शिंगाडा खाण्याचे फायदे (Water chestnuts benefits)

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Shingada in marathi, water chestnuts benefits in marathi, shingada fruit in Marathi.

शिंगाडा (Water chestnut) :

शिंगाडा हे चविष्ट आणि पौष्टिक असे फळ असून याला english मध्ये Water chestnut (वॉटर चेस्टनट) असे म्हणतात. शिंगाडामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, अँटी-ऑक्सिडंट्स, पोटॅशियम, मँगनीज, तांबे, व्हिटॅमिन-B6 आणि रिबोफ्लाव्हिन ही पोषकतत्वे असतात.

शिंगाडामध्ये मोठ्या प्रमाणात तंतुमय पदार्थ (फायबर्स) असतात. फायबर्सचा रोजच्या आहारात समावेश असणे गरजेचे असते. फायबर्समुळे पोट नियमित साफ होते, रक्तातील साखर नियंत्रित राहते. शिवाय फायबर्समुळे विविध कँसर, हार्ट अटॅक, मधुमेह यांचा धोका कमी होतो.

शिंगाडे खाण्याचे फायदे :

ब्लडप्रेशर कंट्रोलमध्ये राहते..
हाय ब्लडप्रेशरमुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक (पक्षाघात) आणि किडन्या निकामी होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे ब्लडप्रेशर कंट्रोलमध्ये ठेवणे आवश्यक असते. शिंगाडामध्ये पोटॅशियमचे मुबलक प्रमाण असते. त्यामुळे रक्तदाब आटोक्यात राहण्यास मदत होते.

मूळव्याधमध्ये उपयुक्त..
शिंगाडामध्ये फायबर्सचे प्रमाण जास्त असल्याने नियमित पोट साफ होण्यास मदत होते. त्यामुळे मूळव्याधीच्या त्रासात बद्धकोष्ठता होऊन शौचास त्रास होत असल्यास त्यावर शिंगाडे उपयुक्त ठरते,

सूज कमी करते..
शरीरावर मुका मार लागून सूज आल्यास त्यावर त्यावर शिंगाड्याचा लेप लावल्यास आराम मिळतो.

गरोदरपणात उपयुक्त..
गरोदरपणात शिंगाडा खाणे उपयुक्त ठरते. कारण यामुळे गरोदरपणात (Pregnancy) वाढणारा उच्च रक्तदाब नियंत्रित राखण्यास मदत होते आणि गर्भाची वाढही चांगली होते. तसेच गर्भपाताचा धोकाही कमी होतो. प्रसूतीनंतरही शिंगाडाचे पीठ आहारात वापरल्यास स्तनपानासाठी आईला पुरेसे दूध येण्यास मदत होते.

कावीळमध्ये उपयोगी..
कावीळ झाल्यास कच्चे शिंगाडे खावे यामुळे कावीळ लवकर बरी होण्यास मदत होते.

जुलाब थांबवते..
जुलाब झाल्यास शिंगाडा खाण्यामुळे जुलाब थांबण्यास मदत होते. जुलाबमुळे आलेला थकवाही दूर होतो.

भूक वाढवते..
भूक लागत नसल्यास कच्चे शिंगाडा खावे यामुळे भूक वाढते. याशिवाय शिंगाडे हे खूप पौष्टिक असल्याने त्यामुळे शरीराला उर्जा मिळते. यामुळे उपवासात शिंगाड किंवा शिंगाड्याचे पीठ वापरले जाते. 

खोकला आणि दम्यामध्ये उपयुक्त..
शिंगाड्याची पावडर पाण्यातून घेतल्याने कफ बाहेर पडण्यास मदत होते.

टाचा फुटणे यावर उपयुक्त..
शिंगाड्यामध्ये मँगनीजचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पायाच्या टाचा फुटण्याची समस्या दूर होण्यास मदत होते.

वजन कमी करते..
शिंगाडा मध्ये 74% पाणी असून कॅलरीजही कमी असतात. त्यामुळे शिंगाडा नियमित खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

गंभीर आजारांपासून रक्षण होते..
शिंगाडामध्ये अनेक उपयुक्त अशी अँटिऑक्सिडंट्स आहेत. यामध्ये प्रामुख्याने फेरिलिक ऍसिड, गॅलोकेटचिन गॅलेट, एपिकेटिलीन गॅलेट आणि कॅटेचिन गॅलेट ही अँटिऑक्सिडंट्स असतात. यामुळे विविध प्रकारचे कँसर, हृदयविकार, टाईप 2 डायबेटीस यासारख्या गंभीर आजारांपासून रक्षण होते.

शिंगाडे कसे खावेत..?

शिंगाडा हे फळ हिवाळ्यात म्हणजे सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये बाजारात येत असते. शिंगाडे कच्चे किंवा उकडून खातात. तसेच त्याचा रसही काढून पितात. याशिवाय शिंगाडे सुकवून, सोलून त्याचे पीठ तयार करून ते आहारात विविध पदार्थ करून वापरले जाते.

शिंगाडा खाण्याचे नुकसान :

अधिक प्रमाणात शिंगाडा खाल्यास पचनक्रिया बिघडू शकते. बद्धकोष्ठता, पोटात दुखणे यासारखे त्रास होऊ शकतात. याशिवाय कफदोष वाढून सर्दी, खोकला यासारखे त्रास होऊ शकतात.

शिंगाडे खाताना कोणती काळजी घ्यावी..?

शिंगाडा अधिक प्रमाणात खाणे टाळावे तसेच शिंगाडा खाल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये. कारण शिंगाडा खाल्यानंतर लगेच पाणी पिण्यामुळे कफदोष वाढण्याची जास्त शक्यता असते.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

शिंगाडा पोषकघटक :

शिंगाडा हे अनेक पोषकतत्वांनी भरलेले असतात. 100 ग्रॅम कच्च्या शिंगाडामध्ये खालील घटक असतात.

ऊर्जा – 9 7 कॅलरीज
फॅट – 0.1 ग्रॅम
कर्बोदके – 23.9 ग्रॅम
फायबर – 3 ग्रॅम
प्रथिने (प्रोटीन) – 2 ग्रॅम
पोटॅशियम – 17%
मॅंगनीज- 17%
तांबे – 16%
व्हिटॅमिन B6 – 16%
रिबोफ्लाव्हिन – 12%

Water chestnuts benefits in marathi, singada benefits in marathi, chestnut benefits in Marathi.