शरीरात वाढलेले युरिक अॅसिडचे प्रमाण कमी करण्याचे हे आहेत उपाय

शरीरात युरीक अॅसिडचे प्रमाण अधिक वाढणे :

आपल्या रक्तात युरिक अॅसिडचे प्रमाण अधिक वाढल्यामुळे युरिक अॅसिडचे स्फटिक सांध्यामध्ये जमा होऊन त्याठिकाणी सूज, वेदना होऊन सांधेदुखी होत असते. त्यामुळेच युरिक अॅसिडच्या त्रासात सांध्यांच्या ठिकाणी सूज येते व अतिशय वेदना होत असतात.

युरिक अॅसिडचा त्रास पायाच्या अंगठ्याच्या सांध्यात अधिकतेने झालेला आढळतो. याशिवाय गुडघा, पाय, हात, मनगट किंवा कोपराच्या संध्यामध्येही हा त्रास होऊ शकतो. त्यामुळे जर पायांची बोटे, गुडघे किंवा टाचा दुखत असल्यास युरिक अॅसिडचा त्रास असू शकतो. याठिकाणी शरीरात वाढलेले युरीक अॅसिडचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाय यांची माहिती दिली आहे.

शरीरात वाढलेले युरिक अॅसिड कमी करण्याचे उपाय :

लसूण..
शरीरात वाढलेले युरिक अॅसिड कमी करण्यास लसूण खूप उपयुक्त ठरते. यासाठी लसूनच्या काही पाकळ्या चावून खाव्यात. याशिवाय लसूण पाकळ्या बारीक वाटून त्याचा लेप दुखणाऱ्या सांध्यावर लावावा.

आले..
आल्यात असणाऱ्या आयुर्वेदिक गुणकारी गुणांमुळे सूज कमी होण्यास मदत होते. आले खाण्यामुळे युरिक अॅसिडचे प्रमाण कमी होते तसेच सांध्यांना आलेली सूज कमी होऊन वेदना कमी होतात. त्यामुळे या त्रासात आले खूप उपयुक्त ठरते. याशिवाय आले बारीक वाटून त्याचा लेप दुखणाऱ्या सांध्यांवर दररोज एकदा लावणेही फायदेशीर असते.

हळद..
हळदीत असणाऱ्या करक्यूमिन ह्या अँटी-ऑक्सिडंटमुळे सूज कमी होण्यास मदत होते. दोन कप पाण्यात अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा आल्याचा रस मिसळून मिश्रण 10 मिनिटे गरम करावे. हे मिश्रण थंड झाल्यावर प्यावे.

सैंधव मीठ..
सैंधव मिठामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण अधिक असते. मॅग्नेशियम हा घटक युरिक ऍसिड कमी करण्यास खूप उपयोगी असतो. त्यामुळे सैंधव मीठ पाण्यात घालून ते गरम करून घ्यावे. थोडे कोमट झाल्यावर ते पाणी दुखणाऱ्या सांध्यावर लावावे.

कोरपडीचा गर..
वेदना होणाऱ्या संध्याच्याठिकाणी कोरपडीचा गर (एलोविरा जेल) लावावा. यामुळे वेदना कमी होण्यास मदत होईल.

एरंडेल तेल..
युरिक अॅसिडमुळे दुखणाऱ्या संध्याच्याठिकाणी कोमट केलेले एरंडेल तेल लावून हलका मसाज करावा. यामुळे संध्यातील सूज, वेदना कमी होऊन आराम मिळेल.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

अक्रोड..
रोज दोन ते तीन अक्रोड खाल्ल्यामुळेही युरिक अॅसिडचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.

पुरेसे पाणी प्या..
युरिक अॅसिडचा त्रास असल्यास दिवसभरात पुरेसे म्हणजे साधारण 8 ग्लास पाणी प्यावे. यामुळे शरीरात वाढलेले अतिरिक्त युरिक अॅसिड लघवीवाटे शरीराबाहेर निघून जाण्यास मदत होते.

युरिक अॅसिडवर प्रभावी आयुर्वेदिक औषधे व उपचार जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

© लेखक- डॉ. सतीश उपळकर
ही माहिती आपणास आवडल्यास आमचे Youtube चॅनेल subscribe जरूर करा. असेच उपयुक्त माहितीपूर्ण आरोग्यविषयक व्हिडिओ आपणास मोफत उपलब्ध होतील. यासाठी खालील YouTube subscribe बटनावर क्लिक करा.