तब्येत सुधारणे –

चुकीचे खानपान, आजारपण, मानसिक ताण, अपुरी झोप, व्यसने अशा अनेक कारणांमुळे तब्येत खराब होत असते. मात्र आपण हेल्दी लाईफस्टाईलचा अवलंब करून तब्येत सुधारणे सहज शक्य आहे. या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी तब्येत सुधारण्यासाठी घरगुती उपाय सांगितले आहेत. या उपायांनी आपली तब्येत सुधारण्यास निश्चितच मदत होईल.

तब्येत सुधारण्याचे घरगुती उपाय डॉ सतीश उपळकर येथे सांगितले आहेत.

तब्येत खराब होण्याची कारणे –

  • वजन कमी असल्याने अनेकांची तब्येत खराब असते.
  • चुकीच्या खानपानमुळे पोषणतत्वांची शरीरात कमतरता झाल्याने तब्येत खराब होत असते.
  • पुरेसे जेवण न घेण्यामुळे तब्येत खराब होते.
  • खाल्लेले लागत नसल्यास, अपेक्षित वजन वाढत नसल्यास त्यामुळेही तब्येत खराब होते.
  • आजारणामुळे सुध्दा तब्येत खराब होत असते.
  • अपुरी झोप, कामाचा ताण किंवा मानसिक ताणतणाव यामुळेही तब्येत खराब होते.
  • अल्कोहोल, सिगारेट, तंबाखू यासारखी व्यसनांमुळेही तब्येत खराब होते.

तब्येत कशाने सुधारते ..?

योग्य खानपान घेणे, पुरेशी झोप व विश्रांती घेणे, ताण न घेणे, व्यसनांपासून दूर राहणे, नियमित व्यायाम करणे अशा हेल्दी लाईफस्टाईलचा अवलंब केल्यास आपली तब्येत सुधारते.

तब्येत सुधारण्यासाठी उपाय –

1) तब्येत सुधारण्यासाठी योग्य खानपान ठेवा.

तब्येत सुधारण्यासाठी पुरेसे व वेळच्यावेळी जेवण घ्यावे. जेवणात प्रोटीन, कर्बोदके आणि हेल्दी फॅटचा समावेश करावा. हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, विविध फळे, केळी, सुखामेवा, धान्ये व कडधान्ये, दूध व दुधाचे पदार्थ, अंडी, मासे, मांसाहार यांचा समावेश जेवणात करावा. यामुळे उपयुक्त पोषकघटक म्हणजे व्हिटॅमिन्स, अँटी-ऑक्सिडंट, क्षार व खनिजतत्वे शरीराला मिळतील. दिवसातून तीनवेळा जेवण घ्यावे.

2) तब्येत सुधारण्यासाठी चुकीच्या खानपानपासून दूर राहा.

तब्येत सुधारण्यासाठी फास्टफूड, जंकफूड, मैद्याचे पदार्थ, बेकरी प्रोडक्ट खाणे टाळावे. कारण असे पदार्थ खाण्याने पोट भरते व जेवण जात नाही. आणि पुरेसे जेवण न खाण्यामुळे आपली तब्येत सुधारत नाही. तसेच अशा पदार्थात कोणतेही पोषकघटक नसतात. असे पदार्थ शरीरासाठी धोकादायकचं असतात. यामुळे हृदयविकार, पक्षाघात, मधुमेह, हाय ब्लडप्रेशर असे गंभीर आजार होतात.

3) तब्येत सुधारण्यासाठी व्यसनांपासून दूर राहावे.

दारू, अल्कोहोल, सिगारेट, तंबाखू, गुटखा अशा सर्वच व्यसनांनी आपले आरोग्य धोक्यात येते. ह्या व्यसनानी तब्येत अधिकच खराब होत असते. यासाठी तब्येत सुधारण्यासाठी अशा व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे.

4) तब्येत सुधारण्यासाठी नियमित व्यायाम करावा.

नियमित व्यायाम केल्याने मांसपेशी मजबूत होऊन तब्येत सुधारत असते. त्यामुळे दररोज किमान अर्धा तास व्यायाम करावा. व्यायामामध्ये जोरात चालणे, पळणे, पोहणे, सायकलिंग, दोरीउड्या, मैदानी खेळ यांचा समावेश करू शकता.

5) तब्येत सुधारण्यासाठी तणावापासून दूर राहा.

तब्येत सुधारण्यासाठी मानसिक तणाव आणि चिंता यापासून दूर राहणे गरजेचे असते. त्यामुळे कोणताही मानसिक तणाव घेऊ नये. तणाव दूर करण्यासाठी छंद जोपासावा, मनोरंजनाचा आनंद घ्यावा, फिरायला जावे किंवा ध्यान धारणा करावी.

6) तब्येत सुधारण्यासाठी पुरेशी झोप घ्यावी.

अपुऱ्या झोपेमुळे शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडते. शरीर लवकर थकते. याचा परिणाम तब्येतीवर होत असतो. यासाठी कामाच्या व्यापात विश्रांतीकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. कामाबारोबच विश्रांतीही तितकीच महत्त्वाची आहे. पुरेशी झोप व विश्रांती घेतल्याने तुमची तब्येत सुधारण्यासाठी मदत होते. यासाठी दररोज पुरेशी झोप व विश्रांती घ्यावी. प्रौढांना 7 तासांची झोप गरजेची असते. तर किशोरवयीनांना 8-10 तास आणि लहान बालकांना 14 तासांपर्यंत झोपेची आवश्यकता असते.

तब्येत सुधारण्यासाठी घरगुती उपाय –

तब्येत सुधारण्याचे काही सोपे घरगुती उपाय पुढीलप्रमाणे आहेत.

  • रात्रभर पाण्यात मनुकेबदाम भिजत ठेवावेत. सकाळी उतल्यावर ते भिजवलेले मनुके व बदाम खावेत. हा घरगुती उपाय तब्येत सुधारण्यासाठी फायदेशीर आहे.
  • काजू, बदाम, शेंगदाणे, खारीक, मनुका असा सुखामेवा एकत्रित करून रोज मूठभर खाल्यास लवकर तब्येत सुधारते.
  • दुधात खारीक पूड घालून गरम दूध काही दिवस पिण्यामुळे तब्येत सुधारण्यासाठी मदत होते. तब्येत सुधारण्यासाठी हा घरगुती उपाय खूप उपयोगी पडतो.
  • दुधासोबत दोन ते तीन खजूर खण्यामुळेही तब्येत सुधारण्यास मदत होते.
  • रोज सकाळी उकडलेले अंडे खाण्यामुळे तब्येत सुधारण्यासाठी मदत होते.
  • तब्येत सुधारण्यासाठी दिवसातून 3 वेळा जेवण घ्यावे. तसेच जेवणापूर्वी पाणी पिणे टाळावे. कारण यामुळे पाण्यामुळेचं पोट भरते व जेवण जात नाही.

अशाप्रकारे या लेखात तब्येत सुधारण्याचे घरगुती उपाय सांगितले आहेत. या उपायांच्या जोडीला आपण योग्य खानपान, पुरेशी झोप, नियमित व्यायाम अशा हेल्दी लाईफस्टाईलचा अवलंब करून आपण आपली तब्येत निश्चितच सुधारू शकता.

Written by - Dr. Satish Upalkar
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.

हे सुध्दा वाचा – वजन वाढवण्याचे उपाय जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

4 Sources

In this article information about Home remedies for health fitness in Marathi language. Article written by Dr Satish Upalkar.

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...