Dr Satish Upalkar’s article about health benefits of Pistachios nuts in Marathi.

Pistachios nuts health benefits in Marathi

पिस्ता – Pistachios nuts :

पिस्ता स्वादिष्ट चवीचे आणि अनेक पोषकतत्वांनी युक्त असतात. यामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटिन्स, हेल्दी फॅट्स, ओमेगा-3 फॅटी ऍसिड, फायबर्स, व्हिटॅमिन-B6, अँटि-ऑक्सिडंट्स, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि खनिजे असतात. यातील पोषकघटक हृदयाच्या आरोग्यासाठी, वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त असतात. या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी पिस्ता खाण्यामुळे होणारे फायदे व तोटे याविषयी माहिती सांगितली आहे.

पिस्ता खाण्याचे फायदे :

पिस्तामध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिडचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे पिस्ता खाण्यामुळे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होते, रक्तदाब नियंत्रित राहतो. त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. तसेच पिस्ता खाल्याने वजन व रक्तातील साखर आटोक्यात राहत असल्याने डायबिटीस कंट्रोल करण्यासाठी पिस्ता खाणे उपयुक्त असते. पिस्तामध्ये असणारी अँटी-ऑक्सिडंट्स ही डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. आरोग्यासाठी असे अनेक फायदे पिस्ता खाण्यामुळे होतात. त्यामुळे तुमच्या आहारात याचा जरूर समावेश करा.

1) पिस्तामध्ये व्हिटॅमिन-B6 चा मुबलक असते..
पिस्तामध्ये व्हिटॅमिन-B6 भरपूर प्रमाणात असते. शरीरातील अनेक महत्वाच्या कार्यांसाठी व्हिटॅमिन-B6 ची आवश्यकता असते. रक्तातील साखर नियंत्रित राहण्यासाठी आणि हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी व्हिटॅमिन-B6 ची गरज असते.

2) पिस्तामध्ये उपयुक्त अँटी-ऑक्सिडंट्स असतात..
सुक्यामेव्यातील अक्रोड, बदाम यासारख्या इतर नट्स पेक्षा पिस्तामध्ये सर्वात जास्त अँटी-ऑक्सिडंट्स असतात. अँटी-ऑक्सिडंट्स निरोगी आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. पिस्तामधील अँटी-ऑक्सिडंट्समुळे कँसर होण्यापासून रक्षण होण्यास मदत होते. शिवाय यातील lutein आणि zeaxanthin हे अँटी-ऑक्सिडंट्स डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात.

3) पिस्ता खाल्ल्याने हृद्यविकाराचा धोका कमी होतो..
पिस्तामध्ये हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या ओमेगा-3 फॅटी ऍसिडचे प्रमाण जास्त असते. तसेच दररोज पिस्ता खाण्यामुळे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होते, ब्लडप्रेशर नियंत्रित राहते, वजन आटोक्यात राहते आणि रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारते त्यामुळे हृद्यविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते.

4) पिस्ता ब्लडप्रेशर नियंत्रित ठेवते..
दररोज पिस्ता खाण्यामुळे रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते. हाय ब्लडप्रेशरमुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक (पक्षाघात) आणि किडन्या निकामी होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे ब्लडप्रेशर कंट्रोलमध्ये ठेवणे आवश्यक असते. उच्च रक्तदाबाची समस्या असणाऱ्यानी आहारात पिस्ताचा जरुर समावेश करावा.

5) पिस्ता खाल्याने वाईट कोलेस्टेरॉल कमी होते..
पिस्तामधील अँटी-ऑक्सिडंट्समुळे वाईट कोलेस्टेरॉल कमी होते व चांगले कोलेस्टेरॉल वाढण्यास मदत होते. रक्तामध्ये वाईट कोलेस्टेरॉलचे (LDL कोलेस्टेरॉलचे) प्रमाण जास्त असल्यास हार्ट अटॅक, हृदयविकार, पक्षघात, हाय ब्लडप्रेशर होण्याचा धोका जास्त वाढतो. यासाठी रक्तात वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असणे गरजेचे असते. पिस्ता खाण्यामुळे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल आणि triglycerideची पातळी कमी होण्यास आणि चांगल्या कोलेस्टेरॉलचे (HDL कोलेस्टेरॉल) चे प्रमाण वाढण्यास मदत होते.

6) डायबेटीस रुग्णांसाठी पिस्ता योग्य आहेत..
पिस्तामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असून याचा Glycemic index (GI) सुद्धा अत्यंत कमी आहे. एखादा अन्नपदार्थ खाल्यानंतर त्यातील कर्बोदके (साखर) किती जलदपणे रक्तात मिसळली जातात यावरून त्या पदार्थाचा Glycemic index ठरवला जातो.

पिस्तामध्ये अॅन्टिऑक्सिडेंट्स, मॅग्नेशियम, फायबर्स, कॅरोटीनोड्स आणि फिनोलिक compounds चे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होत असल्याने पिस्ता हे मधुमेही रुग्णांसाठी योग्य असतात.

7) पिस्ता खाल्याने वजन आटोक्यात राहते..
पिस्तामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असून ते फायबर आणि प्रथिनांनी समृद्ध असतात. पिस्तामध्ये मसल्ससाठी आवश्यक असणारे प्रोटिन्स भरपूर प्रमाणात असते. पिस्ता खाल्यामुळे पोट भरून भूक कमी लागते. त्यामुळे वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.

दररोज किती पिस्ता खाव्यात..?

दररोज 5 ते 7 पिस्ता आहारात समावेश करू शकता. पिस्तावर जाड टरपल असते ते काढून आतील गर खावा.

पिस्ता खाण्याचे तोटे (Side effects) :

पिस्ता अत्यंत पौष्टिक असतात. मात्र काही जणांना अधिक प्रमाणात पिस्ता खाण्यामुळे पित्ताचा त्रास, अतिसार, बद्धकोष्ठता, गॅसेस, पोटदुखी असे त्रास होऊ शकतात. नैसर्गिक पिस्ता नट्स खारट नसतात. मात्र roasted पिस्ता नट्स ह्या मीठ घालून खारवल्या जातात. अशा मीठ असलेल्या पिस्ता खाल्यामुळे सोडिअम अधिक प्रमाणात शरीरात जाऊन हाय ब्लडप्रेशर वैगेरे त्रास होऊ शकतो. यासाठी खारट नसलेल्या नैसर्गिक पिस्ता (Unsalted pistachio nuts) खरेदी कराव्यात.

पिस्तामधील पोषकघटक (Nutrition Facts) :

एक औंस म्हणजे सुमारे 49 पिस्तांमध्ये खालील पोषकतत्वे (Nutrients contents) असतात.

  • ऊर्जा – 156 कॅलरीज
  • कर्बोदके – 8 ग्रॅम
  • फायबर – 3 ग्रॅम
  • प्रोटिन्स – 6 ग्रॅम
  • फॅट्स – 12 ग्रॅम (90 टक्के हेल्दी फॅट्स)
  • पोटॅशियम – 8% of RDI
  • फॉस्फरस – 14%
  • व्हिटॅमिन B6 – 24%
  • थियामीन – 16%
  • तांबे – 18%
  • मॅंगनीज – 17%
Written by - Dr. Satish Upalkar
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.

हे सुद्धा वाचा..
बदाम खाण्याचे फायदे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

In this article information about Pistachios nuts health benefits and side effects in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar (Certified physician and Healthcare expert).

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...