Dr Satish Upalkar’s article about Ascites in Marathi.

पोटात पाणी होणे म्हणजे काय ..?

यकृताकडून जेंव्हा योग्यरित्या कार्य केले जात नाही तेंव्हा पोटात पाणी होण्याचा विकार होतो. पोटात पाणी होणे ह्या आजाराला वैद्यकीय भाषेत Ascites असे म्हणतात. या विकारात पोटात पाणी जमा होऊ लागते. या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी पोटात पाणी जमा होण्याची कारणे, लक्षणे, त्रासाचे निदान आणि त्यावरील उपचार याविषयी माहिती दिली आहे.

पोटात पाणी का व कशामुळे होते ..?

प्रामुख्याने यकृत सिरोसिसमुळे पोटात पाणी जमा होण्याची समस्या होते. सिरोसिसमुळे यकृताचे कार्य बिघडते तसेच यामुळे पाचक अवयवांकडून यकृताकडे जाणाऱ्या पोर्टल शिरामधील दाब वाढतो. जसजसा हा दाब अधिक वाढतो तसे किडनीचे कार्य बिघडते आणि पोटात पाणी जमा होऊ लागते.

याशिवाय काहीवेळा कॅन्सरमुळेही पोटात पाणी होण्याचा विकार होत असतो. साधारण 10% रुग्णात कॅन्सरमुळे पोटात पाणी जमा झालेले दिसून येते. तसेच हार्ट फेल्युअर आणि किडन्या निकामी झाल्यानेही पोटात पाणी जमा होत असते.

पोटात पाणी होण्याची कारणे – Ascites causes in Marathi :

  • लिव्हर सिरोसिस हा यकृताचा आजार पोटात पाणी होणे या विकाराचे प्रमुख कारण आहे. याशिवाय,
  • पोटाजवळील अवयवांतील कर्करोग,
  • यकृत निकामी होणे,
  • हृद्य निकामी होणे (हार्ट फेल्युअर),
  • किडन्या निकामी होणे,
  • इन्फेक्शन,
  • स्वादुपिंडाला सूज येणे, यासारखी कारणे पोटात पाणी जमा होण्याला कारणीभूत असतात.

हे सुध्दा वाचा – लिव्हर सिरोसिस या आजाराविषयी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

पोटात पाणी होण्याची लक्षणे – Symptoms of Ascites in Marathi :

  • पोटात पाणी झाल्याने पोटाचा आकार वाढतो,
  • पोटदुखी,
  • श्वास घेताना त्रास होणे,
  • मळमळ होणे,
  • उलट्या होणे,
  • भूक न लागणे,
  • ताप येणे यासारखी लक्षणे पोटात पाणी जमा झाल्याने जाणवू शकतात.

त्रासाचे निदान – Ascites Diagnosis test :

ओटीपोटाची तपासणी करून आपले डॉक्टर पोटात पाणी होणे या आजाराचे निदान करतत. याशिवाय अल्ट्रासाऊंड, सीटी स्कॅन, एमआरआय स्कॅन, रक्त चाचण्या, लेप्रोस्कोपी अश चाचण्या कराव्या लागू शकतात.

पोटात पाणी होणे यावर उपचार – Ascites treatments in Marathi :

कोणत्या कारणांमुळे पोटात पाणी जमा होत आहे, आजाराची तीव्रता काय आहे यानुसार यावरील उपचार ठरतात. पोटात पाणी होणे यावर प्रामुख्याने लघवीचे प्रमाण वाढवण्यास उपयोगी ठरणारी Diuretics औषधे वापरली जातात. यामुळे पोर्टल शिरांवर आलेला दाब कमी होण्यास मदत होते. हे औषध उपचार सुरू असताना आहारातील मिठाचे प्रमाण कमी करण्याची तसेच अल्होहोल सेवन न करण्याची सूचना आपले डॉक्टर देतील. त्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.

Paracentesis पद्धत –

जर Diuretics औषधे देऊनही पोटातील पाणी कमी होत नसल्यास Paracentesis पद्धत वापरली जाते. पॅरासेंटेसिस मध्ये विशिष्ट प्रकारच्या इंजेक्शनद्वारे पोटातून मोठ्या प्रमाणात द्रव बाहेर काढून टाकला जातो.

Surgery –

याशिवाय काहीवेळा सर्जरीद्वारे पोटात जमा होणारा द्रव शरीरातून बाहेर पडण्यासाठी ट्युबद्वारे व्यवस्था केली जाते. यकृताच्या गंभीर आजारामुळे पोटात पाणी जमा होत असल्यास यावेळी liver transplant (यकृत प्रत्यारोपण) करण्याचा सल्ला डॉक्टर देऊ शकतात. हार्ट फेल्युअर मुळे पोटात पाणी जमा होत असल्यास शस्त्रक्रियेची आवश्यकता असते.

पोटात पाणी होणे यावर उपाय –

पोटात पाणी होणे ह्या आजारावर वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असते. वैद्यकीय उपचारामध्ये आजाराचे नेमके कारण व तीव्रता पाहून यावर डॉक्टर योग्य उपचार ठरवतात. त्यामुळे पोटात पाणी होणे यावर कोणतेही घरगुती उपाय करीत वेळ वाया घालवू नये. घरगुती उपाय करून हा त्रास कमी होत नाही. त्यामुळे पोटात पाणी होणे यावर वेळीच डॉक्टरांकडून उपचार घ्यावेत.

पोटात पाणी होण्याचा विकार होऊ नये यासाठी घ्यायची काळजी –

  • अल्कोहोल, स्मोकींग यासारखी व्यसने करणे टाळा.
  • आहारातील चरबीचे पदार्थ खाणे कमी करा.
  • मिठाचे आहारातील प्रमाण कमी करा.
  • आहारात हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे यांचा समावेश अधिक करा.
  • नियमित व्यायाम करा.
  • वजन आटोक्यात ठेवा.
  • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय परस्पर वेदनाशामक गोळ्या खाणे टाळा.
  • हिपॅटायटीस ह्या यकृताच्या आजारापासून पासून बचाव करण्यासाठी हिपॅटायटीस बी लसीबद्दल तुमच्या डॉक्टरांना विचारा आणि संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी योग्य ती काळजी घ्या.

अशी काळजी घेतल्यास काही प्रमाणात या त्रासापासून दूर राहण्यास मदत होईल.

Written by - Dr. Satish Upalkar
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.

हे सुध्दा वाचा – हिपॅटायटीसची माहिती व त्यापासून दूर राहण्याचे उपाय जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

6 Sources

Information about Ascites Causes, Symptoms, Diagnosis test, Prevention tips and Treatments in Marathi language. Article written by Dr Satish Upalkar.

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...