खजूर – Dates :
खजूर हे एक अत्यंत पौष्टिक आणि स्वादिष्ट फळ आहे. त्यामुळेच खजूर हे जगभरात सर्वत्र आवडीने खाल्ले जातात. आरोग्यासाठी उपयुक्त असणारी अनेक अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स, खनिजे खजूरमध्ये असतात. आयुर्वेदानुसार खजूर हे मधुर, शीत गुणात्मक, शुक्रवर्धक, मांसवर्धक आणि वात-पित्त कमी करणारे आहे.
खजूर खाण्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. हृदयविकाराचा धोका कमी होतो. खजुरात असणाऱ्या अँटी-ऑक्सिडंटमुळे डायबेटीस, अल्झायमर डिसीज आणि विविध प्रकारचे कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो. खजूर खाणे हे आपल्या हाडांसाठी फायदेशीर असते. गरोदरपणातही खजूर उपयुक्त असतात.
खजूर खाण्याचे आरोग्यदायी 7 फायदे –
1) पोट साफ होण्यासाठी उपयोग –
खजूरमध्ये फायबर्सचे (तंतुमय पदार्थ) प्रमाण मुबलक असते. नियमित पोट साफ होण्यासाठी यामुळे मदत होते.
2) हृदयासाठी उपयुक्त –
खजुरात असणाऱ्या कॅरोटीनोईड्स फेनोलिक ऍसिड ह्या अँटी-ऑक्सिडंटमुळे हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते. याशिवाय हार्टसाठी आवश्यक असणारे पोटॅशियम हा घटकही खजुरात मोठ्या प्रमाणात असतो.
3) डायबेटीसमध्ये उपयोगी –
खजूर चवीला गोड असले तरीही यामध्ये असणाऱ्या फायबर्समुळे खजुरचा glycemic index (GI) हा कमी आहे. तसेच फायबर्समुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेहात खजुरचा समावेश जरुर करू शकता.
4) हेल्दी वजन वाढवते –
खजूर हे अत्यंत पौष्टिक असून सुदृढ शरीरासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. खजूर खाण्यामुळे शारीरिक दुर्बलता, अशक्तपणा, ऍनिमिया दूर होतो. तसेच यात असणाऱ्या पोटॅशियम घटकांमुळे मांसपेशी (मसल्स) वाढण्यास मदत होऊन हेल्दी वजन वाढते.
5) हाडांसाठी उपयुक्त –
खजूरात हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असणारी फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यासारखी क्षारतत्वे असतात. नियमित खजूर खाण्यामुळे हाडे ठिसूळ होण्याचा (Osteoporosis) धोका कमी होतो. विशेषतः स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीच्यावेळी (मेनोपॉज) हाडांची ठिसूळता वाढते ह्या काळात ह्याचे सेवन उपयुक्त असते कारण ह्यात कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते.
6) प्रेग्नन्सीमध्ये उपयोगी –
खजूरमध्ये असणारी कॅल्शियम, लोह यासारख्या घटकांमुळे गरोदरपणातही खजूर उपयोगी ठरतात. गरोदरपणात खजूर खाल्याने गर्भाचे वजन वाढण्यास मदत होते. तसेच प्रेग्नन्सीच्या शेवटच्या आठवड्यात खजूर खाण्यामुळे डिलिव्हरी योग्यरीत्या होण्यासही मदत होते. गरोदरपणात आहार कसा असावा ते जाणून घ्या..
7) उपयुक्त अँटी-ऑक्सिडंट्स मिळतात –
फ्लेव्होनोइड्स, कॅरोटीनोईड्स, फेनोलिक ऍसिड यासारखी अनेक आवश्यक अँटी-ऑक्सिडंट्स खजूरमध्ये असतात. यापैकी फ्लेव्होनोइड्स (Flavonoids) हे अत्यंत महत्त्वाचे अँटी-ऑक्सिडंट असून यामुळे डायबेटीस, अल्झायमर डिसीज आणि विविध प्रकारचे कँसर होण्याचा धोका कमी होतो. तर खजुरात असणारे कॅरोटीनोईड्स (Carotenoids) हे अँटी-ऑक्सिडंट हृदय आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते. तसेच फेनोलिक ऍसिड ह्या अँटी-ऑक्सिडंटमुळे कँसर आणि हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते.
खजूर खाण्यामुळे होणारे नुकसान किंवा दुष्परिणाम :
खजूर हे निसर्गतःच गोड असणारे पौष्टिक फळ असून याचा कोणताही विपरीत परिणाम आरोग्यावर होत नाही. अगदी डायबेटीस असलेले रुग्णही खजूर खाऊ शकतात. मात्र अधिक प्रमाणात खजूर खाल्ले गेल्यास वजन वाढण्याची समस्या होऊ शकते.
दररोज किती खजूर खावेत..?
स्वतःची पचनशक्ती, व्यायाम, वर्कआउट विचारत घेऊन किती खजूर खावेत ते ठरवावे. साधारणपणे सकाळी व संध्याकाळी 4-4 खजूर खाणे पुरेसे असते. तर डायबेटीस रुग्ण 2 ते 3 खजूर खाऊ शकतात.
एका खजूरमधील पोषकघटक :
कॅलरीज – 20
एकूण कर्बोदके – 5.33 ग्रॅम
फायबर – 0.6 ग्रॅम
साखर – 4.5 ग्रॅम
एकूण फॅट – 0.03 ग्रॅम
कोलेस्टेरॉल – 0%
प्रथिने (प्रोटिन्स) – 0.17 ग्रॅम
व्हिटॅमिन-B6 – 0.012 मिलीग्राम
लोह – 0.07 मिग्रॅ
मॅग्नेशियम – 3 मिलीग्राम
पोटॅशियम – 47 मिग्रॅ
खजूर चविस गोड असून अनेक पोषकतत्वांनी भरलेले असतात. त्यामुळे दररोज काही खजूर खाल्यास दिवसभराची कॅल्शियम व लोह ह्याची गरज भरून आरोग्य सुधारण्यास मदत होईल.
हे सुद्धा वाचा – काजूगर खाण्याचे फायदे जाणून घ्या..
Read Marathi language article about Dates (Khajur) health benefits & Side effects. Last Medically Reviewed on March 6, 2024 By Dr. Satish Upalkar.