये..?

तुपामध्ये सैचुरेटेड फॅट्सचे प्रमाण अधिक आढळते. सैचुरेटेड फॅट्समुळे रक्तातील वाईट असे LDL प्रकारचे कोलेस्टेरॉल वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे तुप खावे की नाही खावे असा अनेकांचा प्रश्न असतो. मात्र तुपात conjugated लिनोलिक ऍसिड व ओमेगा-3 फॅटी ऍसिड मोठ्या प्रमाणात असल्याचे काही संशोधनात आढळले आहे. हे दोन्ही घटक विविध प्रकारच्या कॅन्सर, हाय कोलेस्टेरॉल, हृदयविकार आणि लठ्ठपणा या समस्येमध्ये फायदेशीर ठरू शकतात. [3]

तसेच तुपात सैचुरेटेड फॅट्स चे प्रमाण अधिक असले तरीही त्याचा स्मोकिंग पॉइंट हा जास्त आहे. त्यामुळे तूप जास्त गरम केले तरीही त्यातून घातक अशी फ्री रेडिकल्स सहसा तयार होत नाहीत. त्यामुळे तुम्ही जर निरोगी व फिट असाल तर जरूर तुपाचा आहारात समावेश करू शकता.

दररोज किती चमचे तूप खाऊ शकतो..?

दररोज तूप खाण्यापेक्षा कधीतरीचं ते खाणे अधिक योग्य आहे. तसेच एका दिवसात 1 ते 2 चमचेपेक्षा अधिक तूप खाऊ नका.

तूप कोणी खाऊ नये..?

हार्ट डिसिज, हाय ब्लडप्रेशर, डायबेटिस, हाय कोलेस्टेरॉल, पक्षाघात, लठ्ठपणा यासारख्या समस्येने त्रस्त असणाऱ्या व्यक्तींनी तूप खाणे टाळले पाहिजे. [4]

तूप खाण्याचे नुकसान – Ghee Side effects in Marathi :

तुपात सैचुरेटेड फॅट्स चे प्रमाण अधिक असते. एक चमचा तुपामध्ये 33mg इतके कोलेस्टेरॉलचे प्रमाण असते. त्यामुळे तूप खाण्यामुळे रक्तातील वाईट असे LDL प्रकारचे कोलेस्टेरॉल वाढण्याची शक्यता असते. LDL कोलेस्टेरॉलमुळे हृदयाचे विकार, हार्ट अटॅक, हाय ब्लडप्रेशर, पक्षाघात यासारख्या गंभीर समस्या होतात. तसेच तूप अधिक खाण्यामुळे लठ्ठपणाची समस्याही निर्माण होऊ शकते. हे सर्व तोटे तूप अधिक खाण्यामुळे होतात.

तुपातील पोषकघटक – Ghee Nutrition contents :

एक चमचा म्हणजे साधारण 14 ग्रॅम तुपातील पोषकघटक पुढीलप्रमाणे आहेत.

  • उष्मांक – 123 कॅलरीज
  • फॅट – 14 ग्रॅम
  • सैचुरेटेड फॅट – 9 ग्रॅम
  • मोनोअनसैचुरेटेड फॅट – 4 ग्रॅम
  • पॉलीअनसैचुरेटेड फॅट – 0.5 ग्रॅम
  • व्हिटॅमिन A – 13% of RDA
  • व्हिटॅमिन E – 3% of RDA
  • व्हिटॅमिन K – 1% of RDA
Written by - Dr. Satish Upalkar
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.

हे सुद्धा वाचा..

Information about Benefits and Side effects of Ghee in Marathi language. Article written by Dr Satish Upalkar.

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...