Dr Satish Upalkar’s article about Cholesterol Test in Marathi.
कोलेस्टेरॉल चाचणी –
कोलेस्टेरॉल चाचणीद्वारे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण तपासले जाते. विविध हृद्यासंबंधी विकारांमध्ये कोलेस्टेरॉलची तपासणी करणे अत्यंत आवश्यक असते. कोलेस्टेरॉल हा रक्तामध्ये आढळणारा एक मेणासारखा पदार्थ असून शरीराच्या सामान्य क्रियेसाठी ठराविक प्रमाणात कोलेस्टेरॉलची गरज असते. तर कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक असणे हृद्याच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरते. या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी रक्तात कोलेस्टेरॉल किती असावे याची माहिती सांगितली आहे.
कोलेस्टेरॉलचे प्रकार :
कोलेस्टेरॉलचे चांगला (HDL कोलेस्टेरॉल) आणि वाईट (LDL कोलेस्टेरॉल) असे दोन प्रकार आहेत.
1) HDL कोलेस्टेरॉल –
हा कोलेस्टेरॉलचा प्रकार हृद्याच्या आरोग्यासाठी चांगला असतो. याला सामान्य भाषेत Good Cholesterol असेही म्हणतात. हृद्याच्या उत्तम आरोग्यासाठी HDL कोलेस्टेरॉलचे प्रमाण 50 ते 60 mg/dL पेक्षा जास्त असावे लागते. HDL म्हणजे High Density Lipporotein.
HDL कोलेस्टेरॉलचे प्रमाण किती असावे..?
HDL या चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण 40 mg/dL पेक्षा कमी असल्यास हृद्यविकार उद्भवण्याची अधिक शक्यता असते. तर HDL चे प्रमाण 60 mg/dL पेक्षा अधिक असल्यास हृद्यविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते.
2) LDL कोलेस्टेरॉल –
हा कोलेस्टेरॉलचा प्रकार हृद्यासाठी अत्यंत घातक असतो. याला Bad Cholesterol असेही म्हणतात. LDL कोलेस्टेरॉलचे प्रमाण 100 mg/dL पेक्षा जास्त असल्यास हृद्यविकाराचा धोका निर्माण होतो. LDL म्हणजे Low Density Lipoprotein.
LDL कोलेस्टेरॉलचे प्रमाण किती असावे..?
LDL या वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण 100 mg/dL पेक्षा कमी असणे हृद्याच्या आरोग्यासाठी उत्तम असते.
- योग्य प्रमाण – 100 mg/dL पेक्षा कमी
- मध्यम प्रमाण – 100 ते 129 mg/dL पर्यंत
- काठावरील प्रमाण – 130 ते 159 mg/dL पर्यंत
- जास्त प्रमाण – 160 ते 189 mg/dL पर्यंत
- सर्वात जास्त प्रमाण – 190 mg/dL पेक्षा अधिक असणे.
रक्तामध्ये कोलेस्टेरॉल वाढण्याची कारणे :
- विविध विकारांमुळे कोलेस्टेरॉलच्या प्रमाणात असामान्यपणे वाढ होते.
- यांमध्ये धमनीकाठिन्यता, Hypothyroidism थॉयरॉईड अक्रियाशील असणे, पित्ताशयाचा सिरोसिस, किडनींचे विकार,
हृद्याचे विविध विकारंमुळे, Heart attacks मुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण असामान्यपणे वाढते. - अधिक सॅच्युरेटेड फॅट्स, ट्रांसफॅट्सच्या सेवनामुळे कोलेस्टेरॉलच्या पातळीत वाढ होते.
- अनुवंशिक कारकांमुळे,
- मानसिक ताणतणावामुळे,
- लठ्ठपणा,
- व्यायामाचा अभाव,
- तसेच अनियंत्रित मधुमेहामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलची असामान्यपणे वाढ होते.
कोलेस्टेरॉल टेस्ट कोणी करावी..?
उच्चरक्तदाब, स्थुलता, मधुमेह ह्या विकारांनी पीडीत रुग्णांनी नियमित कोलेस्टेरॉलची तपासणी करुन घ्यावी. वयाच्या 20 वर्षानंतर प्रत्येकाने दर पाच वर्षातून एकदा लिपिड प्रोफाइल टेस्ट करुन घेणे आवश्यक आहे.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
कोलेस्टेरॉल संबंधित खालील उपयुक्त माहितीही वाचा..
- हार्ट अटॅकची कारणे, लक्षणे उपचार
- डायबेटीसची कारणे, लक्षणे व उपचार
- पक्षाघात (brain stroke) याची कारणे, लक्षणे व उपचार
- हाय ब्लडप्रेशरची कारणे, लक्षणे व उपचार
In this article information about Cholesterol Test and their results normal range in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar (Certified physician and Healthcare expert).