चिलगोजे खाण्याचे फायदे (Pine Nuts health benefits)

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Chilgoza in marathi, chilgoza dry fruit in Marathi, Pine nuts in marathi health benefits.

चिलगोजे (Pine Nuts) :

चिलगोजेला पाइन नट्स असेही म्हणतात. चिलगोजा चविष्ट असून यात अनेक पोषकघटकही असतात. यामध्ये अँटी-ऑक्सीडेंट, व्हिटॅमिन-B1, व्हिटॅमिन-B2, व्हिटॅमिन-C, प्रोटिन्स, मोनोसैच्युरेटेड फैट, फायबर्स, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह, झिंक, कॅल्शियम, मँगनीज आणि तांबे अशी अनेक पोषकतत्वे असतात.

चिलगोजे खाण्याचे फायदे :

हार्टसाठी उपयोगी..
चिलगोजेमध्ये हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असणारी टोकोफेरोल, स्कुआलेन आणि फाइटोस्टेरॉल हे अँटी-ऑक्सिडंट तसेच लिनोलिक फॅट आणि ओलेक एसिडचे मुबलक प्रमाण असते त्यामुळे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होते व HDL प्रकारचे चांगले कोलेस्टेरॉल वाढते त्यामुळे हृदयविकार पासून दूर राहण्यास मदत होते.

हिमोग्लोबिन वाढवते..
चिलगोजामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. लोहामुळे अॅनिमियापासून दूर राहण्यास मदत होते. अॅनिमियाचे रुग्ण आणि गर्भवती महिलांनी चिलगोजा जरूर खायला पाहिजे. कारण यात आढळणारा लोह शरीरात थेट शोषला जाऊन यामुळे लोहाची कमतरता दूर होते.

गर्भवती महिलांसाठीही उपयुक्त..
चिलगोजेमध्ये लोह, प्रोटीन भरपूर प्रमाणात असल्याने गरोदर स्त्रियांसाठी हे उपयुक्त असते. चिलगोजा हा लोहाचा एक चांगला स्रोत आहे. गरोदरपणात गरोदर स्त्री आणि गर्भाच्या विकासासाठी लोहाची गरज असते.

इम्यूनिटी वाढवते..
चिलगोजेमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुण असतात त्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती (इम्यूनिटी) वाढते. इम्यूनिटी वाढल्याने सर्दी, खोकला यासारखे आजार सहजासहजी होत नाहीत.

लैंगिक आरोग्यासाठी (Sexual Health) उपयुक्त..
फॅटी ऍसिड आणि आयर्न यांमुळे भरपूर असणारे चिलगोजा हे पुरुषांमध्ये लैंगिक क्षमता वाढून नपुंसकता समस्या दूर करण्यास उपयोगी ठरते. यामुळे शुक्रजंतू (sperm production) आणि टेस्टोस्टेरॉन हार्मोन वाढण्यास मदत होते. त्यामुळे पुरुषांसंबंधित वंध्यत्व समस्या दूर होतात.

वजन कमी होते..
रोज चार ते पाच चिलगोजे खाण्यामुळे वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.

उंची वाढवते..
चिलगोजेमध्ये असणारे कॅल्शियम हे लहान मुलांमध्ये उंची वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते. यासाठी मुलांना दररोज 2 ते 3 चिलगोजे खाण्यास द्यावे. चिलगोजे खाऊन झाल्यावर ग्लासभर दूध पिण्यास द्यावे यामुळे मुलांची उंची वाढण्यास मदत होईल.

स्मरणशक्ती वाढवतो..
चिलगोजा हे आपल्या ब्रेनसाठी टॉनिकप्रमाणे काम करते. यामध्ये असणारे व्हिटॅमिन-B1 मुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.

पायात गोळे येत असल्यास उपयुक्त..
यात असणाऱ्या कॅल्शियम, पोटॅशियम, ओलिक आणि लिनोलेनिक ऍसिडमुळे मसल्स cramps दूर होण्यास मदत होते. त्यामुळे पायात गोळे येत असल्यास चिलगोजा खाणे उपयुक्त असते.

चिलगोजा खाण्याचे नुकसान :

काही जणांना चिलगोजे खाण्यामुळे ऍलर्जी होऊ शकते.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

चिलगोजे कसे खावे, चिलगोजे खाताना कोणती काळजी घ्यावी..?

चिलगोजे बाजारातून खरेदी करताना सालीसकट असणारे चिलगोजे खरेदी करावेत. चिलगोजे खाताना साल काढून कच्चे, भाजी करून किंवा भाजून खावेत. याचे फायदे अनेक असले तरीही 5 पेक्षा जास्त चिलगोजे खाणे टाळावे. तसेच उपाशीपोटी चिलगोजे खाऊ नयेत.

चिलगोजे पोषकघटक :

100 ग्रॅम चिलगोजेमध्ये पुढीलप्रमाणे पोषकतत्वे (nutritional contents) असतात.
ऊर्जा – 673 कॅलरीज
फॅट – 68 ग्रॅम
कोलेस्टेरॉल – 0 मिलीग्राम
कर्बोदके – 13 ग्रॅम
फायबर – 3.7 ग्रॅम
साखर – 3.6 ग्रॅम
प्रथिने (प्रोटीन) – 14 ग्रॅम
सोडियम – 2 मिलीग्राम
व्हिटॅमिन ए – 1%
व्हिटॅमिन सी – 1%
कॅल्शियम – 2%
लोह (आयर्न) – 31%

Pine nuts health benefits in Marathi, pine nuts how to eat marathi information.