Dr Satish Upalkar’s article about Memory increase tips in Marathi.

स्मरणशक्ती वाढवणे –

आपली स्मरणशक्ती चांगली असणे हे आपल्या एकूणच जीवनामध्ये खूप महत्वाचे असते. चांगल्या स्मरणशक्ती मुळे व्यक्तीचा विकास होण्यास मदत होते. पोषक घटकांची कमतरता आणि वृद्धत्व यामुळे आपली स्मरणशक्ती कमी होते. स्मरणशक्ती कमी झाल्याने रोजच्या जीवनात काही अडचणी येऊ शकतात. यासाठी या लेखात स्मरणशक्ती वाढविण्याचे सोपे उपाय डॉ सतीश उपळकर यांनी सांगितले आहेत.

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी 6 सोपे घरगुती उपाय –

1) स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हिरव्या पालेभाज्या व फळे खा..
हिरव्या पालेभाज्या आणि फळे यामध्ये अनेक उपयुक्त अँटिऑक्सिडंट्स असतात. या अँटिऑक्सिडंट्समुळे मेंदूतील रक्तवाहिन्या मजबूत आणि लवचिक बनण्यास मदत होते. फळे आणि हिरव्या भाज्यामध्ये स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक असणारे फॉलिक ऍसिड आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तुमच्या जेवणात हिरव्या पालेभाज्या व ताजी फळे यांचा अधिक समावेश करा.

2) स्मरणशक्ती वाढीसाठी पुरेशी झोप घ्या..
झोप आणि स्मरणशक्ती यांचा खूप जवळचा संबंध असतो. त्यामुळे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी पुरेशी झोप व विश्रांती घेणे आवश्यक असते. स्मरणशक्ती वाढण्यासाठी मोठ्यांनी सात ते आठ तासांची दररोज झोप घ्यावी. तर शालेय मुलांनी 8-10 तास झोप घ्यावी. चांगली झोप येण्यासाठी उपाय जाणून घ्या..

3) स्मरणशक्ती साठी ध्यान धारणा करा..
ध्यान, धारणा व प्राणायाम केल्याने मानसिक ताण कमी होतो. यामुळे एकाग्रता वाढते आणि त्यामुळे मेंदूला चालना मिळून स्मरणशक्ती वाढते. त्यामुळे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी दररोज ध्यान, धारणा व प्राणायाम करावा.

4) स्मरण शक्ती वाढवण्यासाठी नियमित व्यायाम करा..
नियमित व्यायाम केल्याने शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित होते. त्यामुळे आपल्या मेंदूला योग्य प्रमाणात रक्ताचा पुरवठा होतो. यामुळे मेंदूला ऑक्सिजन आणि पोषकतत्त्वे मिळतात. पर्यायाने मेंदूला चालना मिळून स्मरणशक्ती वाढीसाठी मदत होते. लठ्ठपणामुळे स्मरणशक्ती विपरीत परिणाम होतो. व्यायामाने वजन आटोक्यात राहत असते. म्हणून स्मरणशक्ती वाढवण्यासाठी दररोज किमान अर्धा तास व्यायाम केला पाहिजे. व्यायामात चालणे, पळणे, सायकलिंग, पोहणे, दोरीउड्या, डान्स, पायऱ्या चढणे, मैदानी खेळ, योगासने यांचा समावेश करू शकता. व्यायामाचे फायदे जाणून घ्या..

5) स्मरणशक्ती वाढीसाठी मेंदूला चालना द्या..
मेंदूला चालना देणारे विविध खेळ खेळून स्मरणशक्ती वाढण्यासाठी चांगली मदत होते. यासाठी शब्दकोडे, Sudoku, बुध्दिबळ यासारखे खेळ खेळावेत. यामुळे स्मरणशक्ती, एकाग्रता वाढते.

6) स्मरणशक्ती सुधारण्यासाठी बदाम खा..
मेंदूच्या आरोग्यासाठी बदाम खूप उपयुक्त असते. बदाममध्ये असणारे अँटीऑक्सिडंट, प्रोटिन्स, व्हिटॅमिन-E हे पोषकघटक मेंदूमध्ये ऑक्सिडेटिव्ह डॅमेज आणि सूज कमी करण्यास मदत करतात. बदाम खाण्यामुळे मेंदू तल्लख होऊन स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते. लहान मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी रात्रभर भिजवलेले 2 ते 3 बदाम सकाळी दुधासह द्यावे. यामुळे मुलांची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. हा घरगुती उपाय स्मरणशक्ती वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. बदाम खाण्याचे फायदे जाणून घ्या..

अशाप्रकारे येथे स्मरण शक्ती वाढवण्याचे सोपे उपाय सांगितले आहेत. हे घरगुती उपाय करून तुम्ही तुमची स्मरणशक्ती निश्चितच वाढवू शकता.

Written by - Dr. Satish Upalkar
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.

हे सुध्दा वाचा – स्मरणशक्ती कमी होणाऱ्या अल्झायमर आजाराची माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

4 Sources

In this article information about Memory Booster tips in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar (Certified physician and Healthcare expert).

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...