Dr Satish Upalkar’s article about Best Fruits For Diabetes Patients in Marathi.

मधुमेह रुग्णांनी कोणती फळे खावीत ही माहिती डॉ सतीश उपळकर यांनी येथे सांगितली आहे.

मधुमेह आणि फळे –

मधुमेह रुग्णांनी त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. मधुमेहात रक्तातील साखर नियंत्रित राहत नाही. त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांनी रक्तातील साखर वाढवणारा किंवा इन्सुलिनवर परिणाम करणारा कोणताही आहार पदार्थ टाळणे आवश्यक असते. अशावेळी कोणतेही फळ खाताना, ते मधुमेह साठी योग्य आहे की नाही ते पाहावे लागते. कारण फळांमध्ये नैसर्गिकरित्या साखर (fructose) उपलब्ध असते. यासाठी या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी मधुमेह रुग्णांनी कोणती फळे खावीत याविषयी माहिती सांगितली आहे.

मधुमेह रुग्णांनी कोणती फळे खावीत ..?

1) जांभळे –

सर्व फळांमध्ये जांभळे ही मधुमेहींसाठी जास्त उपयुक्त असतात. म्हणूनच डायबेटिस वरील अनेक आयुर्वेदिक औषधामध्ये जांभळाचा वापर केला जातो. जांभळे खाल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे आपणास मधुमेह असल्यास आपण जांभळे खाऊ शकता.

2) फणस –

फणसाचे गरे गोड असूनही तुम्ही ती मधुमेह असल्यास सुध्दा खाऊ शकता. कारण इतर फळांच्या तुलनेत फणसाचे पचन हळूहळू होत असते. त्यामुळे इतर फळांच्या तुलनेत फणस खाल्याने एकाएकी ब्लडशुगर वाढत नाही. म्हणूनच फणसाचा glycemic index (GI) हा अतिशय कमी असल्याने फणस हा डायबेटीसमध्ये फायदेशीर असतो. याशिवाय यात असणाऱ्या फायबर्समुळे रक्तातील साखर आटोक्यात राहण्यास मदत होते. त्यामुळे आपणास मधुमेह असल्यास आपण फणस खाऊ शकता. फणस खाण्याचे फायदे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

3) पेरू –

पेरूचा glycemic index (GI) हा कमी असल्याने डायबेटिस रुग्ण पेरू खाऊ शकतात. तसेच पेरूमध्ये व्हिटॅमिन-A, व्हिटॅमिन-C, फायबर्स असे पोषकघटकही असतात. त्यामुळे मधुमेह रुग्ण पेरू हे फळ खाऊ शकतात.

4) नाशपाती (pear) –

नाशपाती ह्या फळाचा glycemic index (GI) सुध्दा कमी असतो. तसेच यात मुबलक प्रमाणात फायबर्स असतात. नाशपाती फळ खण्यामुळे रक्तातील साखर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. याशिवाय नाशपातीमध्ये व्हिटॅमिन-C, व्हिटॅमिन-K, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स देखील भरपूर असतात. हृदयाच्या आरोग्यासाठी सुध्दा नाशपाती उपयुक्त असतात. मधुमेह रुग्णांना हृदयविकार होण्याचा धोका अधिक असतो. अशावेळी हा धोका नाशपाती सारखे फळ खाल्याने कमी होण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेह रुग्णांनी नाशपाती हे फळ जरूर खावे.

5) सफरचंद –

सफरचंदामध्ये फायबर्स, व्हिटॅमिन-C व महत्वाची अँटीऑक्सिडेंट्स असतात. मधुमेह असल्यास आपण सफरचंद खाऊ शकता. मात्र सफरचंद खाताना सालीसकट खावा. कारण सफरचंदाच्या सालीत अनेक महत्वाची पोषकतत्वे असतात.

6) संत्रे –

संत्र्यात सुध्दा फायबर्स, व्हिटॅमिन-C व महत्वाची अँटीऑक्सिडेंट्स असतात. त्यामुळे मधुमेह रुग्ण संत्रे हे फळ खाऊ शकतात. मात्र संत्र्याचा ज्यूस करून पिणे टाळले पाहिजे.

7) किवी –

किवीमध्ये पोटॅशियम, फायबर्स, व्हिटॅमिन-C व महत्वाची अँटीऑक्सिडेंट्स असतात. यात कॅलरीजचे प्रमाणही कमी असते. ब्लड शुगर आटोक्यात ठेवण्यासाठी किवी फळ उपयुक्त असते. हृदयाच्या आरोग्यासाठी सुध्दा किवी फळ उपयुक्त असते. त्यामुळे मधुमेह रुग्णांनी किवी हे फळ जरूर खावे.

8) बेरी –

मधुमेह रुग्ण हे ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी ह्या प्रकारची फळे खाऊ शकतात. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर अशा घटकांनी समृद्ध असतात त्यामुळे बेरी ही मधुमेहात सुपरफूड मानली जातात. त्यामुळे मधुमेह असल्यास आपण बेरी खाऊ शकता.

मधुमेह रुग्णांनी फळे खाताना घ्यायची काळजी –

  • मधुमेह रुग्णांनी एकाचवेळी अधिक प्रमाणात कोणतेही फळ खाऊ नये.
  • मधुमेह रुग्णांनी फळांचा रस पिणे टाळावे.
  • सालीसकट खाता येणारी सफरचंद, पेरू ही फळे सालीसकटचं खाल्ली पाहिजेत.
  • मधुमेह रुग्णांनी चिक्कू, केळी, सीताफळ, रामफळ, आंबा ही फळे अधिक खाऊ नयेत.
  • मधुमेह रुग्ण हे काही प्रमाणात कलिंगड, डाळींब, अननस ही फळे खाऊ शकतात.
  • फळामध्ये साखर मिसळून फळे खाऊ नयेत.
Written by - Dr. Satish Upalkar
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.

हे सुध्दा वाचा – मधुमेह रुग्णांनी कोणता आहार घ्यावा याची माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

3 Sources

Image source – Wikimedia Commons

In this article information about Best Fruits for Diabetes Patients in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar.

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...