स्नायू बळकट करणे –
आपले स्नायू बळकट करण्यासाठी व्यायाम आणि त्याच्या जोडीला योग्य आहाराची गरज असते. प्रोटिन्सयुक्त पदार्थ स्नायू बळकट होण्यासाठी खूप महत्वाचे असतात. प्रोटिन्समुळे मांसपेशींचे पोषण होऊन स्नायू बळकट होण्यासाठी मदत होते.
स्नायू बळकट करण्यासाठी काय खावे ..?
आपले स्नायू मजबूत होण्यासाठी आहारात प्रोटीन, कर्बोदके आणि हेल्दी फॅटचा समावेश असला पाहिजे. यासाठी दूध व दुधाचे पदार्थ, अंडी, मांस, मासे, चिकन, हिरव्या पालेभाज्या, विविध फळे, केळी, सुकामेवा, धान्ये व कडधान्ये असे आहार पदार्थ खावेत. यातून उपयुक्त पोषकघटक म्हणजे प्रोटीन्स, फॅट्स, कर्बोदके, व्हिटॅमिन्स, अँटी-ऑक्सिडंट, क्षार व खनिजतत्वे शरीराला मिळतात. यामुळे स्नायूंची झालेली झीज भरून निघते व स्नायू बळकट होतात.
स्नायू बळकट करण्यासाठी आहार –
अंडी –
अंड्यांमध्ये उच्च दर्जाची प्रथिने, हेल्दी फॅट्स व्हिटॅमिन-B असे उपयुक्त पोषकघटक असतात. अंड्यात स्नायूंच्या वाढीसाठी महत्वाचे असणारे ल्युसीन हे अमीनो ऍसिड भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे स्नायू बळकट करायचे असल्यास तुमच्या आहारात उकडलेल्या अंड्याचा जरूर समावेश करा.
मांस, मासे व चिकन –
स्नायूंच्या वाढीसाठी व मजबुतीसाठी मांसाहारी पदार्थ एक उत्तम पर्याय असतात. मांस, मासे व चिकन यामध्ये उच्च दर्जाचे प्रोटीन मुबलक प्रमाणात असते. यामुळे स्नायूंची झालेली झीज भरून निघते व स्नायू बळकट होतात. त्यामुळे स्नायू मजबूत होण्यासाठी मांस, मासे व चिकन अशा मांसाहारी पदार्थांचा आहारात समावेश करू शकता.
दुग्धजन्य पदार्थ –
दूध व दुधाच्या पदार्थात प्रोटीन्स, फॅट्स, व्हिटॅमिन-D अशी महत्वाची पोषकतत्वे असतात. त्यामुळे स्नायू बळकट करण्यासाठी आहारात दूध, दही, पनीर अशा दुग्धजन्य पदार्थांचा जरूर समावेश केला पाहिजे. दूध व दुग्धजन्य पदार्थ हे शाकाहारी लोकांसाठी प्रोटीन्सचा एक महत्त्वाचा असा पर्याय असतात.
सुकामेवा –
शेंगदाणे, बदाम, काजूगर, अक्रोड, पिस्ता, खारीक, जवस, खजूर, मनुका असे ड्रायफ्रूटस शरीराच्या तसेच स्नायूंच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. यात उपयुक्त असे हेल्दी फॅट्स, प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल असतात.
त्यामुळे स्नायू मजबूत व बळकट करण्यासाठी आहारात सुकामेव्याचे पदार्थ जरूर समाविष्ट करा.
कडधान्ये –
हरभरा, उडीद, मूग, चवळी, बीन्स यासारखी कडधान्ये देखील स्नायू बळकट करण्यासाठी उपयुक्त असतात. कडधान्यात सुद्धा प्रोटीन्सचे चांगले प्रमाण असते. त्यामुळे स्नायू बळकट करण्यासाठी तुमच्या आहारात डाळ, उसळ, मोड आलेली कडधान्ये यांचा जरूर समावेश करा.
सोयाबीन –
सोयाबीन व सोया प्रोडक्ट हे स्नायू बळकट करण्यासाठी फायदेशीर असतात. सोयाबीनमध्ये मुबलक प्रमाणात प्रथिने, हेल्दी फॅट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. त्यामुळे स्नायू बळकट करण्यासाठी तुमच्या आहारात सोया प्रोडक्टचा जरूर समावेश करा.
मात्र काय खाणे टाळले पाहिजे ..?
शरीरात अनावश्यक चरबी वाढवणारे पदार्थ खाणे टाळले पाहिजे. यासाठी फास्टफूड, जंकफूड, मैद्याचे बेकरी प्रोडक्ट, मिठाई, तळलेले पदार्थ खाणे टाळावे. कारण यामुळे शरीरात अनावश्यक चरबी वाढते. शरीरात वाढलेल्या चरबीमुळे हृदयविकार, पक्षघात, मधुमेह, हाय ब्लडप्रेशर अशा समस्यांचा धोका अधिक वाढतो.
हे सुध्दा वाचा – वजन वाढवण्याचे उपाय
Read Marathi language article about Muscle Building Foods list. Last Medically Reviewed on February 26, 2024 By Dr. Satish Upalkar.