पौष्टिक आहार : दुध –
आपल्या शरीराला आवश्यक असे अनेक पोषकघटक दुधामध्ये असतात. त्यामुळेच दुधाला पूर्णान्न असे संबोधले जाते. नवजात बालकाचा एक वर्षापर्यंत दृध हाच प्रमुख आहार असतो.
दुधातून आपणास प्रथिने, कैल्शियम, स्निग्ध पदार्थ, कर्बोदके, जीवनसत्वे, पोटॅशियम यासारख्या खनिजांचा मुबलक पुरवटा होतो.
विविध दुधातील आयुर्वेदिक गुणधर्म –
(1) गाईचे दुध –
देशी गाईचे दुध हे जीवनीय, रसायन म्हणून उत्तम असून त्याच्या सेवनाने, आयुष्याची वृद्धी होते, सर्व धातुंचे पोषण होते. गाईचे दुध त्वचेची कांती, बुद्धी, स्मरणशक्ती सुधारते. थकवा, भ्रम, तहान, भुख, मद नष्ट करते. स्तन्यकर गुणाचे असल्याने स्तन्य उत्पन्न न झालेल्या बाळंतनीस द्यावे.
(2) म्हशीचे दुध –
म्हशीच्या दुधामध्ये स्निग्ध पदार्थांचे प्रमाण जास्त असल्याने ते पचावयास जड असतात. निद्रा आणणारे असल्याने निद्रानाश विकारामध्ये विशेष लाभदायक आहे.
100gm दुधातील पोषक घटक (Milk Nutrition Facts) –
गाय | शेळी | म्हैस | |
कॅलरीज | 66 kcal | 60 kcal | 110 kcal |
पाणी | 87.8g | 88.9g | 81.1g |
एकूण फॅट्स | 3.9g | 3.5g | 8.0g |
सॅच्युरेटेड फॅट्स | 2.4g | 2.3g | 4.2g |
पॉलीअन्सॅच्युरेटेड फॅट्स (PUFA) | 0.1g | 0.1g | 0.2g |
मोनोअन्सॅच्युरेटेड फॅट्स (MUFA) | 1.1g | 0.8g | 1.7g |
कोलेस्टेरॉल | 14mg | 10mg | 8mg |
एकूण कर्बोदके (Sugars i.e Lactose) | 4.8g | 4.4g | 4.9g |
एकूण प्रथिने | 3.2g | 3.1g | 4.5g |
कॅल्शियम | 120mg | 100mg | 195mg |
हे सुद्धा वाचा..
तुपातील पोषक घटक
लेण्यातील पोषक घटक
ताकातील पोषक घटक
दह्यातील पोषक घटक
Milk nutrition contents in Marathi.