मनुके खाण्याचे फायदे (Benefits of Raisins in Marathi)

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Dry grapes health benefits in Marathi, manuke khanyache fayde, Benefits of Raisins in Marathi.

मनुके (Raisins) :

द्राक्षे सुकवून मनुका तयार केल्या जातात. मनुका चवीस गोड असून अनेक पदार्थांची रुची वाढवण्यासाठी मनुकांचा वापर केला जातो. मनुकांमध्ये अनेक पोषकघटक असतात.

मणुकात फायबर्स, प्रोटिन्स, अँटी-ऑक्सिडंट, व्हिटॅमिन्स आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. माणुकामध्ये व्हिटॅमिन-C, फोलेट, थायमिन, नायसीन, रिबोफ्लाव्हिन, व्हिटॅमिन-B6 असे विविध व्हिटॅमिन्स असतात. तर यात पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह, झिंक आणि सोडियम असे क्षार व खनिजे असतात.

मनुके खाण्याचे फायदे :

पोट साफ होण्यास मदत होते..
मनुकामधील फायबर्समुळे नियमित पोट साफ होण्यास मदत होते. बद्धकोष्ठताचा त्रास असल्यास रोज रात्री झोपण्यापूर्वी उकळेल्या दुधातून बेदाणे खाणे खूप उपयुक्त ठरते. यामुळे सकाळी नियमित पोट साफ होण्यास मदत होते.

पोटफुगीची समस्या दूर होते..
नियमित मनुके खाण्यामुळे पचनक्रिया सुधारते त्यामुळे पोटफुगी किंवा Bloating ची समस्या होत नाही.

आम्लपित्त कमी करते..
बेदाणेमध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते. त्यामुळे नियमित मनुके खाण्यामुळे ऍसिडिटीचा त्रास होणे, छातीत पित्तामुळे जळजळणे हे त्रास दूर होतात.

हिमोग्लोबिन व रक्त वाढवते..
मनुक्यात लोह, तांबे व इतर जीवनसत्वे मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. यासाठी 10 ते 12 मनुका वाटीभर पाण्यात भिजत घालावे व दुसऱ्या दिवशी सकाळी भिजलेले मनुके चावून खावेत. यामुळे रक्तारील हिमोग्लोबिन वाढते त्याचबरोबर रक्त शुद्ध होते आणि रक्ताचे प्रमाणही वाढते.

कँसरला दूर ठेवतात..
मणुकात कँसरपासून बचाव करणारी catechins आणि polyphenolic phytonutrients ही उपयुक्त अँटी-ऑक्सिडंट असतात. मनुक्यातील अँटी-ऑक्सिडंट शरीरातील पेशीसांठी घातक असणाऱ्या फ्री रॅडिकल्सचे प्रमाण कमी करतात त्यामुळे विविध कॅन्सरपासून बचाव होतो. याशिवाय मनुकामधील फायबर्समुळे आतड्यांचे कार्य सुधारते त्यामुळे नियमित मनुके खाण्यामुळे मोठ्या आतड्यांचा कर्करोग (colon cancer) होण्याचा धोकाही कमी होतो.

हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त..
मणुकात बोरॉन ह्या रासायनिक घटकाचे प्रमाण आढळते. boron मुळे हाडांमध्ये कॅल्शियमचे योग्यप्रकारे शोषण होण्यास मदत होते. कॅल्शियम हा घटक हाडांसाठी व सांध्यांसाठी खूप महत्वाचा असतो. अशाप्रकारे मनुके खाण्यामुळे हाडांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. तसेच यामुळे स्त्रियांमध्ये मेनोपॉज नंतर होणारा ऑस्टिओपोरोसिसचा धोकाही कमी होतो.

डोळ्यांसाठी उपयुक्त..
मनुक्यामध्ये बीटा कॅरोटीन मोठ्या प्रमाणत असते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी बीटा कॅरोटीन फायद्याचे ठरते. त्यामुळे डोळ्यांच्या निरोगी आरोग्यासाठी दररोज मनुके खावेत.

हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त..
मनुके खाण्यामुळे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होते, रक्तदाब नियंत्रित राहतो त्यामुळे हृद्यविकाराची धोका कमी होतो.

वाईट कोलेस्टेरॉल कमी करते..
रक्तामध्ये वाईट कोलेस्टेरॉलचे (LDL कोलेस्टेरॉलचे) प्रमाण जास्त असल्यास हार्ट अटॅक, हृदयविकार, पक्षाघात, हाय ब्लडप्रेशर होण्याचा धोका जास्त वाढतो. यासाठी रक्तात वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असणे गरजेचे असते. मणुकात पोटॅशियम, फायबर, पॉलीफेनॉल, फिनोलिक अॅसिड, टॅनिन आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक असतात. त्यामुळे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास आणि चांगल्या कोलेस्टेरॉलचे (HDL कोलेस्टेरॉल) चे प्रमाण वाढण्यास मदत होते.

रक्तदाब नियंत्रित ठेवते..
मनुकात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. दररोज मनुका खाण्यामुळे रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते. हाय ब्लडप्रेशरमुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक (पक्षाघात) आणि किडन्या निकामी होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे ब्लडप्रेशर कंट्रोलमध्ये ठेवणे आवश्यक असते.

वंध्यत्व समस्येवर उपयुक्त..
मनुका वृष्य गुणांच्या असल्यामुळे पुरुषांमध्ये शुक्रधातुचे प्रमाण वाढवतात. त्यामुळे पुरुषांसंबंधित वंध्यत्व समस्या दूर होण्यास मदत होते.

मनुके भिजवून खाण्याचे फायदे :

भिजवलेले मनुके खाण्याचे फायदे अनेक आहेत. यामुळे पचनक्रिया सुधारते, नियमित पोट साफ होते, ऍसिडिटी व गॅसेसचा त्रास कमी होतो, हाडांचे आरोग्य चांगले रहाते, रक्तातील हिमोग्लोबिन वाढते, रक्त वाढते, रक्तदाब नियंत्रित राहतो, कोलेस्टेरॉल कमी होतो, हृदयाचे आरोग्य चांगले राहते व शरीराचे योग्य पोषण होऊन हेल्दी वजन वाढण्यास मदत होते.

डायबेटीस असल्यास मनुका खाव्यात का..?

डायबेटीस असल्यास काही प्रमाणात मनुका खाणे उपयुक्त असते. मनुकात असणारे फायबर्स, अँटी-ऑक्सिडंट, व्हिटॅमिन्स, खनिजे यासारखी पोषकघटक मधुमेहात होणारे हाय ब्लडप्रेशर, हाय ब्लडकोलेस्टेरॉल, हृदयविकार यासारख्या दुष्परिणामांचा धोका कमी करतात. मनुके किंवा इतर सुखामेवा खाणे डायबेटीसमध्ये फायदेशीर असल्याचे अनेक संशोधनातून सिद्ध झालेले आहे. त्यामुळे डायबेटीस असल्यास काही प्रमाणात मनुका खाणे उपयुक्त असते.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

मनुका खाण्याचे नुकसान :

अधिक प्रमाणात मनुके खाण्यामुळे अतिसार होणे, वजन वाढणे, ऍलर्जी होणे असे काही त्रास होऊ शकतात.

मनुका पोषकघटक :

एक कप मनुकात पुढीलप्रमाणे पोषकतत्वे (nutritional contents) असतात.
ऊर्जा – 488.40 कॅलरीज
प्रथिने – 4.16 ग्रॅम
एकूण फॅट्स – 0.8 ग्रॅम
कार्बोहायड्रेट – 129 .48 ग्रॅम
फायबर – 11.22 ग्रॅम
कॅल्शियम – 46.20 mg
लोह – 4.27 mg
मॅग्नेशियम – 49.50 mg
फॉस्फरस – 123.75 mg
पोटॅशियम – 1361.25 mg
सोडियम – 46.20 mg
झिंक – 0.30 mg
व्हिटॅमिन C – 8.91 mg

Nutritional Benefits Of Eating Raisins Every Day Marathi information, Benefits of Raisins in Marathi.