केस पांढरे होण्याची समस्या आणि आयुर्वेदिक उपाय :
वेळेपूर्वी केस पांढरे होण्याची समस्या आज अगदी सामान्य झाली आहे. विशेषतः अनुवांशिक कारणे, मेलेनिनची कमतरता, चुकीचा आहार, ताणतणाव, प्रदूषण अशी अनेक कारणे यासाठी कारणीभूत असतात. आयुर्वेदानुसार चुकीचा आहार घेण्यामुळे म्हणजे जास्त खारट, आंबट पदार्थ खाण्यामुळे केस लवकर पांढरे होत असल्याचे सांगितले आहे. याठिकाणी पांढरे केस काळे करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय आणि औषध उपचार यांची माहिती सांगितली आहे.
पांढरे केस काळे करण्यासाठी हे आहेत आयुर्वेदिक उपाय..
आवळा –
आयुर्वेदात आवळ्याला असाधारण महत्त्व आहे. अकाली केस पांढरे होण्याच्या समस्येवर आवळा खूपच गुणकारी ठरतो. आवळ्याच्या पावडरमध्ये लिंबू रस पिळून ते केसांवर लावल्याने पांढरे झालेले केस काळे होतात. तसेच आवळा असलेल्या तेलाने केसांना दररोज रात्री मालिश करावी.
कडीपत्ता –
खोबरेल तेलात कडीपत्ताची काही पाने घालून तेल उकळून घ्यावे. तयार केलेले तेल रोज काही दिवस आपल्या केसांना लावून मसाज करावा. पांढरे केस काळे होण्यासाठी हा आयुर्वेदिक उपाय फायदेशीर ठरतो.
भृंगराज –
भृंगराज ह्या आयुर्वेदिक वनस्पतीपासून बनवलेले तेल आपण दररोज केसांना लावल्यास केस पांढरे होण्याची समस्या दूर होण्यास मदत होते.
काळी मिरी –
दह्यामध्ये काळी मिरी पावडर आणि लिंबाचा रस मिसळून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण केसांवर लावल्याने पांढऱ्या केसांची समस्या दूर होण्यास मदत होते.
Ayurvedic treatment for white hair solution Marathi information.