काजू खाण्याचे फायदे मराठी (Health benefits of Cashew nuts)

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Cashew nut health benefits in Marathi, kaju khanyache fayde in marathi.

काजू (Cashew nuts) :

काजू हे सुक्यामेव्यातील एक महत्त्वाचे फळ आहे. काजूगर चवीस गोड असून बलकारक, वातशामक, किंचित पित्त वाढवणारी असतात. काजूगरात अनेक उपयुक्त व्हिटॅमिन्स, अँटी-ऑक्सिडंट आणि खनजतत्वे असतात.

काजूगरात प्रामुख्याने व्हिटॅमिन-E, व्हिटॅमिन-K आणि व्हिटॅमिन-B6, तांबे, फॉस्फरस, झिंक, मॅग्नेशियम, लोह, पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारखी अनेक पोषकतत्वे असतात.

काजू खाण्याचे फायदे मराठी :

शारीरिक शक्ती वाढवते..
काजूमध्ये प्रोटिन्स अधिक आहेत. धान्य व
डाळीपेक्षा काजू अधिक पौष्टिक आहे. मांसाहारातील प्रोटीनमुळे शक्ती वाढत असली तरीही मांसाहाराने युरीक अॅसिड तयार होते मात्र अशा प्रकारचे अॅसिड काजूगराच्या सेवनाने होत नाही. म्हणूनच काजू हे शारीरिक बल वाढवण्यासाठी उत्तम ठरतात. तसेच शरीराच्या कमरेखालील अवयवांना काजू विशेष पोषण देतात.

हार्टसाठी उपयुक्त..
काजूगरात असणाऱ्या मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉलिक ऍसिड, व्हिटॅमिन-E आणि B6 यांमुळे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल (LDL कॉलेस्टरॉल) आणि triglyceride चे प्रमाण कमी होण्यास मदत होते. तसेच HDL प्रकारच्या चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढवते आणि रक्तदाबही नियंत्रित ठेवते. त्यामुळे हृदयविकार, हार्ट अटॅक, हाय ब्लडप्रेशर, पक्षघात यासारख्या आजारांपासून दूर राहण्यास मदत होते.

हिमोग्लोबिन वाढवते..
काजूगरात लोह भरपूर प्रमाणात असते त्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. नियमित काजूगर खाण्यामुळे ऍनिमिया (पांडुरोग) होण्यापासून दूर राहण्यास मदत होते.

रक्तवाहिन्याचे कार्य सुधारते..
काजूमध्ये तांबे मुबलक प्रमाणात असल्याने रक्तातील अशुद्धी दूर होण्यास, रक्तवाहिन्याचे कार्य सुधारण्यास मदत होते.

कॅन्सरपासून दूर ठेवते..
काजूमध्ये proanthocyanidine
हे अँटी-ऑक्सिडंट असते. त्यामुळे कर्करोगाच्या
पेशींची वाढ थांबते. तसेच काजूगरात तांबे मुबलक असल्याने कॅन्सरपासून दूर राहण्यास मदत होते.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त..
काजुमध्ये डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असणारे lutein आणि zeaxanthin हे अँटी-ऑक्सिडंट असतात. त्यामुळे उतारवयात येणारे अंधत्व रोखण्यास मदत होते. दररोज काजूगर खाण्यामुळे मोतीबिंदू होण्याचा धोका कमी होतो.

वजन कमी करते..
काजूगर खाण्यामुळे भूक कमी लागते व वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे वजन कमी करायचे असल्यास किंवा वजन आटोक्यात ठेवायचे असल्यास इतर सुक्यामेव्याबरोबर काजूगर खाणे एक चांगला पर्याय ठरू शकतो.

पित्ताशयात खडे होत नाहीत..
दररोज काजूगर खाण्यामुळे पित्ताशयात खडे होण्याचा धोका 25 टक्क्यांनी कमी होतो.

त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त..
काजूच्या नियमित खाण्यामुळे तारूण्य टिकते व वृद्धत्व
दूर राहते. केस व त्वचा निरोगी राहते. त्वचेचा तुकतुकीतपणा टिकून राहतो.

हाडे मजबूत होतात..
काजूत मुबलक प्रमाणात मॅग्नेशिअम आणि तांबे हे घटक असतात. त्यामुळे हाडांना बळकटी मिळण्यास मदत होते. नियमित काजू खाण्यामुळे ऑस्टिओपोरोसिस होण्याचा धोका कमी होतो.

काजुमध्ये असणारे फॅट शरीरासाठी धोकादायक असते का..?

काजुमध्ये फॅटचे प्रमाण जास्त असते. पण काजुमध्ये असणारे फॅट हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. त्या फॅटला Good Fat असे म्हणतात. काजुमध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण 0 टक्के असते तसेच रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करण्यास काजू उपयोगी ठरते. शिवाय काजुमध्ये अनेक व्हिटॅमिन्स, खनिजे, क्षार आणि अँटी-ऑक्सिडंट असतात. त्यामुळे हृदयविकार, पक्षघात, टाईप-2 डायबेटीस ह्या आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. तसेच काजुमध्ये फॅट असूनही वजन आटोक्यात राहण्यास मदत होते. त्यामुळे काजुमध्ये असणारे फॅट शरीरासाठी धोकादायक नसते.

काजू खाण्याचे नुकसान :

काजू अतिप्रमाणात खाल्यास अपचन होऊ शकते. काजूगर खाण्यामुळे काही जणांना ऍलर्जी आणि पित्ताचा त्रास होऊ शकतो.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

काजुचा शरीराला योग्य फायदा होण्यासाठी तळलेले किंवा खारवलेले काजूगर खाऊ नयेत. तळल्यामुळे काजुगरातील पोषकघटक कमी होतात तर मीठ लावलेल्या खारट काजूगर खाण्यामुळे शरीरात जास्त प्रमाणात मीठ जाऊन हाय ब्लडप्रेशर सारख्या समस्या होऊ शकतात.

काजूतील पोषकघटक :

1 औंस किंवा 18 काजुगरातील पोषकतत्वे पुढीलप्रमाणे आहेत.
ऊर्जा – 157 कॅलरीज
कर्बोदके – 9 .2 ग्रॅम
प्रथिने (प्रोटीन) – 5.1 ग्रॅम
फॅट -12.4 ग्रॅम
कोलेस्टेरॉल – 0%
फायबर – 1 ग्रॅम
व्हिटॅमिन E – 0.3 मिलीग्राम
व्हिटॅमिन K – 9 .5 मिलीग्राम
व्हिटॅमिन B6 – 0.1 मिग्रॅ
कॅल्शियम – 10.4 मिलीग्राम
सोडियम – 3.4 मिलीग्राम
पोटॅशियम – 187 मिग्रॅ
मॅग्नेशियम – 83 मिलीग्राम
फॉलिक ऍसिड – 7 ug

Health benefits of Cashews nuts in Marathi information, kaju khanyache fayde in Marathi.