पुरुष वंधत्व – Male Infertility :

वंध्यत्व म्हणजे अनेक वर्षे प्रयत्न करूनही मुलबाळ न होणे. ‘केवळ स्त्रीमध्येच वधत्व समस्या असते’ असा अनेकांचा गैरसमज असतो. मात्र वंध्यत्व ही समस्या होण्यासाठी 33% कारणे ही पुरुषांसंबंधित असतात तर 33% कारणे ही स्त्रीसंबंधित असतात. आणि उरलेली 33% कारणे ही दोहोंसंबंधी असतात. मात्र समाज हा वंधत्वासाठी संपुर्णतः स्त्रीलाच जबाबदार धरत असतो.

अनेकजण सांगतात की, ‘लैंगिक संबंधावेळी भरपूर पांढरट स्त्राव म्हणजेच वीर्य येते मात्र तरीही गर्भधारणा होत नाही’ वैगरे. वीर्याचे प्रमाण जास्त आहे म्हणून त्यात हेल्दी शुक्रजंतू पुरेशा प्रमाणात असतील असेही नाही. त्यामुळे आधी वीर्य आणि शुक्रजंतूमधील फरकसुद्धा समजून घेतला पाहिजे. वीर्य (semen) म्हणजे सेक्सवेळी पुरुषाच्या लिंगातून येणारा पांढरट स्त्राव. या पांढरट स्त्रावामध्ये अतिसूक्ष्म असे शुक्रजंतू (sperms) असतात. हे शुक्रजंतूचं गर्भधारणेसाठी आवश्यक असतात.

पुरुषांच्या संबंधित वंध्यत्व समस्येमध्ये शुक्रजंतूची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. सेक्सनंतर स्त्रीच्या गर्भाशयात शुक्रजंतूचा स्त्रीबीजशी मिलन होऊन गर्भधारणा होत असते. त्यामुळे शुक्रजंतूची निर्मिती, विर्यामधील शुक्रजंतूचे प्रमाण (sperm count), शुक्रजंतूचा आकार व शुक्राणूंची गती (movement of the sperm) ह्या पुरुषांसंबंधित बाबी गर्भधारणा होण्यासाठी आवश्यक असतात.

पुरुषासंबधी वंधत्वाची सहाय्यक कारणे – Male Infertility Causes in Marathi :

पुरुषांमधील वंधत्व समस्या ही अनेक कारणांमुळे होऊ शकते. जसे विविध रोगांमुळे वंधत्व येऊ शकते, जन्मजात जनन अवयवातील विकृतीमुळे, वीर्याच्या
उत्पादनावर परिणाम झाल्याने पुरुषांमध्ये वंधत्वाची समस्या उद्भवते.
• वय जास्त असणे,
• हार्मोन्समधील असंतुलनामुळे टेस्टोस्टेरॉन हॉर्मोनची निर्मिती कमी झाल्याने,
• जन्मजात पुरुषाच्या जननअवयवातील दोषामुळे,
• वृषणांवर (testicles वर) आघात झाल्याने,
• Hypogonadism किंवा जन्मजात वृषणांचा विकास न झाल्याने,
• Undesaended testicle किंवा वृषण हे अंडकोषामध्ये न उतरल्यामुळे,
• Varicocele किंवा वृषणांच्या शिरांना सूज आल्याने,
• वृषणांचा रक्तपुरवटा खंडीत झाल्याने (Testicular torsion),
• शरीरातील अँटीबॉडीजद्वारे शुक्रजंतूवर हमला झाल्यामुळे,
• सिगारेट स्मोकिंग, अल्कोहोल यासारख्या व्यसनांमुळे,
• डायबेटीस, लठ्ठपणा सारख्या आरोग्यसमस्या असणे,
• लैंगिक आजारांमुळे,
• गालफुगी आजारामुळे (Mumps),
• Steroids, Sulfasalazine, Phenytoin यासारख्या औषधांच्या अतिवापरामुळे,
• किमोथेरपी, रेडिएशन यांच्या दुष्परिणामामुळे,
• व्यायामाच्या अतिरेकामुळे,
• उष्ण ठिकाणी अधिक काळापर्यंत काम करणे, घट्ट अंतर्वस्त्रे वापरणे,
• अतिगरम पाण्याच्या स्नान करण्याची सवय अशा अनेक कारणांचा शुक्रजंतूच्या निर्मितीवर परिणाम होऊन पुरुषांमध्ये वंधत्वता निर्माण होते.

पुरुष वंध्यत्वाची तपासणी :

पुरुषांमध्ये वीर्य तपासणी (Seman Test) करून शुक्रजंतूसंबंधित वंध्यत्व समस्या आहे की नाही ते ठरवले जाते. वीर्य तपासणीत विर्यामधील निरोगी शुक्रजंतूचे प्रमाण (sperm count), शुक्रजंतूचा आकार व शुक्राणूंची गती ह्या बाबी तपासतात. जर तपासणीत वीर्यामधील हेल्दी शुक्राणुंची संख्या कमी असलयास पुरुषातील वंध्यत्व समस्येचे निदान होते. साधारणपणे 15 ते 200 मिलीयन/ml ही शुक्रजंतूची नॉर्मल संख्या मानली जाते.

ह्याशिवाय खालील चाचण्या करून पुरुषांतील वंध्यत्वाचे नेमके कारण शोधले जाते.
• अंडकोषाची सोनोग्राफी (Scrotal ultrasound),
• हार्मोनची तपासणी करण्यासाठी ब्लड टेस्ट,
• स्खलन नंतरची (Post-ejaculation) लघवीची चाचणी,
• टेस्टीक्यूलर बायोप्सी,
• जेनेटिक टेस्ट,
• Anti-sperm अँटीबॉडीज चाचणी

पुरुषांतील वंध्यत्व निवारण उपचार – Male infertility Treatment :

विर्यामध्ये शुक्रजंतूंचे प्रमाण कशामुळे कमी आहे याविषयी निदान वरील चाचण्यातून झाल्यानंतर आपले डॉक्टर सर्जरी किंवा औषधे याद्वारे यावर उपचार करतील. शुक्रजंतू वाहून नेणाऱ्या वाहिनीत किंवा शिरांमध्ये अडथळा निर्माण झालेला असल्यास तो सर्जरीद्वारे दूर केला जातो. तर हार्मोन्समधील असंतुलन किंवा अँटीबॉडीजद्वारे शुक्रजंतूंवर होणारा हमला रोखण्यासाठी औषधांचा उपचारामध्ये समावेश केला जातो.
© लेखक- डॉ. सतीश उपळकर
(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

हे सुद्धा वाचा..
महिलांमधील वंधत्व समस्या जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Male Infertility Causes, Diagnosis, Treatment in Marathi information.